नवरात्रीस्पेशल.. पिवळा रंग..

 

या नउ रंगांच्या कपड्याबाबत कायम उलटसुलट चर्चा कानावर येतात.. कोण म्हणतं हा मार्केटिंग फंडा आहे .. असेलही पण यापुढे जाऊन आपला आनंद , आपली हौस , नटणं मुरडणं यासाठी म्हणुन याचा उपयोग करायला काहीही हरकत नाही.. स्त्री म्हणजे देवीचेच रुप मग आपल्याला जसं हवं तसं आपण जगावं.. कधी राधा होवुन कृष्णावर प्रेम करावं.. कधी सीता होवून रामाशी एकरूप व्हावं ..हे सगळं असतांना मी नउ दिवस नउ रंगावर लिहीणार आहे पण ते कृष्णाचे नउ गुण त्या रंगांशी जोडणार आहे..
आजचा पहिला रंग मी सुर्यफुल या फुलाशी आणि कृष्णाच्या एका गुणाशी जोडायचा प्रयत्न करणार आहे.. रंग हे फक्त आपल्या कपड्यातच नसतात तर गुणातही असायला हवेत आणि एकमेव श्रीकृष्ण असा आहे जो सगळ्या रंगानी परिपूर्ण आहे.. सुर्याच्या दिशेने फुलणारे एकमेव फुल आणि आजचा कृष्णाचा पिवळा रंग म्हणजे प्रेम..

आपल्याला माहीत असलेलं प्रेम हे शारीरिक आहे पण कृष्णाने दाखवुन दिलेलं प्रेम हे शरीरापलिकडे आहे.. अनेक स्त्रीयांच्या संपर्कात राहून त्यांना स्पर्श न करता त्यांच्यावर प्रेम करायचं आणि कुठल्याही गोपीला गर्व झाला की तिथून बाजूलाही व्हायचं हे श्रीकृष्णाकडून शिकावे.. त्यागात प्रेम असतं हे श्रीकृष्ण त्याच्या कृतीतुन दाखवतो म्हणुन तो राधेला सहज सोडुन जाऊ शकतो.. कारण विरक्ती आणि आसक्ती या दोन शब्दांचा अर्थ फक्त याच्याकडूनच शिकावा.. गाईच्या पायात चप्पल नाहीत म्हणुन स्वतः चप्पलशिवाय काट्याकुट्यात चालणारा कृष्ण हा गाईवरील प्रेमाचे उत्तम उदाहरण आहे.. प्रेम फक्त स्त्रीवरच करायचे नसते तर त्याच्या विवीध लिलानी त्याने प्रेमाची व्याप्ती संपूर्ण विश्वाला समजावून दिली.. जन्म एकीच्या उदरातुन आणि जडणघडण दुसरीच्या संस्कारातुन .. जन्म तुरूंगात आणि हातात संपूर्ण विश्वाची किल्ली.. रंग सावळा तरीही सगळ्याचा प्रिय कृष्णा..

गोऱ्या रंगातच फक्त रुप नसतं हे त्याच्याकडे पाहून कळतं… अहंकार , गर्व सोडून एका झाडावर बसून तासनतास बासरीत रमणारा कृष्ण हा अनेक प्राणी पक्षी यांच्या प्रेमाची ग्वाही देतो.. कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं असं म्हणतात ना ?? .. मग अशा प्रेममयी जगात आपल्याला फक्त प्रेम का दिसत नाही ???.. तिथे वासना का मधे येते ??.. वासना ही शरीरातुन येते म्हणुन आत्म्यावर प्रेम करणारा मनुष्य कायम कृष्णाला प्रिय आहे.. जे शाश्वत आहे तेच सत्य आहे आणि जे सत्य आहे तिथे कृष्ण आहे आणि जिथे कृष्ण आहे तिथे राधा , दुर्गा , रुक्मीणी , भामा सगळ्या आहेत.. आदरात असलेलं प्रेम दाखवायला त्याने द्रौपदीला मदत केली आणि स्त्रीच्या अवयवात सौंदर्य न पहाता तिचा पदर सावरुन आपल्यात असलेले पुरुषत्वाचे ताकदवान प्रेम कुठलीही शारीरिक ताकद न लावता संपूर्ण विश्वाला दाखवून दिले.. आज पिवळ्या साडीत तुम्हाला सुंदर स्त्रीया दिसल्या तर कृष्ण होवुन सौंदर्य पहा .. प्रत्येक स्त्री तुम्हाला वेगळी दिसेल.. निसर्गाने लुटलेलं नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला पहाता येइल.. पि हळद हो गोरी म्हणजेच काय तर रंग गोरा नको तर विचार गोरे हवेत.. प्रत्येक क्षण जगताना कृष्ण होवुन जगा .. सगळीकडे फक्त राधाच दिसतील..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *