श्रीमंत म्हणुन जगा.. श्रीमंत म्हणुन मरु नका..

आपण अनेकदा पहातो बरीचशी माणसे जगताना स्वतःसाठी जगत नाहीत.. कुटुंबासाठी जगत असतात.. कितीही पैसे असले तरीही स्वतः आनंद न घेता मुलांसाठी ठेवतात .. मुलांना ठेवायलाच हवं पण त्याआधी आनंद घ्यायला हवा किवा म्हातारपणासाठी सुध्दा पैसे किवा सेव्हींग हवेच पण ज्या वयात आपण आनंद घेउ शकतो किवा हिंडु फिरु शकतो त्या वयात आपण ते करायलाच हवे… श्रीमंत म्हणुन आपल्याला जगता यायला हवे नाहीतर बऱ्याचदा मुलही मरणाची वाट पहाताना दिसतात.. प्रत्येक घरात वेगवेगळी परिस्थिती असते.. आपल्या मुलांना फक्त आपणच ओळखु शकतो त्यामुळे फक्त पैशानेच श्रीमंत म्हणून जगु नका तर आपले विचार सुध्दा आपल्याला श्रीमंत करतात.. आपण समाजासाठी जेव्हा काही करतो तेही श्रीमंत असण्याचच लक्षण आहे..

काही महिन्यांपूर्वी मी एका वृध्दाश्रमात गेले होते तिथे जवळपास ८२ वर्षांच्या आजी होत्या..मी तिथे गेल्यावर माझे दोन्ही हात त्यांच्या हातात धरुन रडु लागल्या त्यांचे हजबन्ड पण त्याच वृध्दाश्रमात होते.. त्यांना तिथे राहायचे नव्हते .. त्यांचं सगळं ऐकून घेतल्यावर मी वृध्दाश्रम चालवणाऱ्या ताइना म्हटलं , त्यांना घरी जायचय मग त्यांच्या घरी कोणी नाही का ??.. त्यावेळी त्यांनी जे सांगितले ते ऐकून वाईट नक्की वाटलं.. त्यांचे पुण्यात चार फ्लॅट आहेत.. मुलगी बॅंकेत आहे त्यामुळे त्यांना घरी सांभाळायला कोणी नाही म्हणुन तिने इथे आणून सोडलय.. ती भेटायला येते… दर महिन्याला आमचे पैसे देते पण नोकरीमुळे तिला त्यांना सांभाळता येत नाही.. इथे नशीबाला दोष द्यायचा कि मुलीला कि या वयस्कर पालकांना ???? … नक्की कोणाला ?? चार फ्लॅट असेच आले नसतील ना त्या दोघांनी पै पै जमवून ते विकत घेतले असतील. कदाचित तरूणपणी त्यांनी आनंदही घेतला नसेल.. एक फ्लॅट कमी घेउन ट्रीप्स करु शकले असते किवा अजून काही त्यांच्या आवडीचे.. इतकं सगळं असूनही त्यांच्यावर आज रडायची वेळ आली आहे..

असाच एक किस्सा पेपर मधे वाचला होता.. सगळी प्रॉपर्टी विकुन तुम्हाला फॉरेन ला नेतो असं सांगून मुलगा त्यांना एका ठिकाणी बसवुन गेला तो परत कधी आलाच नाही..आपण त्यांची कर्म म्हणु शकतो पण हे किती पेनफुल आहे ना.. सगळं आहे तोपर्यंत भरभरुन जगा . उद्या फ्रेंडशिप डे आहे.. कुठल्याही वयात असाल तरीही मनसोक्त मित्रांसोबत साजरा करा.. हे करत असताना भगवंत आणि आपला जीवनसाथी यांना बॅंड बांधायला विसरु नका.. ते दोघे आधी आपले मित्र आणि मग आपलं फ्रेंडसर्कल.. आमचेही काही प्लॅन झाले आहेत.. so enjoyy Happy friendship Day..

#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *