आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते बारूळ सर्कल मधील 36 कोटी रुपये कामाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न
कंधार =प्रतिनिधी=
लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या शुभहस्ते तालुक्यातील बारूळ सर्कल मधील विविध विकास कामांचे उदघाटन काल दि. 18 सप्टेंबर बुधवार रोजी संपन्न झाले,वेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्यां सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत दादा शिंदे,तहसीलदार गोरे, उपविभागीय अभियंता सुमित पाटील,हे प्रमुख उपस्थित होते, यावेळी पेनुर, सोनखेड,कलंबर, बारूळ, पेठवडज, मुखेड रस्ता रा. मा. 255 किमी 70/00ते 76/200 बारूळ ते वरवंट रस्त्याची सुधारणा करणे, बारूळ गावांतर्गत सी. सी रस्ता बांधकाम या लांबीतील सुटलेल्या लांबीची सुधारणा करणे 73/100, नंदनवन गावाजवळील 66/300 पुलाचे पोचमार्गाचे बांधकाम तालुका कंधार 8कोटी रुपये, कंधार तालुक्यातील बारूळ येथील शासकीय धान्य गोदाम बांधकाम करणे 398.21लक्ष रुपये, बारूळ गावाअंतर्गत विविध विकास कामे 53 लक्ष रुपये, कंधार व लोहा तालुक्यातील पेनुर, शेवडी, सोनखेड, कलंबर, बारूळ रस्त्याचे रुंदीकरण व पूल मोऱ्यासह सुधारणा करणे रा.मा. 255 किमी 74/00 ते 75/00 व 76/00ते 80/520- 7.5 कोटी रुपये, अहमदपूर, घोटका, शिंदगी, कुरुळा, कंधार,बारूळ, गडगा रस्त्याचे रुंदीकरणासह सुधारणा करणे रा.मा. 56 किमी, अ )किमी 228/350ते 229/400, बाचोटी गावाजवळील डोंगराची घाट कटिंग करणे व किमी 240/300ते 241/800, नामदेव महाराज मठ संस्थान ते बारूळ कॅम्प गावातील सीसी रस्ता किमी 241/800ते 248/500 बारूळ कॅम्प ते रा.मा.161अ )ता. कंधार 16कोटी रुपये, वरील सर्व 36कोटी रुपये कामाचे विविध विकास कामाचे उद्घाटन लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या शुभ हस्ते काल दि. 18 सप्टेंबर रोजी मोठया उत्साहा त संपन्न झाले असून विविध विकास कामांचे उदघाटन झाल्यानंतर महादेव मंदिर मंगल कार्यालय बारूळ येथे सायंकाळी आयोजित जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते,मतदारसंघातील अनेक प्रलंबित विकास कामे माझ्या कार्यकाळात पूर्ण करण्याला मी प्राधान्य दिले असून महिलाचे सक्षमिकरण करण्यासाठी प्रयत्नशील असून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करण्यासाठी मी कटिंबद्ध असल्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्त्यां आशाताई शिंदे बोलताना म्हणाल्या की मतदारसंघातील सुजाण जनता विकासाच्या पाठीशी खंबीरपने उभी असून आमदार शिंदे
कुटूबीय मतदारसंघाच्या विकासासाठी तत्पर असल्याचे बोलताना सांगितले, यावेळी कार्यकर्ते पदाधीकारी, गावकरी, महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.