कंधार – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी सूचना लोहा व कंधार आढावा बैठकी वेळी समितीच्या अध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केली.
राज्य सरकारच्या वतीने महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे,ही योजना प्रभावितपणे राबवली जावी व योजनेची अंमलबजावणी करताना सुसूत्रता यावी तसेच कोणतीही पात्र लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता विधानसभा स्तरीय समिती गठित करण्यात आली या समितीची बैठक दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी तहसील कार्यालय लोहा व तहसील कार्यालय कंधार या ठिकाणी समितीची बैठक समितीच्या अध्यक्षा तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाच्या वतीने जी महत्त्वकांक्षी योजना राबवली जाणार आहे त्याचा फायदा सर्वसामान्य लाभार्थी महिलांना व्हावा व आर्थिक दृष्ट्या कुटुंबातील महिला सक्षम व्हावी यासाठी सर्वांनी समितीच्या सदस्यांनी शर्तीचे प्रयत्न करावेत व त्याचा लाभ सर्वसामान्याला मिळाला पाहिजे, तसेच या योजनेपासून कोणतीही महिला भगिनी वंचित राहू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे या बैठकीदरम्यान समितीच्या अध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्यासह उपस्थित समितीच्या शासकीय व अशासकीय सदस्यांनी सूचना केल्या.यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अशासकीय अँड गंगाप्रसाद यन्नावार,अँड मारुती पंढरे,तहसीलदार रामेश्वर गोरे,महेश पाटील गट विकास अधिकारी कंधार, लिंगुराम राजुरे बालविकास प्रकल्प अधिकारी कंधार,मोकले नायब तहसिलदार लोहा ,दशरथ आडेराघो गटविकास अधिकारी लोहा, श्रीमती पवार बालविकास प्रकल्प अधिकारी लोहा,श्रीमती एस के वानखेडे सहाय्यक गट विकास अधिकारी लोहा यांच्यासह भाजपा लोहा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे, भाजपा कंधार तालुकाध्यक्ष प्रा. किशनराव डफडे,माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार ,नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दत्ता वाले,मधुकर डांगे,अँड सागर डोंगरजकर, सुरेश गायकवाड,प्रदीप मंगनाळे,माधव तांबोळी यांची उपस्थित होती.