मन हेलावणारी घटना

मन हेलावणारी घटना.. आणि एकीकडे समाधानही
काल आरतीनिमित्ताने वृध्दाश्रमात गेले होते.. मी येणार म्हणुन नेहमीप्रमाणे आज्जी आजोबा आनंदित होते.. तिथे एक सारंग दादा आहे .. जवळपास ५० चा असेल.. शरीर पॅरलाइज आहे.. देखणा.. खुप हुशार आणि विशेष म्हणजे त्याची इंग्रजीवर चांगली कमांड आहे.. त्याचं आणि माझं काय नातं आहे माहीत नाही पण ताई सांगत होत्या , सोनल मॅम तुम्ही येणार म्हटलं की त्याच्या चेहऱ्यावर जो काही आनंद असतो ना तो अवर्णनीय असतो.. गणपतीच्या आधी दोन दिवस तो मला विचारत होता हेही अनिता मॅम म्हणाल्या.. मी त्याला भेटल्यावर त्याची संपूर्ण बॉडी लॅंग्वेज बदलते.. तो नीट उच्चार करु शकत नाही पण तरीही त्याला खुप काही सांगायचे असते.. त्याच्या बहीणी आल्यावर तो इतका खुश होत नाही जितका मी तिथे गेल्यावर होतो.. नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असणार .. भगवंताची लिलाच अगाध..आपल्या अल्प बुध्दीने आपण या गोष्टी जाणूही शकत नाही.. समाधान याचं आहे की आपल्यामुळे कोणीतरी आनंदी होतय.. आपल्यामुळे कोणाला दुख व्हायला नको.. सारंगदादा असाच कायम सुखी राहुदेत.
याच वृध्दाश्रमात एक आज्जी आल्या आहेत ज्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही .. अलीकडे त्यांचा मुलगा वारला आणि त्याचदिवशी त्यांच्या सुनेने त्यांना स्मशानांत सोडून दिले.. हे काल मी ऐकले आणि अंगातले त्राण गेले.. हे त्यांचं कर्म म्हणायचे का ??.. कि चांगला विचार करुन अनिता ताईना सेवा करायची मिळालेली संधी समजायची ??.. इतका क्रूर विचार माणूस करु शकतो ??.. त्यांचं नशीब म्हणुन त्या वृध्दाश्रमात पोचल्या नाहीतर ??.. दुसरे एक काका जे मुळचे दिल्लीचे आहेत.. काही कारणाने ते पुण्यात आले होते त्यावेळी त्यांच्या पायावरुन कार गेली आणि ते तिथेच विव्हळत होते.. बराच वेळ ते तिथेच पडून होते..कोणीतरी त्यांना उचलून वृध्दाश्रमात आणून सोडलं.. ज्या कोणा व्यक्तीची गाडी त्यांच्या पायावरुन गेली असेल माणूस म्हणुन त्यांना दवाखान्यात नेणं ही त्यांची जबाबदारी नव्हती का ??.. ॲक्सीडंट असेल त्याने मुद्दाम केलं नसेल पण त्यांना उपचारासाठी नेणं हे नैसर्गिक आहे पण तरीही……. …

कुठे जाते माणुसकी ??.. कुठे जातं शिक्षण ??,, आणि संस्काराचं काय ??..आपल्याकडे असलेले लाखो रुपये आणि महागड्या गाड्या घेउन दारु पिउन गाडी चालवणं आणि किडे मुंग्यासारखी माणसे चिरडुन निर्लज्जपणे तिथून निघून जाणे यात नितीमत्ता कुठे आहे ??.. आपल्याला गर्व नक्की कशाचा आहे ??.. आपल्या पुढच्या पिढीने काय आदर्श ठेवायचा ??..
दरवेळी वृध्दाश्र्मात जाते आणि सुन्न होवून घरी परत येते.. पुढचे अनेक दिवस मी माझ्या श्रीकृष्णाशी बोलत असते.. त्याच्याकडे अनेक प्रश्नांची उत्तरे मागत असते पण आपलीच कर्म ही अशी त्यावर तो तरी काय उत्तरे देणार ना. सगळच त्रासदायक आहे आणि एकीकडे अनिता मॅम सारख्या पुण्यवान स्त्रीया अखंड सेवा करत आहेत याचा आनंदही होतो…सगळच अजब आणि गजब.. कितीही कलीयुग असलं , आपल्याकडे कितीही मानमरातब पैसा असला तरीही आपला विवेक जागृत ठेवायलाच हवा नाहीतर बासरी सोडून सुदर्शन हातात यायला वेळ लागणार नाही याची किमान जाण देउन वागता आलं तर बरं होइल..
#SonalSachinGodbole

#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

 

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *