नांदेड ; गरोदर महिला नामे संगीता श्रीराम वाघमारे वय 32 वर्षे अडकून पडली होती या महिलेस लवकर दवाखान्यात पोचवणे आवश्यक होते पण पूरपरिस्थितीमुळे गावाला वेढा पडलेला असल्यामुळे कोणतेही वाहन गावात जाऊ शकत नव्हते तहसिलदार देगलूर यांनी याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षास कळविल्याबरोबर मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत मा. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी तात्काळ SDRF तुकडी ला तूपशेळगांव येथे जाण्यासाठी आदेशित केले .
जिल्हा आपत्ती व्यवस्थााापअधिकारी किशोर कु-हे सहायक बारकुजी मोरे यांनी स्थानीक प्रशासन-तहसिलदार देगलूर व SDRF शी समन्वय ठेवला यन SDRF ची एक तुकडी नांदेड येथून देगलूुरकडे रवाना झाली व SDRF च्या टीमने बोटच्या सहाय्याने त्या महिलेची सुटका केली.