आज आरक्षण बचाव यात्रेचा समरोप. मागच्या 25 जुलै पासून सुरु झालेली ही यात्रा आज आपल्या नियोजित ठिकाणी येऊन पोचली आहे.ऊन पावसात, नदीनाल्यातून चिखल तुडवत, वंचितांचे प्रश्न घेऊन निघालेली ही यात्रा वंचितानाचे आत्मभान जागृत करणारी ठरलेली आहे. आज ही पावसाच्या हलक्याशा सरी सुरुवातीला कोसळल्या पण जसे बाळासाहेब आंबेडकर मंचकावर आले आणि पाऊस थांबला. छत्रपती संभाजी नगरचे आमखास मैदान अगदी खचाखच भरले होते जिकडे तिकडे निळे पिवळे झेंडे, पारंपरिक पोशाखात आलेले obc बांधव सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. अनेक मान्यवरांची तडाखेदार भाषण झाली. सुजात आंबेडकर पहिल्यांदाच अगदी जवळून पाहण्याचा योग आला.अनेक पोटदुखे म्हणत होते की प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत एकही obc नाही. त्या पोटदुख्यांनी आज हा पिवळा जनसागर पहिला असेल तर त्यांची तडफड अधिक वाढलेली असेल. मागच्या लोकसभा निकालावरून उलट सुलट चर्चा करणाऱ्यांनी पाहिलं असेल की जनता वंचितासोबतच आहे पण तिकडे EVM असल्यामुळे वंचितांच्या मताची पळवापळवी करून आपसात वाटून घेतली जात आहेत.
पंधरा दिवसाचा पावसाच्या माऱ्यात, थंडी वाऱ्यातला प्रवास करूनही सत्तरितल्या सेनापतीचा उत्साह बुलंद होता. तरुणांना लाजवेल अशी चपलता तरुणाईला प्रेरित करीत होती. रूढी परंपरेच्या ओझ्याखाली दबलेल्याना, जाती पोट जातीत विभागलेल्या शेकडो जातीचे ऐक्य घडविण्याचा प्रयोग, दलित ऐक्याचे सोंग करणाऱ्यांसाठी मोठी अडचण झालेली आहे. दबलेल्या, पिचलेल्या उपेक्षिलेल्या समाज घटकांना एकसंघ करण्याची किमया ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी करून दाखवली. त्यांना हिम्मत दिली. लढण्याचे बळ दिले.
*क्रूर जुल्मी रूढीतून वामन*
*सोडविता इथे माणसाला*
*साद घाला भीमा गौतमाला*
*धाव घेतील तुमच्या हकेला*
वामन दादांनी लिहिलेल्या या गीताच्या ओळी किती समर्पक आहेत, नाही का? ज्या ज्या वेळी वर्ग संघर्ष निर्माण झाला. वंचितांचे हक्क अधिकार धोक्यात आले त्यावेळी वंचितांचे हक्क अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी *राजगृह* वंचितांची ढाल बनून रक्षण केलेलं आहे. अगदी गोलमेज परिषदे पासून आजपर्यंत आहे रे आणि नाही रे यांच्यात तक्रार झाली तेव्हा राजगृहाने समन्वयाची भूमिका स्वीकारून वर्गसंघर्ष टाळलेला आहे. पुणे करारात उभा देश पेटतो की काय अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली तेव्हा हक्क अधिकार वंचितासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन पावले मागे जाऊन समाज सुरक्षित केला .
कोपर्डी प्रकरणात लाखोंचे मोर्चे निघाले.पुन्हा महाराष्ट्र पेटतो की काय अशी दहशत निर्माण झाली.सामाजिक सलोखा बिघडतो की काय असे वाटू लागले त्यावेळी राजगृहावरून आदेश आला की *प्रति मोर्चे काढू नका*
आणि परिस्थिती निवळली.
भीमा कोरेगाव दंगलीत ही दंगलखोरांना दंगली घडवायच्या होत्या पण यावेळी ही बाळासाहेब आंबेडकर यांनी परिपक्व राजनेत्याची भूमिका साकारली. आज आरक्षण अर्थात प्रतिधित्वा वरून जो संघर्ष चिघळलेला आहे. सरळ सरळ दोन गट एकमेकांना ललकारताना दिसतात. घटनाकारांनी वंचित समुहाला इतरांच्या बरोबर येण्यासाठी दिलेलं प्रतिनिधित्व याचा अर्थ अलीकडे गरबीशी लावला जात आहे. आम्हाला नाही तर कुणालाच नाही ही भावना वंचिताचे प्रतिनिधित्व
धोक्यात आणते. एकमेकांच्या ताटातली पोळी हिसकावून घेण्याची जी भाषा आज बोलली जात आहे ती भाषा आरक्षण मिळविण्याची नसून प्रतिनिधित्व मोडीत काढण्याची आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी इथे भांडून उपयोग नाही तर दिल्ली सरकारशी भांडले पाहिजे. हा प्रश्न दिल्लीतूनच सुटू शकतो हे सर्वांना माहीत असूनही केवळ राजकारणासाठी *डोळ्यात कचरा कानात फुंकर* असा जीवघेना खेळ खेळाला जातोय. गैरसमजा मुळे महाराष्ट्र पेटूनये म्हणून
दोन्ही गटाच्या समस्या समन्वयाने कशा सोडवता येतात हे समजावून देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी वयाची सत्तरी ओलांडली तरी पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे….
एका प्रश्नाने गढूळ झालेले वातावरण निवळले नसताना सरकारने मा. सुप्रीमकोर्टाच्या आडून दुसरी चाल खेळलेली आहे. ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आरक्षणातील वर्गीकरण हा पेच निर्माण करून समाजा समाजात फूट पडण्याची खेळी खेळलेली आहे… बाळासाहेब आंबेडकर obc आरक्षण वाचविण्यासाठी झगडत असतानाच आता ते सरकारच्या फुट डालो राज करो या धोरणावर ही संघर्ष करतील.. चला साहेबांना साथ देऊया
गणपत गायकवाड नांदेड
9527881901