राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक:तिरंगा* 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन विशेष

 

 

हर- घर तिरंगा अभियान हे भारताच्या एकजुटीचे प्रतीक आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षे आपण अतिशय आनंदात, उत्साहाच्या वातावरणात साजरे केले आहे. हे अभियान घरोघरी पोहोचले पाहिजे यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी सुद्धा तिरंगा अभियान राबवण्याचे सर्व देशवासीयांना आवाहन केले आहे. जनतेस चांगली फळी मिळावीत। सुसंवाद असावा शासन अन् जनतेत। जबाबदार नागरिक निर्माण व्हावेत। तरच होईल देशाचे भले।।असे या अभियानाच्या माध्यमातून सांगता येते.

हर-घर तिरंगा उत्सव आहे. राष्ट्र दिनाचा, अभिमानाने साजरा करूया, ध्वजसंहितेचे पालन करून, घराघरात तिरंगा फडकवूया.
15 ऑगस्ट रोजी भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा करत आहोत. स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणून भारतीय ध्वज तयार केला आहे, राष्ट्रीय ध्वजामध्ये तीन रंग आहेत.
वरचा रंग भगवा असून तो त्याग व शौर्य,मध्यभागी असणारा पांढरा शांतता आणि प्रकाशाचे व तिसरा हिरवा रंग मानव निसर्गाशी व भूमीशी जोडलेला असल्याने समृद्धीचे प्रतीक आहे.असे आपल्याला सांगता येते. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेच्या बैठकीत हा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला आणि तोच अधिकृत म्हणून आपण आजही वापरत आहोत. त्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र असून 24 आ-या आहेत ते दिवसाचे बारा तास व रात्रीचे बारा तास दर्शवतात.

त्याची सविस्तर माहिती आपण या लेखात करून घेऊ,
त्या अगोदर तिरंगा शपथ घेऊ..
*मी शपथ घेतो की,मी तिरंगा फडकवेन ,आपले स्वातंत्र्यसैनिक आणि शूरांवीरांच्या भावनांचा सन्मान करेन. आणि भारताच्या विकासाची आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन*. अशा प्रकारची देशभक्तीपर शपथ घेऊन आपण सर्वजण देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन अतिशय थाटामाटाने साजरा करत आहोत. आपल्या असंख्य क्रांतिकारकांनी देशासाठी प्राण अर्पण केले. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी बलिदान केले.150 वर्षानंतर भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला,
मवाळ व जहाल आणि क्रांतीकारकांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढे उभारले. जीवाची पर्वा न करता बलिदान दिले. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याची मधुर फळे चाखत आहोत.

आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर राष्ट्रध्वजाचे रक्षण करणे ,आपल्या सगळ्यांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्याचा सन्मान होणं अतिशय गरजेचं आहे .राष्ट्रध्वजाचा सन्मान करून त्याचे आदर्श कृतीत आणावे. कृतीतून देश प्रेम दाखवणे. आज अतिशय गरजेचे आहे, फक्त बोलून देशप्रेम दाखवू नये ,
आज आपण पाहत आहोत. तिरंगा यात्रा. तिरंगा सेल्फी. तिरंगा प्रतिज्ञा. ,तिरंगा रॅली असे विविध उपक्रम ,प्रत्येक शासकीय निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व कार्यालये सर्व शाळेत ,विद्यालयात काॅलेज मध्ये घेतले जाणार आहेत आणि त्यामध्ये गावकऱ्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी बचत गट, युवामंडळे ,वेगवेगळे प्रतिष्ठाने यांचा सुद्धा आपण सहभाग घेणार आहोत याच निमित्ताने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी देशासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले, बलिदान दिले, जे देशासाठी लढले। ते अमर हुतात्मे झाले.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली.
वंदे मातरम म्हणते हसत हसत फासावर गेले. ज्यांच्या तपश्चर्येने आपला देश स्वतंत्र झाला त्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारक, हुतात्म्यांच्या स्मृतीस आपण विनम्रपणे अभिवादन आज करत आहोत. आपल्या देशात आपण संविधानामुळे आणि सैनिकांमुळे सुरक्षित आहोत. खरोखर आपल्याला आपला देश घडवण्यासाठी जवानाची आणि शेतकरी राजाची आवश्यकता आहे. राष्ट्रीय कार्यक्रमातून आपल्याला ध्वजला वंदन करायचे आहे. त्यानिमित्ताने देशभरात घरोघरी तिरंगा, हर घर तिरंगा अभियान सुरू आहे.तीन वर्षापासून आपण हे अभियान चालवत आहोत. दरवर्षी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशात घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवून प्रत्येक नागरिकास आपण ज्या ठिकाणी राहतो त्या घरावर तिरंगा ध्वज लावण्यास सांगितले आहे .

घरावर झेंडे लावल्यामुळे खरोखर देशभक्ती वाढते काय ? असं काही जणांचे मत आहे. परंतु या देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या व्यक्तीसाठी झेंडा तीन दिवस सलग लावल्यानंतर खरोखरच आपल्या मनात देशा विषयी प्रेम आपुलकी निर्माण होते.त्यामुळे झेंडा हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रतीक आहे. मादाम कामा यांनी जर्मनीतील स्टुटडगार्ड येथे भारताचे नेतृत्व करून आपला ध्वज तेथे फडकवला होता. शिरीषकुमार यांनी नंदुरबार येथे हातात तिरंगा घेऊन *वंदे मातरम* म्हणत घोषणा देत इंग्रजांच्या विरोधात आंदोलन करत होता. तेव्हा पोलिसांना अतिशय राग आला व ते चिडले आणि शिरीष कुमार व त्यांच्या मित्रांवर लाल दास, शशिधर, घनश्याम, धनसुकलाल या शाळकरी मुलावर गोळ्या झाडल्या, त्यामुळे आपल्याला हे मिळालेलं स्वातंत्र्य रक्त सांडून बलिदान देऊन मिळालेले आहे .
भारतीय नौदलात व वायुदलात फार मोठा इंग्रजांच्या विरोधात उठाव झाला नौसैनिकांमध्ये व वायुसेनेमध्ये भारतीयांच्या मनात असंतोष खदखदत होता. इंग्रजांकडे तलवार नावाची युद्धनौका होती, तेव्हा भारतीय सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी या युद्धनौकेवर तिरंगा ध्वज फडकवला म्हणून भारताची आन-बान शान हा आपला तिरंगा आहे,
सारे जहाँ से अच्छा। हिंदुस्तान हमारा त्यासाठी हा जो हिंदुस्तान आहे.

या हिंदुस्ताना मध्ये आपण सर्वांनी एकत्रित राहून तिरंग्याचा सन्मान करणार आहोत. आज पर्यंत आपल्या देशाने बरीच प्रगती केली आहे.
परंतु आता लोकांची मानसिकता देशाविषयी संकुचित होत चालली आहे. लोकप्रतिनिधीची दृष्टीही आता मतलबासाठीच फिरत आहे. असे वाटत आहे.देश जगला तरच आपण जगू ही भावना आपल्या मनात कायमस्वरूपी राहणे आज गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते संसदेपर्यंत आपल्या देशात काय चालले आहे.हेच कळेनाशी झाले आहे. पावसाळी हिवाळी अधिवेशने होतात या अधिवेशनामध्ये चर्चा सकारात्मक व्हावी. विधायक कामावर चर्चा कमी होत चालली असून मुद्दाम विरोधाला विरोध म्हणून शाब्दिक चकमकी जास्तीत जास्त घडत आहेत. त्यामुळे संसदेमधून अनेक खासदारांना निलंबित केले जात आहे, ही गोष्ट आपल्या देशासाठी भूषण नाही. किरकोळ मतभेद झाले की लगेच संसद काही वेळासाठी काही दिवसांसाठी स्थगित करण्यात येत आहे .दंगली ,संप, बंद उपोषण वेगवेगळे निघणारे मोर्चे या साधनाद्वारे देशाचे प्रचंड नुकसान होत आहे. याची जाणीव नागरिकांना कमी होत आहे. नागरिकांनी व नेत्यांनी परस्पर सामंजस्य वाढवून लोकशाहीच्या गाड्याला विधायक वळण दिले पाहिजे. व गतिमान बनवून देशाच्या प्रगतीस हातभार लावला पाहिजे. सध्याच्या काळात तिरंगी झेंड्याला आणि त्यातील रंगाना वेगळे रूप आलेले आहे .हे इथे सांगणे गरजेचे आहे.हे तीन रंग घेऊन वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करणे. या तीन रंगाचे कपडे वापरणे , केक बनविने,खाजगी ठिकाणी या तीन कलरचा वापर करणे. शरीरावर तीन रंग काढणे, हातरूमाल म्हणून वापरणे , वाहनाला तीन कलरचा रंग देणे या गोष्टी योग्य नाहीत.

झेंड्याचा सन्मानच झाला पाहिजे, तो उंच ठिकाणी फडकवला पाहिजे त्याच्या वर कसलाही प्रकारचा डाग लागू नये, खराब होऊ नये. चुरगळला असू नये. रस्त्यावर टाकू नये, 140 कोटी भारतीयांचा तो सन्मान आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकच छत्राखाली आणणारा आहे.
कारण सर्व मानव समान आहेत.
भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.
म्हणून हा तिरंगा सदैव फडकत राहावा. त्यासाठी आपणही सर्वांनी राष्ट्राशी एकनिष्ठ वागावे, साखरेचा कण जसा दुधाशी एकरूप होतो,
तसे आपण राष्ट्राशी एकनिष्ठ वागावे. आपले भूतपूर्व राष्ट्रपती ए,पी जे अब्दुल कलाम यांनी आपला देश महासत्ता बनण्याची स्वप्न पाहिली होती. देशासाठी आपण काय दिले आहोत हे प्रत्येकाने विचार करावा.

देशाच्या विकासाच्या, नवनिर्माणाच्या प्रत्येक संधीस आपण तत्पर असावे. आपला देश आणखी प्रगती वर नेण्यासाठी सदैव नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे. लोकशाही भक्कम पायावर उभी करण्यासाठी आपण सगळ्यांनी अंधश्रद्धा ,रूढी परंपरा वाईट प्रवृत्ती ,हेवेदावे हे सर्व मनातून काढून टाकले पाहिजे तरच आपण महासत्ता म्हणून नावारूपाला येऊ. आज भारतात अनेक राजकीय पक्षाची खिचडी झाली आहे त्यामुळे मतदार संभ्रमावस्थेत असल्यासारखा दिसून येत आहे .आपल्या मताचे योग्य दान करण्यासाठी तो उत्सुक राहिला नाही. कधीही आपल्या देशात लोकसभेला आजपर्यंत 60 ते 65% पेक्षा जास्त मतदान झाले नाही.कारण लोकांच्या मनामध्ये म्हणावी तेवढी आणखीही आपल्या देशाविषयी तिरंगी विषयी जाणीव जागृती झाली नाही. त्याच्याभोवती अनेक प्रलोभने वाढल्यामुळे तो आपल्या मताची खरोखर किंमत समजून घेत नाही. त्यामुळे मतदाराच्या चुकीच्या निर्णयामुळे भारतीय लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
यामुळे विकासाची फळही दुरावत आहेत. त्यामुळे आज सगळीकडे अंदाधुंदी माजली आहे. अपहरण, जमातवाद ,नक्षलवाद, दहशतवाद हे डोके वर काढत आहेत. या सर्वावर उपाय करायचा असेल तर तिरंगी ध्वजाचा सन्मान करून सर्वजण एकत्रित येऊन इतर राष्ट्राबरोबर आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. ज्यावेळेस भारत माता की जय चा आवाज आकाशात दुमदुमून जातो. तेव्हा आपली छाती अभिमानाने भरून येईल म्हणून राष्ट्रध्वजाला वंदन करणं आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. *देश हा देव मानू या। मनोभावे त्याची पूजा करू या। स्वकर्तृत्वाची फुले वाहूनिया। प्रसन्न करू भारत मातेला ।। जयहिंद, जय भारत*
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव*
*अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मखेड जि. नांदेड*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *