काल लिहील्याप्रमाणे प्रत्येक रंग हा कृष्णाच्या एका गुणाशी जोडून त्यावर मी लिहीणार आहे.. हिरवा रंग सृष्टीचा रंग.. शांततेचं प्रतिक… हिरवा चाफा हे फुल दिसायला तसं सुंदर नाही पण सुगंध म्हणजे……. अहाहा…
लपविलास तु हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का ??.. इतका तो सुगंधी आणि याचा संबंध मी कृष्णाच्या मित्रत्व या गुणाशी जोडणार आहे.. आपल्याकडे असं बोललं जातं कि मैत्री करताना आपल्या तोलामोलाच्या व्यक्तीसोबत करावी म्हणजेच काय तर पैसा , प्रतिष्ठा , त्या व्यक्तीचं नाव हाच खरा तर क्रायटेरीया असतो.. बऱ्याचदा तर जात , धर्म हेही गृहीत धरले जाते .. आपण असं वागणार हे त्याला माहीत होतं त्यामुळे त्याने हिंदु हा शब्द सुध्दा वापरला नाही.. जिथे धर्म नाही तिथे जातीचा तर संबंधच नाही.. वर्ण हा शब्द वापरुन गरीब सुदाम्याला जवळ करुन त्याने मैत्री हे सुंदर नातं कसं निभवायचं हा सुंदर मेसेज संपूर्ण जगाला दिला .. रत्नजडीत महालात रहात असताना माणिक , पाचू ही रत्ने फक्त चमकणारी रत्ने असली तरी सुदाम्याने आणलेले मुठभर पोहे हे त्या रत्नापेक्षा किती श्रेष्ठ आहेत हेच दाखवुन दिलं.. अर्जुनाला ज्ञान देत असताना त्याचा सारथी बनला कोणासाठी तर संपूर्ण जगासाठीच ना.. त्याने त्याचा रथ हाकुन मैत्री कशी असावी याचं सुंदर उदाहरण जगाला घालून दिलं आणि आम्ही ??.. आम्ही फायद्यासाठी मित्र जोडायला लागलो.. तो काय देउ शकतो का ?? हे पाहून मैत्री करु लागलो..
सोशल मिडीयावर मित्र जोडताना त्याच्याकडे कुठली गाडी आहे हे पाहु लागलो.. त्याने मेसेज केला तर मी करेन.. त्याने माझ्या वाढदिवसाला केक आणला तर मी आणेन.. त्याने हे केलं तर मी ते करेन यात मैत्री कुठे आहे ??.. यात आपुलकी , जिव्हाळा कुठे आहे ??.. हिरवी सृष्टी आणि आकाश हेही दुरवर असून चांगले मित्र आहेत म्हणुन भेगाळलेल्या भुमीची अवस्था पाहून आकाशाला रडु येतं आणि त्याच्या अश्रूनी सर्व सृष्टी हिरवीगार होते.. नातं असं असावं .. मैत्री अशी असावी आपल्याला जे जे देता येइल ते ते आपण मित्रांना द्यायलाच हवं.. कृष्णाने सुदाम्याला रत्नजडीत महाल दिला .. आपण आपल्या मित्राला म्हणतो , घेरे घोटभर काय होतय असं म्हणत त्याला व्यसनासाठी प्रवृत्त करतो.. खरं तर आपण मित्राला वाईट गोष्टी करण्यापासून दुर ठेवायला हवं पण बऱ्याचदा त्याच्या भावनांशी खेळत त्याच्या बायकोवर नजर ठेवून स्वार्थी बनतो.. कृष्णाच्या एकेका गुणावर बोलावं तितकं कमीच आहे.. काही मंडळी त्याला भगवंत मानायला तयार नाहीत.. नका मानु पण प्रत्येक क्षण जगताना फक्त त्याचा एकेक गुण जरी आठवला तरीही आपण वाईट कृत्य करणार नाही.. त्याच्याकडे आयडॉल म्हणुन पहा.. त्याच्याकडे सुप्रीम पर्स्नॅलीटी म्हणुन पहा .. जेव्हा जेव्हा मार्ग हवाय तेव्हा तेव्हा त्याला हाक मारा तो मित्राच्या रुपात आपल्या भवती रुंजी घालतो.. कारण त्याच्या इतका उत्तम सखा आणि पार्टनर सतत हिरवागार फ्रेश मित्र या जगात दुसरा कोणीही नाही..
जसा हिरव्या चाफ्याचा सुगंध लपवु शकत नाही तसा खऱ्या मैत्रीचा सुगंध हा कायम दरवळत रहातो.. उद्या भेटु त्याच्या अजून एका गुणासोबत..
सगळ्याना हिरव्यागार शुभेच्छा
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist