कंधार = प्रतिनिधी
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याहस्ते मंगळवारी १८५ कोटी रूपायांच्या विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण करण्यात येणार आहे. यात शहरातील शंभर कॉटच्या उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश असून सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सकाळी साडे अकरा वाजता लोकार्पण सोहळा होणार आहे.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयासाठी आमदार शिंदे यांनी शासन दरबारी सत्याने पाठपुरावा करून ६६ कोटीचा निधी उपलब्ध करून घेतला. या निधीतून लोहा रोडवर अद्यावत असे रुग्णालयाचे काम झाले आहे. या रुग्णालयामुळे कंधारच्या वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होणार असून रुग्णांची गैरसोय थांबणार आहे.
पानभोसी ते पांगरा ते खुड्याचीवाडी ते लाठ (खु.) पर्यंत रस्ता ११ कोटी, कंधार सार्वजनिक बाधंकाम विभागातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाचे बांधकाम २.८० कोटी, वंजारवाडी गावात पुल बांधकाम १.०२ कोटी, घोडज ते कंधार रस्ता, बहादरपुरा ते पानभोसी रस्ता १५ कोटी,
बहाद्दरपुरा गावाजवळील मन्याड नदीवरील पुलाचे पोचमार्ग ६ कोटी, कंधार येथील जाधव हॉस्पीटल ते बहाद्दरपुरा गावापर्यंत सी.सी. रस्ता २५ कोटी,
बसवेश्वर महाराज पुतळा ते पांगरा रस्ता बांधकाम १० कोटी, पानशेवडी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम ११.५० कोटी, बहाद्दरपुरा गावातील टॉवर पासुन डॉ. धोंडगे यांच्या घरापर्यंत रस्ता २ कोटी, कंधार येथे शासकीय गोदामाचे बांधकाम ५.७५ कोटी असे एकूण १८५ कोटीच्या विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आमदार शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत दादा शिंदे यांनी केले आहे.