कंधार प्रतिनिधी
कंधार येथे सा बा उपविभागातील कार्यालय व विश्राम गृह परिसरातील स्वच्छता मोहीम कार्यलयाप्रमुख सुमित पाटील यांनी 100 दिवसाच्या नियोजनातील कामा प्रमाणे राबवली.
शंभर दिवसांच्या नियोजनात ७ सुत्री कार्यक्रमाचा अंमल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्धारित केल्याप्रमाणे नांदेड जिल्हा भर नियोजित कार्यक्रमाला धडाक्यात सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्हाभर जिल्हाधिकारी कार्यालयासाह सर्वच कार्यालयात स्वच्छता प्रशासनाने सुरु केली आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंधार येथे मुख्यमंत्री यांनी 100 दिवसाच्या नियोजन बद्ध कामाचे व 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज विश्राम गृह व सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा परिसर झाडून स्वच्छ केला. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहाना नंतर कार्यालय प्रमुख
सुमित पाटील सहायक अभियंता श्रेणी 1 यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
कार्यालयातील शाखा अभियंता राजेश जाधव, अजय चमकुरे,
भगवान शेंबाळे
दीप्ती भूरे,डी एस ममडे, स, खाज्जा, चोंडे,नलेवाड, बस्टेवाड,आलमगीर, सोमासे, ठाकूर, राठोड, सुमन खंधारे इत्यादी कार्यालयीन व विश्राम गृह कर्मचारी यांनी या स्वछता मोहिमेत भाग घेतला.