कंधार पोलीसांनी गोवंश जनावरे पकडुन ३,०५,०००/- रु. मुद्देमाल केला जप्त ;ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत कार्यवाही करून तीन बैलाची सुटका

 

कंधार ( प्रतिनीधी संतोष कांबळे )

गोवंश जातीच्या बैलाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या इसमावर ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत कार्यवाही करून कंधार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. यात पोलिसांनी पीकअप सह तीन लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

नांदेडचे पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैद्य जनावरांची वाहतुक करणारे इसमावर कार्यवाही करण्याचे ओदश दिले होते. त्या अनुषंगाने कंधार येथे कार्यरत असलेली पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना गुप्त बातमीदाराकडुन जांब मार्गे कंधार कडे एक पीकअप वाहन क्र एमएच-२६/ बीई- ८५४८ मध्ये गोवंश जातीची जनावरे कोंबून जांब मार्गे कंधार कडे नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे,सपोउपनी महागावकर, राजेश श्रीरामे, प्रकाश टाकरस, जुने, धुतमल, यांनी सदरील वाहनावर मौजे दिग्रस जवळ रोडवर थांबून पाहणी केली असता त्यात गोवंश जातीचे तीन बैल निर्दयतेने बांधून असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी कंधार येथील रिझवान खदीर कुरेशी, रौफ मस्तान कुरेशी, व वाहन चालक अंकुश रेशमजी
कांबळे या तिघांकडून सुमारे एक लाख पाच हजार किमतीचे बैल व पिकअप वाहन जप्त करून कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून त्या तीन बैलांची वैद्यकीय तपासणी करून गो शाळेत दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *