सोलापूर जिल्हा शिक्षक महासंघाची सभा उत्साहात संपन्न* *शिक्षक महासंघ ही खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करणारी शासन मान्य संघटना:– कां. रं.तुंगार*.

 

*सोलापूर:– खाजगी प्राथमिक शिक्षकांना सेवाशर्ती नियमावली, वेतन पथक, पेन्शन हे काहीच नव्हते. शिक्षक महासंघाने शासनाशी अविरत लढा देऊन महाराष्ट्रातील खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या जीवनात स्थैर्य निर्माण केले असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक कां. रं.तुंगार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभे प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले की अनेक शिक्षकांच्या संघर्षातून,त्यागातून हे महासंघ उभे राहिले आहे.सोलापूरच्या कै. चं. का. कोळशेट्टी यांचे प्रेरणादायी कार्य, त्यांचा आदर्श आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे आणि हे महासंघाचे कार्य एक व्रत म्हणून स्वीकारले पाहिजे असेही ते म्हणाले.

*यावेळी व्यासपीठावर सभेच्या अध्यक्षा सुवर्णा अत्रे, मुख्यसचिव विठ्ठल उरमुडे, अहमदनगर जिल्हा सचिव शेखर उंडे, ज्येष्ठ मार्गदर्शक माणिक आवारे, राजाभाऊ चव्हाण, माला दुबे, राज्य संघटनमंत्री कृष्णा हिरेमठ, राज्य उपाध्यक्षा राजश्री तडकासे,जिल्हासचिव विश्वजीत माणिकशेट्टी,उपाध्यक्षा महानंदा सोलापुरे, माजी नगरसेविका इंदिरा कुडक्याल उपस्थित होते*.
*सभेची सुरुवात कै. चं. का. कोळशेट्टी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली*. *प्रास्ताविक करताना राज्य संघटनमंत्री कृष्णा हिरेमठ यांनी शिक्षक महासंघाच्या उल्लेखनीय कार्याची माहिती सांगितली व सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजुटीने शिक्षक महासंघाचे कार्य करण्याचे आवाहन केले.*

*याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचा व जिल्हा सचिव विश्वजीत माणिकशेट्टी यांना कोल्हापूरचा KOP माझा News कडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.*
*मुख्यसचिव विठ्ठल उरमुडे यांनी सर्वांना सविस्तर मार्गदर्शन केले मा. शिक्षणमंत्री व मा शिक्षण संचालक यांच्या समवेत प्रलंबित प्रश्नाबाबत झालेल्या चर्चेचा वृत्तांत त्यांनी सांगितला.*

*याप्रसंगी बालवाडी शिक्षिकांनी महासंघाला निवेदन देऊन बालवाडीचा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. यावेळी शेखर उंडे, माणिक आवारे, माला दुबे,सुवर्णा अत्रे, इंदिरा कुडक्याल,पल्लवी नादरगी यांनी मनोगत व्यक्त केले*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्षा महानंदा सोलापूरे यांनी केले तर आभार जिल्हासचिव विश्वजित माणिकशेट्टी यांनी मानले.*
*या सभेस नलिनी द्यावरकोंडा, प्रतिभा पवार, अशोक होळीकट्टी, सागर स्वामी, शुभांगी बुट्टे, संगीता सक्करगी,करुणा लामकाने, गुरुसिद्धप्पा पाटील, अमोल सगर, रेणुका चंद्रशेखर, सुजाता जाधव, सुधाकर कामशेट्टी, चिदानंद पाटील, महारुद्रय्या स्वामी आदि पदाधिकारी व बालवाडी शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *