Dignity सांभाळणे ही स्त्री आणि पुरूष दोघांचीही जबाबदारी

Try to maintain your Dignity..
Dignity सांभाळणे ही स्त्री आणि पुरूष दोघांचीही जबाबदारी आहे आणि तो संस्कार आणि विचारांचाही भाग आहे.. अघळपघळ वागणं , बोलणं आणि डीसेंसी मेंटेन ठेवून वर्तणूक करणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे.. मी बऱ्याचदा म्हणते , हेल्दी फ्लर्टींग करा .. खालच्या लेव्हलला जाऊन वर्तणूक करणं किवा शब्द वापरणं आणि शाब्दिक विनोद करत त्यातून समोरच्याला आकर्षित करणं यातही खुप फरक आहे.. Dignity ही फक्त भाषेतच नाही तर बसण्या उठण्यात , वागण्यात , हावभाव , आदर , स्त्री पुरूष समोर कोण आहे हे ओळखून , वयाची जाण ठेवुन वागणे असेल , एखाद्याच्या पदाचा मान ठेवणे असेल या सगळ्यावर Dignity ठरते.. आणि बऱ्याचदा निरीक्षणातुन खुप गोष्टी आपल्याला आत्मसात करता येतात.. एखादा कमी शिकलेला किवा फार मोठी बॅग्राउंड नसलेला व्यक्तीही खुप काही शिकवुन जातो..
एक उत्तम उदाहरण देते.. माझ्या घरी गार्डन चं काम करायला बापु नावाचे माळी येतात.. ४० च्या आसपास वय असेल.. शिक्षण १२ वी झालय .. इंग्रजी वाचता येतं , कळतं पण त्यांना जेव्हा कोणी पाहिल तेव्हा ते माळी काम करत असतील असं वाटणारही नाही.. निर्व्यसनी , स्वच्छ , टापटिप त्यांची बाईक सुध्दा नवीन असल्यासारखी असते.. काम तर इतकं नीटनेटकं आणि आमच्याशी बोलणं , वागणं म्हणजे शब्द नाहीत इतकं सगळं छान.. आम्हाला देत असलेला आदर असेल , स्त्रीकडे पहाण्याची त्यांची नजर असेल सगळच वाखाणण्याजोगी आणि कौतुकास्पद.. या व्यक्तीला सुध्दा त्यांची डिग्नीटी मेंटेन करता येते तर उच्चशिक्षीत /बिझनेसमन / उच्चपदस्थ अधिकारी यांना का करता येउ नये ??.. सोशल मिडीयावर स्त्रीयांशी वाईट पध्दतीने फ्लर्टींग करुन ते स्वतःचं नाव खराब करुन घेतात.. त्यांना वाटतं स्त्री मोकळेपणाने बोलते म्हणजे तिच्याशी कसंही वागलं तरी चालेल.. त्याचपध्दतीने त्यांची वर्तणुक असते .. आणि एका ठिकाणी काही मिळत नाही म्हणून लगेच दुसरीकडे .. मग त्यात त्यांचा इगो आडवा येतो.. पुरुषी अहंकार सतावतो आणि Dignity हा संस्कारच ते विसरून जातात.. मग तो जवळचा मित्र असला तरीही कालांतराने तो आपल्याला नकोसा वाटतो..
आमच्या बापूच्या बरोबर विरूध्द उदाहरण एका व्यक्तीचं सांगते.. खरं तर डिग्नीटी सांभाळून वागणारे कमी असतील पण ते न सांभाळणाऱ्याची संख्या जास्त आहे. एका कोणाबद्दल न लिहीता अशा पर्सनॅलीटीबद्दल लिहीन.. मी एका गेटटुगेदरला गेले होते.. तिथे एक सद्गृहस्थ माझ्यापाशी आले आणि म्हणाले , सोनल छान दिसतेस.. छान मेंटेन ठेवले आहेस.. इथपर्यंत ठिक होतं .. मी Thanks म्हणुन तिथून बाजूला होणार तितक्यात ते म्हणाले , तुझा सचिन खूपच चांगला माणूस आहे गं , अगदी साधा सरळ त्यावर मी पटकन म्हटलं , मीच प्रपोज केलय त्याला मग चांगलाच असणार ना.. यावर त्यांचं वाक्य आलं , आता मलाही प्रपोज कर ना..मला तु आवडतेस.. यावरुन त्या माणसाची लायकी कळते.. स्वतः बिझनेसमन आहे.. उच्चवर्णीय आहे.. उच्चशिक्षीत आहे आणि मानसिकता ही अशी.. या व्यक्तीला अनेक गृपमधून याचसाठी काढण्यात आले.. अशा अनेक गोष्टी या व्यक्तीबद्दल बोलल्या जातात.. हे ऐकीव नसुन मी स्वतः अनुभवलय .. ऐकीव गोष्टीवर मी सहसा विश्वास ठेवत नाही.. अजून माझे अनेक मित्र हे याच कॅटॅगरीत येतात.. काही दिवसाने त्यांना भेटणं किवा बोलणही नको व्हायला लागतं..
तुम्हाला काय वाटतं ??
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *