नांदेड ; प्रतिनिधी
नांदेड पंचायत समितचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांना नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
व्यंकटेश चौधरी हे साहित्यिक, कवी म्हणून परिचित आहेतच. याशिवाय त्यांनी शिक्षण विस्तार अधिकारी असताना विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना प्रेरणादायी नवनवीन उपक्रम राबविलेले आहेत. त्यामुळे त्यांची उपक्रमशील अधिकारी म्हणून नांदेड जिल्ह्यमध्ये वेगळी ओळख आहे. गोरगरीब कुटुंबातील लेकरांना उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी महापालिकेच्या वतीने शहरामध्ये शाळा सुरू केलेल्या आहेत.
यामध्ये असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत असताना दिसत आहे. परंतु, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहेत. श्री. व्यंकटेश चौधरी रुजू झाल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. दरम्यान श्री. व्यंकटेश चौधरी यांची मनपाच्या शिक्षणाधिकारीपदी निवड झाल्यामुळे साहित्यिक क्षेत्रांतून त्यांचे स्वागत होत आहे.