जेव्हा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून जाता.. आणि बोलायची वेळ येते तेव्हा..

 

अनेक मंडळी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाना पाहुणी म्हणुन बोलावतात आणि मेन कार्यक्रम झाल्यावर मी बोलावं अशी इच्छा असणं हे नैसर्गिक आहे.. खरं तर काय बोलावं याची तयारी आधी करुन जाताच येत नाही कारण समोर असणारा ऑडीअन्स हा काय क्षमतेचा आहे आणि त्यांना काय द्यायला हवं त्यानुसार बोलावं लागतं.. कधी कधी आपल्या डोक्यात कार्यक्रमाबाबात वेगळ्याच कल्पना असतात पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळच असतं.. कार्यक्रमाला येणाऱ्या व्यक्तीचा उद्देश काय असतो , तिला खरच आपलं बोलणं ऐकण्यात इंटरेस्ट असतो का ??.. काही व्यक्तीना त्या कार्यक्रमाशी देणं घेणं नसतं तर टाईमपास म्हणुनही ती व्यक्ती तिथे आलेली असते.. काहीना खरच त्यातून काहीतरी शिकायचं असतं , जाणून घ्यायचं असतं.. अशावेळी वक्त्याची भाषा प्रभावी असावी लागते.. त्याला समोरच्याला खिळवून ठेवता यायला हवं.. आपली वाणी शुध्द हवी.. वेगवेगळ्या विषयांवर हातखंडा हवा आणि विशेष म्हणजे वक्ता हा नम्र असायला हवा.. बऱ्याचदा हुशारीने गर्व येतो आणि त्यामुळे प्रगती खुंटते… वक्ता खरा , प्रामाणिक , अभ्यासु हवा आणि तितकाच तो डाऊन टु अर्थ हवा.. लोक आपल्या विचारांना जेव्हा फॉलो करतात तेव्हा त्यांच्या लेखी आपण गुरुस्थानी असतो.. खुप वाचल्यावर चांगलं बोलता येइलच असं नाही किवा चांगलं लिहीता येइलच असं नाही तर ती कला असते आणि ती साध्य करायची असते.. वक्त्याच्या बोलण्याने सगळे चिडीचुप झाले पाहिजेत आणि जिथे पाहिजे तिथे आपल्याला टाळ्याही घेता यायला हवं.. माईक हातात आल्यावर ज्याला किती आणि काय बोलावं हे कळतं आणि कुठे थांबावं हे कळतं तो खरा वक्ता.. माईक हातात आल्यावर बऱ्याचदा याचं भान रहात नाही आणि आपण आपलं हसं करुन घेतो.. पुन्हा पुन्हा आपल्याला लोकांनी बोलवावं असं वाटत असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्यात असणं गरजेचं आहे.. सर्दीमुळे यावेळी मला बऱ्याच कार्यक्रमाना नाही म्हणावं लागलं पण काल ज्या कार्यक्रमाला गेले तिथे गौरीगणपती निमित्त सजावट स्पर्धा घेतली होती तिथे बक्षीस वितरण समारंभ होता ज्यात ११० महिलांना बक्षीसे द्यायची होती.. समोर असलेल्या महिला या लोअर ते हायर क्लास मधल्या होत्या.. काही कमी शिकलेल्याही दिसत होत्या तर काही उच्चशिक्षीत होत्या.. काही फोटोसाठी समोर यायलाही लाजत होत्या.. असा मिक्स गृप जेव्हा समोर असतो आणि आपल्याकडे बोलायला माईक दिला जातो तेव्हा मात्र सगळ्याना समजेल उमजेल आणि वैचारिक देता येइल अशा पध्दतीने आणि वेळेचं भान ठेवून बोलावं लागतं… आपण समोरच्याला आदर दिला तर आपल्याला मिळणार असतो त्यामुळे सेलीब्रीटी म्हणुन आपण जाताना आपल्यात कणभरही गर्व असता कामा नये कारण आपण सगळे समान आहोत ही भावना ठेवुन वागलो तर बाहेर आपल्या विषयी चांगली इमेज जाते कारण असा सन्मान मिळायलाही भाग्य लागतं आणि ते टिकवुन ठेवणं आपल्याच हातात असतं.. आपल्याकडे असलेल्या ज्ञानासोबत आपली मानसिकता आणि विचारसरणी कशी असते यावर आपण माणूस म्हणुन कसे आहोत हे ठरतं.. आपण सेलीब्रीटी कायमस्वरूपी नसतो पण माणूस म्हणुन उत्तम असु तर कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात रहातो.. वक्त्याला कोणीही गृहीतही धरु नये.. त्याची कृतज्ञता व्यक्त करायलाही विसरु नये आणि वक्त्यानेही आपण जिथे जातो त्याबद्दल कायम कृतज्ञ असावं कारण तेच आपलं मोठेपण असतं..
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं बऱ्याचदा होतं अशावेळी सय्यम कामी येतो आणि अशावेळी कृष्ण आठवल्याशिवाय रहात नाही ज्याने सुदर्शनचक्र हातात असताना बासरीला महत्व दिलं आणि हिरेजडित महालात राहून सुदामा सारखा मित्र जपला.. अर्जुनाला शिष्य बनवून कसं जगावं आणि कसं वागावं याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचा आदर्श ठेवून आपण वागत आलो तर जाऊ तिथे फक्त आणि फक्त स्वर्गच दिसेल..
#SonalSachinGodbole

 

#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *