(कंधार ; दिगांबर वाघमारे )
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण
व क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या माध्यमातून गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कंधार यांच्या पर्यवेक्षणात सदरील शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा दि १७ फेब्रुवारी पासून सुरू झाला असून यापुर्वी पहिल्या टप्प्यात कंधार तालुक्यातील सुमारे ३५० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी दिली .
कंधार तालुक्यातील स्वामी रामानंद तीर्थ शिक्षणशास्त्र महाविद्यालय,बाळंतवाडी येथे कंधार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांसह ,खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक क्षमता वृद्धीसह,सक्षमीकरणासाठी गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांच्या मार्गदर्शनाखाली चार टप्यात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ३५० शिक्षकांचे क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. तर दुसरा टप्पा दि १७ फेब्रुवारी पासून २२ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
उपस्थित शिक्षक प्रशिक्षणार्थींना राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची वैशिष्टये,राज्य अभ्यासक्रम आराखडा (५+३+३+४) संरचना शालेय शिक्षण व क्षमता आधारित मुल्यांकन- संकल्पना,क्षमताधिष्ठीत अध्ययन निष्पत्तीवर आधारीत प्रश्न निर्मिती कौशल्य, विद्यार्थ्यांचे समग्र प्रगतिपत्रकातील नोंदी,यांसह शालेय गुणवत्ता मुल्यांकन व आश्वासन आराखडा कसा पूर्ण करावा याविषयी व्यवस्थीत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सदरील विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या वतीने माध्यमिक स्तरावर तज्ञ सुलभक म्हणून रविराज केसराळीकर, शिवसांब गणाचार्य, बाबाराव विश्वकर्मा, माधव केंद्रे, विक्रम शिंदे, साहेबराव शिंदे, शिवकुमार कनोजवार, फिरदोस शेख यांनी यशस्वीपणे मार्गदर्शन केले. तर प्राथमिक स्तरावर एकनाथ केंद्रे, दत्तात्रय कदम, चांदोबा कळकवणे, नवनाथ बोळकेकर,मन्मथ पांडागळे,अमृत पौळ, रोहिणी माने यांनी तज्ञ सुलभक म्हणून मार्गदर्शन केले.
सर्व प्रशिक्षणार्थींना सकाळी व दुपारी दोन वेळा चहा, शुद्ध पाणी व दुपारच्या भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आलेली होती. मा.संजय यरमे गटशिक्षणाधिकारी पं.सं.कंधार हे स्वतः पूर्ण वेळ उपस्थित राहून प्रशिक्षणार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत होते.
सदरील प्रशिक्षण समन्वयक म्हणून *मा.वसंत मेटकर* (शि.वि.अ.) मा.बालाजी केंद्रे ,(कें. प्र.) मा.ईक्बाल शेख (कें. प्र.), यांनी काम पाहिले. तर प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी शिद्धेश्वर मलगीरवार, (विषय तज्ञ), ओमप्रकाश येरमे (विषय तज्ञ), प्रशांत नरहरे (विषय तज्ञ) व गटसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.