हत्तीचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात ही म्हण आपण अनेकदा ऐकतो..त्याचा अर्थही जाणतो .. तरीपण समोरच्या व्यक्तीस ओळखण्यात गफलत होतेच होते. घरातल्या माणसांनी शंभर चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी त्यावर आपला विश्वास नसतो. पण बाहेरचा व्यक्ती एक गोष्ट सांगितली की लगेचच त्यावर आपला विश्वास बसतो. मागच्या चाळीस वर्षांपासून ऍड. बाळासाहेब आंबेडकर सांगतात की सर्व आरक्षणवादी एक होऊन सत्ता हस्तगत करू शकतो. धर्म धर्माच्या ठिकाणी राहू द्या आपण संधी वंचित एकत्र येऊन आमदार, खासदार निवडून आणू.राजपाट हाती घेऊ. किती दिवस असे प्रस्थापित मंडळीचे जोडे उचलत राहणार आहोत? ते सांगून सांगून थकले पण आम्ही काही त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही.
याउलट ते म्हणाले संविधान धोक्यात आहे आणि आम्ही ते वाचविणार आहोत…….यावर मात्र आमचा ताबडतोब विश्वास बसला आणि आम्ही आमच्या मताचे दान त्यांच्या झोळीत टाकले. पोरांना बापाचे काळजीपोटी बोलणे म्हणजे जाच वाटतो आणि शेजाऱ्याचे कारस्थानी बोलणे प्रेमाचा सल्ला वाटतो…..
काँग्रेस च्या उष्टावळी खाऊन ज्यांचे आतडे रंगून गेलेली आहेत त्या सालगडी रिटायर्ड गँगला वंचितांचे राजकारण नको आहे. मालकाच्या खुर्चीला धोका झाला तर त्याची झळ या गँगने गैरमार्गाने जमविलेल्या काळ्या कमाई पर्यंत येईल याच चिंते पोटी आमचीरिटायर्ड गँग वंचितावर चिखल फेक करीत आहे. वंचितांचे सम्यक आंदोलन यांना असम्यक वाटते आणि मालकाने ओकलेली गरळ मात्र बासुंदी समजून ओरपतात. हं आपल्याला प्रश्न पडला असेल की हे *उष्टावळ म्हणजे काय?* तर हे उष्टावळ म्हणजे मोठ्या लोकांनी जेवन करून पात्रावर जे शिल्लक उष्टे अन्न असे ते एकत्र करून एका भांड्यात ठेवले जाई व अस्पृश्यांना वाढले जाई असे ते अन्न…. नाईलाजाने पोटातील भुकेचा अगडोंब शांत करण्यासाठी ते किळसवाने अन्न आमच्या पूर्वजांनी त्याकाळी भक्षण केले पण आता……? आता या उष्टावळीचे स्वरूप बदललेले आहे…. आता विविध योजनांच्या स्वरूपात मांडलेल्या पत्रावळीवर मालकाचे ताव मारून झाल्यावर जी काही किडूक मिडूक शिल्लक असेल ती म्हणजे उष्टावळ.
ज्यांच्या पत्रावळीवरील उष्टावळ खाऊन ज्यांनी आपला पिंड पोसला आहे ते आपल्या मालकाप्रति वफादार असणारच. मग त्यांना वंचितांचे सम्यक राजकारण असम्यक आहे अशी ओरड करावीच लागेल…1960 सालच्या विधानपरिषद निवडणुकीत सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब रुपवते हे दोन रिपब्लिकन नेते एकमेकांच्या विरोधात उभे होते.कोणची हार आणि कोणाची जीत होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली होती. भैयासाहेब आंबेडकर यांचा पराभव होणार हे निश्चित होते पण यात एका बुजुर्ग व्यक्तीने मोलाची कामगिरी केली. ते म्हणाले,*डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलासाठी काहीही ठेवलेले नाही. रिपब्लिकन आमदारांनी याचे भान ठेऊन मतदान करावे.*
याचा परिणाम असा झाला की दुरुस्त आणि नादुरुस्त अशा दोनीही गटाच्या आमदारानी भानावर येऊन भैयासाहेब आंबेडकर यांना मते दिली आणि भैयासाहेब आंबेडकर आमदार झाले. भैयासाहेब आंबेडकर निवडून आले आणि दादासाहेब रुपवते पडले तरी त्या दोघांतील ऋणानुबंध शेवटपर्यंत कायम होता (आमदार भैयासाहेब आंबेडकर. ज. वि. पवार ) ते बुजुर्ग होते रावबहादूर सी. के. बोले.
आमच्या अवकाश प्राप्त फतवेकरी अधिकाऱ्यांना सी. के. बोले यांची भूमिका करता अली असती पण ती उष्टावळ आड येते….. म्हणतात ना ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. भीड काही केल्या सुटेना. नाळ काही तुटेना .मालकाने पान खाऊन अंगावर थुंकले तरी म्हणणार वा छान रंग लागला…मग कसला मान आणि कसला स्वाभिमान?
उलट मलाच धमकीचे फोन करतात. असे करू, तसे करू म्हणून धमकावतात… बापाच्या पेन्शन वर जगणारा, तू बौद्ध आहेस का?धम्म दिक्षा कधी घेतलीस ते प्रमाणपत्र टाक. पथभ्रष्ट माणसा..काँग्रेसला विरोध करतोस काँग्रेस होती म्हणून आज तू जिवंत आहेस .. वगैरे वगैरे…….
आता अली ना पंचाईत….माझ्या मते
मी कमरेला करदोरा बांधला असता, रक्षाबंधन साजरा केला असता, दिवाळीत घरभर दिवे लावले असते, चोरी, चहाडी केली असती, व्याभिचार केला असता, दारू ढोसली असती, नाच तमासे पाहत असेन, मुलाच्या वाढदिवसात बुद्ध रूपाची मांडणी करून बुध्दापुढेच बिर्याणी झोडली असती, लग्नात हळदीच्या नावाखाली डी. जे. लावून नंगा नाच केला असता. चोरून लपून नवस फेडण्यासाठी कंदुरी केली असती. लंग्न झाल्यानंतर कुलदैवताच्या पाया पडायला गेलो असतो, दृष्ट लागूनये म्हणून पायात काळा दोरा बांधला असता तर मी पथभ्रष्ट झालो असतो…….. तरी ही मी पथभ्रष्ट असेलआणि काँग्रेसची चापलुसी करणारे फतवा बहाद्दर सुशील असतील तर उत्तमच आहे की…..
गणपत गायकवाड नांदेड
9527881901