अरे लाज कशी वाटत नाही तुम्हाला

दरवर्षी येतांना वाटत असतं की यावेळी तरी काही सुधारणा असेल पण दिवसेदिवस निलाजरेपणाचा कळस आहे.. मला घरी घेउन येतांना माझा चेहरा झाकून घेउन येता.. तुम्हाला रील्स करायचे असतात किवा फोटो काढायचे असतात किवा तुमची हौस भागवायला सजावट करता.. स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवायला मोदक करुन खाता.. मी जर का खरच मोदक खाल्ले असते ना एकवीस कुठले तर एकच मोदक समोर ठेवला असता… आणि तुमची हौस भागली की मला वरुन विहीरीत फेकून देता अगदी एखादा दगड फेकल्यासारखा..

अरे प्राणप्रतिष्ठा करुन तुम्ही माझ्यात प्राण आणता ना .. मला देवत्व बहाल करता ना.. मग फेकताना मला लागत असेल हा साधा विचारही मनाला शिवत नाही .. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणुन मला वेगवेगळी आमीषे दाखवता.. मला मुलगा होवूदेत मी तुला ११ नारळाचे तोरण वाहीन म्हणता आणि मुलगा झाल्यावर नारळ स्वस्त कुठे मिळतात याचा विचार करता आणि कपड्याने कपाट भरलेले असताना हजारो रुपये कपड्यावर खर्च करता…मी विघ्नहर्ता आहे त्यामुळे तुमच्यावर आलेली संकटे दुर करणं माझं काम आहे पण म्हणुन तुम्ही मला गृहीत धरु नका ना.. तुम्हाला जसा आदर हवा तसा तो मलाही हवा असतो .. तुम्ही कसेही वागला तरी मी तुमच्याबद्दल वाईट विचार करत नाही .. माझ्या मंडपाच्या मागे तुम्ही जुगार खेळता.. पत्ते खेळता..दारु पिउन नाचता त्यावेळी मला काय वाटत असेल याचा जराही विचार तुमच्या मनात येत नाही ??.. तुम्हीच पाण्यात प्लॅस्टिक बॅग किवा बाटल्या फेकता.. निर्माल्य फेकता आणि त्यातच मला नेउन ठेवता त्या घाणीने माझा श्वास कोंडतो रे.. माझे हात पाय अस्त्ताव्यस्त नदी / समुद्र किनारी पसरलेले असतात.. धड एकीकडे , पाय एकीकडे , डोकं तिसरीकडे तुम्ही तुमचे विसर्जन करुन कर्तव्य पार पाडता पण यामुळे निसर्गाचे किती नुकसान होते याचा कधी विचार केलाय का ??.. १० दिवस नको ती गाणी लावून डिजेवर नाचत बसता त्यावेळी त्या आवाजाचा मला आणि निसर्गाला काय त्रास होत असेल याचा विचार एकालाही करावा वाटत नाही याची खंत वाटते.. १० दिवस प्राणी / पक्षी जीव मुठीत धरुन बसतात..त्या मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही ..

 

वयस्कर मंडळी , पेशंट , लहान मुले या सगळ्याचा विचार तुम्ही कधीही करणार नाही का ??.. कोणी सांगायला आलं की म्हणता आपल्याच सणाना रेस्ट्रीक्षन का ??.. अरे हा प्रश्न विचारताना लाज कशी वाटत नाही ..बदलाची सुरुवात ही आपल्यापासून करायची असते तरच बदल होवु शकतो.. राजकारणी सुध्दा सगळीकडे मान घेत फिरत असतात पण प्रगती कोणालाच करायची नाही.. मते आणि खुर्ची यासाठी चाललेले गचाळ राजकारण हे आपल्या भविष्यासाठी विष आहे हे का लक्षात येत नाही.. थोडी जरी लाज शिल्लक असेल आणि देवाबद्दल करच काहीतरी वाटत असेल तर विसर्जन न करता कायमस्वरूपी मूर्ती बसवून त्याची मनोभावे पुजा करा..आरत्या नीट उच्चार करुन पाठ करा.. अथर्वशीर्ष नीट उच्चार करुन अर्थ समजून घ्या.. सगळ्यानी एकत्र येउन शांततेत उत्सव नक्कीच होवु शकतात.. टिळकांचा तोच उद्देश होता रे.. आपल्या इगोपायी प्रत्येकाने त्यात रंग भरले आणि सगळ्याचा बेरंग करुन टाकला.. भगवंत सगळं पहात आहेच एकदा त्याने शस्त्र काढलं तर गणपतीतला ग उच्चारायला जीभ जागेवर राहायची नाही.. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा विनाशाला कारणीभूत ठरतो.. निर्माल्य जिरवून उत्तम खत करु शकता.. शाडुची माती परत वापरून त्यापासून पुन्हा मूर्ती तयार होवु शकते.. घरात बादलीत विसर्जन होवु शकते..

सदसदबुध्दीने वागलात तर खुप काही साध्य करता येउ शकते.. सणसमारंभ साजरे करतांना अनेक प्रकारे दानधर्म होवु शकतो.. तुमच्या हातात आजपासून ३६५ दिवस आहेत.. या सगळ्यावर नक्की विचार करा .. पुढच्या वर्षी भेटू असं मी तुम्हाला सांगतो पण शहाण्यासारखे वागा रे..वाईट गोष्टी पसरवणाऱ्या लोकांच्या बोलण्यात येउ नका.. आणि जात धर्म तर अजिबात मधे आणू नका.. एक संधी देतोय.. आशा करतो की सुधारणा दिसेल… तुमचाच नाराज गणु..
#SonalSachinGodbole

#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *