बहुधा जानेवारी महिना असावा . तारीख असेल 22 किंवा 23 . वर्ष १९८८ . त्याकाळी सांस्कृतीक कार्यक्रमांची रेलचेल असायची . २६ जानेवारी हा दिवस मोठ्या धामधूम पद्धतीने साजरा व्हायचा . विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहचलेला असायचा . २६ जानेवारी साजरी करायची म्हणजे तो पूर्ण महिना शाळेतील मुलंमुलीं कार्यमग्न असत . २५ जानेवारीला मुलंमुलीं रात्रभर झोपायचीच नाही .अभ्यास कमी व इतर अभ्यासपुरक कार्यक्रम जादा राहयचे . वर्गसजावट, वेगवेगळ्या विषयावर भाषण, वक्तृत्व स्पर्धा , हस्ताक्षर स्पर्धा , प्रश्नमंजूषा असे कितीतरी कार्यक्रम व्हायचे . प्रथम बाकावरचे व शेवटच्या बाकावर बसणारे सर्वजन यात हिरहिरीने सहभाग नोंदवायचे . त्यांचा उत्साह पहाण्यासारखा ,नोंद घेण्यासारखा असायचा .
जानेवारी १५ पासूनतर मुलांमुलींनी मैदान फुलून जायचे . वेगवेगळ्या मैदानी स्पर्धा व्हायचे . यात मुख्य म्हणजे कबड्डी , खोखो , धावने , क्रिकेट खेळ व्हायचे . जेबी पाटील सर क्रिडाशिक्षक , जीबी अवचार सर , जेबी भांडवले सर यात हिरहीरेने भाग घ्यायचे . शाळेत शिक्षक म्हणून माझं वय जेमतेम दिडदोन वर्षाचा होतं. . मी त्यांचा आजुबाजूने रांगत फिरत असे . काही जबाबदारी दिली की मनलावून पार पाडत असे . त्यात मलाही खूप आनंद मिळत असे . मी खेळणाऱ्या व नखेळणाऱ्या मुलांमधेच रमायचो . विद्यार्थ्यांना ही माझ्या सोबत राहण्यास गप्पा मारण्यास आनंद मिळत असे .
२६ जानेवारी पूर्वी एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे “स्वंयशासनदिन ” या दिनाची मौजमजा , आनंद काही औरचं राहायचा . स्वंयशासन दिनापूर्वी मुख्याध्यापक नोटीस काढायचे . त्यात फक्त इयत्ता दहावी वर्गाचेच मुलेमुली सहभाग घेतील अशी स्पष्ट सूचना असायची . ही सूचना आली म्हणजे शाळेतील मुलांमध्ये आनंद संचारायचा . मुख्याध्यापक कोण? उपमुख्याध्यापक कोण? पर्यवेक्षक ते शिक्षक व सेवक पदांपर्यंत चर्चा व्हायची . एखादी हुशार मुलगा ही सेवकाचं काम करायला तयार व्हायचं . सर्व विद्यार्थी शिक्षकांला त्या मुलाचं अप्रुप वाटायचं .त्याचं कौतुक व्हायचं . दहावा वर्ग कामाला लागयचं . आपआपल्या वर्ग शिक्षकाला वेळापत्रक कस तयार करावा , पाठकसा घ्यावा , सहभाग घेवूकी नको या विषयी चर्चा घडायची .
शक्यतो दहावीतील सर्वात हुशार मुलगा/ मुलगी मुख्याध्यापक व्हायचं . मग उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक शिक्षक व्हायचे.बहुधा जानेवारी २३ असेल शाळेत शिक्षक दिन साजरा होणार होता . त्यासाठी शाळेतील चुणचूणीत हुशार मुलाची निवड दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केली होती . हा विद्यार्थी रंगाने गोरापान . काळेशार केस . सरळनाक बोलके व पाणीदार डोळे असलेला .याचा चेहारा सदाहसरा असायचा . थोडसं लाजराबुजरा होतं. राग आलं की गाल गुलाबी व्हायचे .अभ्यासत नेहमी नंबर एक . वेळेवर सांगितलेलं अभ्यास करणारा सर्व शिक्षकांची आज्ञा पाळणारा हा विद्यार्थी होता अमोल माणिकचंद रोकडे .
मुख्याध्यापक म्हणजे रुबाबदार व जबाबदार व्यक्ती होतं . स्वंयशासन दिनी तो काळकोट परिधान करून आला होता . गोर्या रंगाला काळाकोट शोभून दिसत होता . आदरणीय अवचार सरांनी त्या दिवसाचं वेळापत्रक तयार करून दिले होते . त्यानुसार शाळा सुरु झाली . मला परीक्षक म्हणून नेमले होते . अमोल हातात रुळ घेवून प्रत्येक वर्गाच्या समोरुन फिरुन प्रत्येक वर्गाचा जायजा घेत होता . मध्येच फिरणाऱ्या विद्यार्थ्यांला डाफरत होता . शिस्त ठेवा शिस्त पाळा म्हणून सांगत होता . शाळा सुरळीत चालू होती . मी मला दिलेल्या गुरुजीच्या यादी प्रमाणे पाठतपासणी पूर्ण केलो . उगीच दुसऱ्या वर्गावर ही जावून आलो व थोडा वेळ गप्प बसलो . गप्पबसणे मलाही जमत नाही .
थोड्या वेळानंतर मी मुख्याध्यापक अमोलच्या कार्यालयात जावून बसलो .जाताना परवानगी घेतली . तो आदबीने या म्हणाला . बसायला खुर्ची दिली . मी कोण म्हणून ही विचारलं . माझ्यासाठी पाणी मागविलं . मी धन्यवाद म्हणून त्याच्या समोर बसलो . मुख्याध्यापक अमोल आगदी थाटात , रुबाबत बसला होता . ऑफ तास असलेले एकदोन गुरुजी समोर बसलेले होते . एका कोपऱ्यात कारकून थांबून काही तरी आदेशाची वाट पहात होता. बाहेर सेवक दिमतीला होता .
आता मला अमोलची परीक्षा घ्यायची हुक्की उठली . मी अमोल म्हणालो , ” साहेब मी खेडेगावून आलोय . मला माझ्या मुलाची टि.सी . पायीजे ” अमोल माझ्या तोंडाकडे पाहात स्मित हास्य केलं व म्हणाला , ” टि.सी . चं काय काम पडलंय ? ” मी म्हणालो , ” सायेब लई भारी काम पडलयं माझ्या मुलाला नोकरी लागायली . आता मला टिसी दया .” सुरुवातीला अमोल थोडं नकळत गोंधळला , आडखळला .कपाळावर नकारात्मक आट्या झळकल्या पण ताबडतोब सावरत मला म्हणाला, ” टिसी साठी आर्ज दिलंय का? ” मी म्हणालो , ” नाही सायेब ” तो हसला व पटकन म्हणाला , ” टिसी साठी आर्ज द्यावा लागतो . आर्ज दिल्यानंतर तीन दिवसांनंतर या तुम्हाला टिसी मिळेल ” . मी गयवया करत म्हणालो , ” सायेब म्या खेडेगावचं हाय . मुलाला नोकरी लागायली . आज द्या की सायेब मला म्या लई गरीब हाव”
अमोलने टेबलवरची बेल वाजवली . बेलवाजवताना ही त्याचं रुबाब उठून दिसत होतं . सेवक आला व आगदी नम्रपणे खाली वाकून म्हणाला , जी साहेब हुकूम . ” ” जा आपल्या कारकूनाला बोलावून आण ” . कारकून लगबगीने जावून कारकूणाला बोलावून आणलं . अमोल मुख्याध्यापकी थाटात म्हणाला , ” हा माणुस आडाणी आहे . त्यांला लिहिता वाचता येत नाही . त्यांना त्यांच्या मुलाची टिसी पाहिजे . आर्ज लिहा व दोन दिवसात टीसी तयार करा ” . मला वाटलं होतं अमोल येथे नापास होईल पण तो येथे ही उत्तमरित्या पास झाला होता .
मला आठवणाऱ्या मुलांतील ठळक नाव म्हणजे अमोल रोकडे . वर्गात अतिशय शांत चुळबूळ न करता बसणारा विद्यार्थी म्हणजे अमोल रोकडे . तो दहावी बोर्ड १९८८ च्या परीक्षेत हदगाव तालुक्यातून प्रथम आला होता . त्याचा स्वभाव एवढा चांगला होता की वर्गातील सर्व मुलांना त्याची दोस्ती हवीहवीशी वाटायची . तोही खूपच समजदार होता . सर्ववांशी मिळून मिसळून वागायचा . अमोल माणिकचंद रोकडे म्हणजे १९८८ च्या तुकडीचां तो “अमोल” हिरा होता .
अमोल सध्याला एक यशस्वी उद्योगपती झालेला आहे . पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत त्याचा कारखाना आहे . दहावी नंतर त्याचे शिक्षण त्याने पुणे येथेच पूर्ण केलेलं आहे . अमोल पुण्यातील शासकीय इंजिनिअरींग कॉलेजमधून “धातूशास्त्र ” या विषयात पदवी प्राप्त केलेली आहे . खरं तर त्याकाळी अमोलला हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशात जाण्याची संधी प्राप्त झाली होती पण तो परदेशात गेला नाही . शिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्वसामान्या प्रमाणे त्याला नोकरीही करता आली आसती पण त्याने तसे ही केले नाही .
त्याला उद्योगक्षेत्र खुणावत होते . काही काळ शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथे पाहुणा प्राध्यापक म्हणून कामही केलं आहे. त्याने सुरुवातीला खडतर मार्गक्रमण केलंय . कष्टला पर्याय नाहीच .उद्योग जगत त्याला बोलावत होतं .खुणावत होतं .म्हणून त्याने इतर मार्ग सोडून मागील विसवर्षापासून उद्योगामध्ये त्याची यशस्वी वाटचाल चालू आहे.
अमोल एक उद्योजक म्हणून जगातील एकोणावीस देशात त्याचे उत्पादन निर्यात करतो आहे. भारतातील अनेक मोठ्या व नामवंत संस्था जसे इस्त्रो , न्यूक्लीअर पॉवर , ओनजीसी व नोटाचा छापखाना या संस्थेला तो त्याचा उत्पादीत माल पुरवितो .
व्यावसाय निमित्याने अमोल जगातील विविध पंधरा देशांना भेटी दिलेल्या आहेत . व्यावसायाबरोबर याला पायपीठ करायची ही भलतीचं आवड आहे . त्याने महाराष्ट्रातील जवळपास सर्वच अवघड किल्ले सर केलेलं आहे . हिमालयात ही सातवेळेस त्याने पायपीठ केलेली आहे . जसा तो उद्योगपती आहे . तसाच मनमिळावू आहे . सहासी आहे . असा हा माझा माझ्या साठी “अमोल” हीरा आहे .
राठोड एम.आर. (गुरुजी )” गोमती सावली “
,काळेश्वरनगर, विष्णुपूरी,
नांदेड . ९९२२ ६५२४०७ .