कार्यकर्त्याचं योग्य मुल्यमापन करणारा नेता— प्रतापराव पाटील चिखलीकर.

 

राजकारणामध्ये अनेक नेते आहेत. पण साधेपणा, प्रामाणिकपणा, आणि मुल्यधिष्ठित राजकारण करणारे नेते आज बोटावर मोजन्या एवढेच आहेत . मी जनतेचा जनता माझी, हीच माझी खरी संपती आहे. असे समजुन सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितासाठी अहोराञ काम करणारा नेता म्हणून माजी खादार व माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची राज्याच्या राजकारणात व नांदेड जिल्ह्यात ओळख आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणजे जाणता राजा होय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात त्यांनी कधी जातीवाद केला नाही. कोणत्याही समाजातील कार्यकर्ता असो की नागरीक असो त्यांना परक समजले नाही.आपल्या कूटुंबातील व्यक्ती समजून काम करण्याची त्यांची पध्दत आहे. गोरगरीब जनतेच्या सुख दु:खात सहभागी होवुन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम ते सतत करीत असतात. त्यांनी कधी तो या जातीचा तो त्या जातीचा असा भेदभाव केला नाही म्हणून मतदार संघातील जनता त्यांच्याकडे आमचा जाणता राजा म्हणून पाहिल्या जाते हे अगदी सत्य आहे.

माजी खा. व माजी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणजे शब्दाचे पक्के. त्यांच्या चाळीस वर्षाच्या राजकारणात त्यांनी दिलेला शब्द कधी बदलला नाही, फिरवला नाही. कार्यकर्त्यावर ते जिवापाड प्रेम करतात. कार्यकर्त्यावर प्रेम करणारा नेता म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर होय. त्यांच्या जवळ गेलेला माणूस कधीही दुर गेला नाही. म्हणून कार्यकर्ता ही त्यांच्यासाठी जिवाचे रान करुन खांद्याला खांदा लावून अहोराञ काम करतात. चिखलीकरांनी अनेक वेळा पक्ष बददले पण जनतेनी त्यांना कधी नाकरलं नाही. ज्या राजकीय पक्षात प्रतापराव पाटील चिखलीकर प्रवेश करतात त्या राजकीय पक्षात ते प्रचंड मतांनी विजयी होण्याची परंपरा चिखलीकरांनी आजवर कायम राखली आहे. पण चिखलीकरांनी ज्या पक्षावर विश्वास ठेवुन पक्षाचे निष्ठेने काम केले त्या राजकीय पक्षाने माञ सतत चिखलीकरांना मंञीपदापासुन दुर ठेवले हा आजवरचा इतिहास आहे. कारण चिखलीकरांच मिठच अळणी आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

चिखलीकरांना पक्षप्रमुखानी मंञीपदापासून डावले पण जनतेनं त्यांना डावल नाही. सतत या मतदार संघातील जनता त्यांच्या पाठीमागे भक्कम उभी राहीली. असे देशातले एकमेव नेते म्हणजे चिखलीकर होय. पक्ष बदलला की नेत्यांचा पराभव होतो पण देशातला एकमेव नेता असा आहे की तो कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला तरी तो प्रचंड मतानी विजयी होतो.ते म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर होय. कोणत्याही राजकीय पक्षाकडुन निवडणुक लढवली तरी चिखलीकरांचा विजय होतो. हे विरोधकाना रुचलं नाही. म्हणून अनेकांच्या पोटात गोळा उठतो आणि पोट दुखायला लागते आणि थेट मंञीपदापासुन डावल्या जाते. पण चिखलीकर हे राजकारणातील दीपस्तंभ आहेत .दुरदृृृष्टी आणि सयमी राजकारणी आहेत.समाजाच्या व मतदार संघाच्या विकासासाठी मोडेल पण वाकणार नाही ही भुमिका घेवून महाराष्ट्राच्या संस्कृृृृतीला शोभेल असं राजकारण त्यांच आहे. माणसाच्या कल्याणासाठी सतत राञंदिवस लढणारा माणूस म्हणजे माजी खा. व माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर होय. त्यांनी त्यांच्या गावच्या सरपंचापासुन ते दिल्लीच्या राजकारणात प्रभावीपणे महाराष्ट्राच्या संस्कृृृृतीला शोभेल अस त्यांच राजकारण सुरु आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील ग्रामिण भागातील चिखली या गावी त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९६१ रोजी वच्छलाबाईच्या पोटी झाला. प्रतापरावानी अवघ्या २९ व्या वर्षी त्यांच्यातला खरा प्रताप दाखवायला सुरुवात केला आणि ते १९८९ मध्ये चिखली या गावचे सरपंच म्हणून पदाची सुञे हाती घेतली आणि प्रथम गावच्या विकासाला सुरुवात केली. त्यांना समाजकारण व राजकारणाची आवड असल्यामुळे ते १९९२ मध्ये प्रथम पेठवडज गटामधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि १९९७ पर्यंत नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी अतिशय उत्कृृृष्टपणे काम केले.

 

जिल्हा परिषदेतील सर्व विषय समित्यांच्या सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ग्रामिण भागातील सर्व सामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली. विश्वासु आणि प्रामाणिक तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांची ग्रामिण भागातील जनतेशी ओळख निर्माण झाली. आणि जिल्ह्यातील अनेक विकास कामाना गती मिळाली आणि पहाता पहाता जिल्हा परीषदेत ते लोकप्रिय बांधकाम सभापती म्हणून नावारुपाला आले. आणि सामान्य जनतेच्या व कार्यकर्त्याच्या गराड्यात प्रतापराव दिसू लागले. त्यांच्या कामाची हातोटीच वेगळी आहे.कारण राजकारण करीत असतांना त्यानी राज्याचे माजी मुख्यमंञी शंकरराव चव्हाण साहेब , शांतीदुत गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्या सहवासात त्यांनी राजकारणाचे धडे घेतले आणि शंकरराव चव्हाण यांना गुरुस्थानी मानून वडील शांतीदुत गोंविदराव पाटील चिखलीकर व आई वच्छलाबाई गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्या आशिर्वादाने त्यांनी राजकारणात भरारी घेयायला सुरुवात केली.

१९९७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते निवडून आले आणि १९९७ ते १९९८ आणि २००१ ते २००२ या कालावधीमध्येही नांदेड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. या काळामध्ये जिल्ह्यातील अनेक विकास कामांना गती दिली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारे नेते म्हणजे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची सर्व सामान्य जनतेमध्ये ओळख निर्माण
झाली.

आणि जनतेचा ओढा जिल्हा परीषदेकडे लागला. त्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. त्याचबरोबर गोरगरीब विद्यार्थ्याच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष देवून त्यांनी अनेक विद्यार्थ्याचे प्रश्न मार्गी लावले. चिखलीकर हे ग्रामिण भागातील शेतकर्‍याचा मुलगा असल्यामुळे आपण शेतकर्‍यासाठी कांही तरी केले पाहिजे ही मनात खुणगाठ बांधुन १९९३ ते १९९८ आणि २००१ ते २००९ या वर्षी त्यांनी कलंबर विभाग सहकारी साखर कारखाचे संचालक आणि चेअरमन म्हणून काम पाहिले. शेतकर्‍याच्या, कामगाराच्या, सुशिक्षित बेरोजकाराच्या हिताचे निर्णय घ्यावयाचे असेल तर आपणाला मर्यादित राजकारण करुन चालणार नाही.म्हणून २००४ ला कंधार विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ते राष्ट्रीय युवक काॅग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे काॅग्रेस पक्षाची उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. पण चिखलीकरांची चाणक्ष बुध्दी पाहुन काॅग्रेस पक्षाच्या नेत्यात धडकी भरली आणि पक्षाने त्यांना तिकीट नाकरलं पक्षाने त्यांना तिकीट नाकारल म्हणून त्यांनी विधानसभा लढवायच थांबले नाहीत अभी नही तो कभी नही ही भुमिका घेवून २००४ ची कंधार विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली आणि भरघोस मतानी विजयी झाले.विजयी झाल्या बरोबर दुसर्‍या दिवशी ज्यानी तिकीट नाकारलं त्यांनीच काॅग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी याची भेट घडवुन आनली.

 

 

 

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत चिखलीकरांचा पराभव झाला. पराभवाचे मुळ कारण म्हणजे राज्याच्या मुख्यमंञी पदी अशोकराव चव्हाण होते. त्यांनी प्रचार सभेत अस्वासनाची खैरात वाटली त्यामुळे पराभव झाला. हे अगदी सत्य आहे. २०१४ ला प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला पण लोहा कंधार विधानसभेची जागा राष्ट्रवादीला होती. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि प्रचंड मतानी त्यांचा विजय झाला त्यांना तिथही मंञीपदापासून डावल त्यामुळे त्यानी पुन्हा पक्ष बदलला व भाजपात प्रवेश करुन २०१९ ची नादेड लोकसाभा भाजपाच्या तिकीटावर लढवली माजी मुख्यमंञी असलेल्या अशोकराव चव्हाणांचा त्यांनी दारुन पराभव केला. आणि नांदेडच्या राजकारणातले चिखलीकर किंगमेकर ठरले आणि गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेल्या नांदेड देगलुर बिदर या नविन रेल्वे मार्गास २,५५२ कोटी रुपायचा निधी मंजूर केला. आणि नांदेड लोहा लातूर या नविन रेल्वे मार्गाच्या अतिम सर्वेक्षणास मंजुरी मिळवून दिली.

 

२०२४ ला पुन्हा भाजपाच्या तिकीटावर नांदेड लोकसभा लढवली पण त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. पराभव झाला असला तरी खचून न जाता निवडणुकीचा निकाल लागल्या दुसर्‍या दिवसापासुन जनसामान्याच्या हितीसाठी त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.अशा गुणवंत आणि विकासरत्न माजी खा. व माजी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा !

 

पञकार प्रल्हाद दे. आगबोटे कंधार
ता. कंधार जि. नांदेड
मो. ९५६१९६३९३९

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *