कंधार/ ( प्रतिनिधी संतोष कांबळे)
कंधार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेती व पिकांचे पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यांवी, कोणत्याही अटी व शर्ती न टाकता २०२४ चा विमा त्वरीत लागु करावा, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांनी कंधार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यात गेल्या ४ दिवसांपासून अति मुसळधार पाऊस चालु आहे यामुळे नदी नाले ओसोंडून वाहत आहेत व सर्व जमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापुस, हाळद,ज्वारी, मुग, उडीद व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्याच्या हाताला आलेले पिक गेल्यामुळे शेतकरी आस्मानी संकटात सापडला आहे.
तसेच ७२ तासांमध्ये झालेल्या नुकसानीची ऑनलाईन नोंद करण्याचे प्रशासन सांगत आहे. मात्र ऑनलाईन साईट (नेटवर्क) चालत नाही. शेतकऱ्यांकडे ऑनराईड मोबाईल नाहीत व शेतकऱ्यांना काही समजत नाही.
त्यामुळे कंधार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, तसेच शेती व पिकांचे पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, कोणत्याही अटी व शर्ती न टाकता २०२४ चा विमा त्वरीत लागु करावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांनी कंधार उपविभागीय अधिकाऱ्याना निवेदन दिली आहे. सदरील निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,मा.कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य,मा. विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर,मा. जिल्हा अधिकारी साहेब नांदेड व तहसीलदार साहेब कंधार यांना देण्यात आले आहेत.या निवेदनावर तालुका संघटक माजी सभापती पंडित देवकांबळे, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ पवार, विभाग प्रमुख जीएम पवळे ,विभाग प्रमुख आत्माराम पाटील लाडेकर ,दिलीप राठोड, संतोष पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.