नांदेड जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या ह्रदयातील नेतृत्व – खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या ह्रदयातील नेतृत्व –  खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर 
                                                             

जनता माझी मी जनतेचा हे तत्व मनाशी ठेवून सबंध नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात आपल्या स्वयं कर्तृत्वाने व निष्टावंत कार्यकर्त्यां च्या साथीने राजकीय पटलावर आपला ठसा उमटवणारा मन्याड चा वाघ म्हणजेच प्रताप पाटिल चिखलीकर नावाचे संघर्षमय वादळ नेहमी चर्चेतच आसते.जसे देशाच्या राजकारणात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नावा शिवाय कोणतीही चांगली असो किंवा वाईट गोष्ट पुर्ण  होत नाही तसे नांदेड जिल्हातील कोणतीही राजकिय खेळी चांगली आसेल किंवा वाईट त्यात चिखलीकर साहेबांचा हात आसेलच असे सहज बोलल्या जाते.हा सर्व राजकीय दबदबा चिखलीकर साहेबांनी आपल्या राजकीय कौशल्याने व त्यांचे कार्यकर्त्यां बरोबर असलेले आपुलकी चे नाते आणि त्यातून कार्यकर्त्यांची चिखलीकर साहेबां वर निर्माण झालेली निष्टा यातुन मिळवला आहे .चिखलीकर साहेंबाच्या राजकीय संघर्षमय जिवनात कोणताही राजकीय वारसा नसताना चिखलीकर साहेबांनी स्वकर्तुत्वा च्या जोरावर सरपंच ते थेट भारताच्या संसद पर्यंत मजल मारली हेच त्यांच्या राजकीय जीवनातील मिळालेले यश होय.
चिखलीकर साहेबांची कार्यकर्त्यांला व कार्यकर्त्यांची चिखलीकर साहेबांना नेहमी साथ..!
मला जसे राजकारण कळायला लागले तेव्हापासून आजपर्यंत मी पाहिलेले चिखलीकर साहेब म्हणजे संघर्षयोद्धा,संयमी नेतृत्व,चाणाक्ष बुद्धी,प्रेमळ व्यक्तीमत्व,पराभवाने न खचणारे,24 तास जनसेवेसाठी तत्पर,प्रचंड जनसंपर्क,प्रशासनावर मजबूत पकड,अगदी फोनवर सुद्धा उपलब्ध असलेले,सतत जनतेच्या गराड्यात राहणे हा जनु त्यांचा छंदच असे हे नेतृत्व होय.”कार्यकर्त्या च्या केसाला धक्का म्हणजे प्रताप पाटलाच्या जीवाला धक्का” असे उराशी बाळगून कार्यकर्त्यां च्या जिवना मध्ये कोणताही सुखाचा प्रसंग आसेल किंवा दु:खाचा चिखलीकर साहेब हे नेहमी कुटुंब प्रमुखाची भुमिका बजावतात. त्याचा प्रत्येय आता चालू असलेल्या कोरोना सारख्या जागतिक महामारी च्या संकटात दिसून आलेच ते म्हणजे साहेब आपल्या जीवाची परवा न करता 24 तास जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत कार्यरत आहेत.गेले 4 महिने झाल पुर्ण लाँकडाऊन च्या काळात सतत स्वतःहा जनसेवेत झोकून देऊन सर्वांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुर्ण सहकार्य करत आहेत..मग ते जिल्ह्यात सर्वत्र प्रशासकीय आढावा घेणे मार्गदर्शन करणे तसेच प्रशासनाल मदत करणे व जिल्ह्यात अन्नधान्य किट वाटप करणे किंवा कोणाची प्रवासाची अडचण असो  तसेच कित्येक बाहेर गावी-राज्यात अडकले असलेल्या लोकांना परत आणण्यात केलेली मदत असो व आता मागील काही दिवसात पुर्ण जिल्हाभर त्यांच्यामार्फत झालेले रक्तदान शिबिरे अशा सर्व प्रकारच्या कार्यातुन त्यांची जनसेवेसाठी असलेली धडपड आपल्या ला दिसुन आलेली आहे.साहेबांचा कार्यकर्ता हा त्यांच्या समोर आपल्या अडीअडचणी वैयक्तिक असो वा इतर कोणतीही असो बिनधास्त पणे मांडतो व साहेंबाच्या कोर्टात त्याचा तात्काळ निवाडा होतो.कोणतीही निवडणूक असो किंवा चिखलीकर कुटुंबावर सुखाचा प्रसंग किंवा दु:खाचा असो साहेबांचा कार्यकर्ता हा कुणाच्या ही बोलावण्याची वाट न पाहता धावुन जातो .साहेबांना वेळ प्रसंगी अनेक पक्ष बदलावे लागले पण कार्यकर्त्यांना भलेही त्या पक्षाची विचारधारा जरी मान्य नसली तरी चिखलीकर साहेब हाच आमचा पक्ष ते ठरवतील तेच आमचे धोरण ते बांधतील तेच आमचे तोरण हे मनाशी ठेवुन कार्यकर्ता हा साहेंबाच्या आदेशा चे पालन जिवाची परवा न करता समर्थपणे करतो.साहेबांचा कार्यकर्ता हा कोणत्याही पदाची आपेक्षा न करता फक्त चिखलीकर परिवारातील सदस्य आहे म्हणून सर्वत्र वावरतो. साहेब हे कधी कार्यकर्त्यां वर रागावतात तर कधी प्रेमाने जवळ ही करतात हा त्यांचा गुण सर्व कार्यकर्त्यांना भावतो.
*संघर्ष आणि चिखलीकर साहेब हे एक समिकरणच..*
         साहेबांच्या राजकीय जीवनातील कोणतीही निवडणूक ही संघर्षाची च राहिलेली आहे.एक आठवण म्हणून साहेबांची 2009 ची विधानसभेची अपक्ष लढवलेली निवडणूक आपणास माहितच आहे. तात्कालिन मुख्यमंत्री आशोकराव चव्हाण साहेबांनी आपली सर्व राजकीय ताकद लावून सर्व विरोधकांना एकत्र करून फक्त आठ हजार मतांनी पराभव केला पण त्या निवडणुकीत विजया पेक्षा चिखलीकर साहेबांच्या पराभवा ची चर्चाच कंधार लोहा मतदारसंघात जास्त चालू होती कारण जनतेच्या मनातील आमदार फक्त चिखलीकर साहेबच होते अशी वेगळीच छाप साहेबांनी त्यावेळेस दाखवली व या निवडणुकीत साहेबांनी 2004 च्या अपक्ष लढवलेल्या निवडणुकीत मिळवलेल्या मतदाना च्या दुप्पट मतदान मिळवले.2014 ला साहेबांनी  92000 मतदान घेऊन तब्बल 46000 मतांनी विजय मिळवून 2009 च्या निवडणूकीच्या पराभवाची मनातील सल भरून काढुण कंधार-लोहा विधानसभा निवडणुकीत इतिहास रचला आणि ती ऐतिहासिक बाब म्हणजे कंधार लोहा मतदारसंघात एकदा आमदार होऊन पडलेला व्यक्ती परत कधी निवडून येत नाही हि बाब मोडून काढली.कंधार लोहा मतदारसंघात कोणतीही निवडणूक असो एक समीकरण नेहमी आपल्याला पहायला मिळाले आहे ते म्हणजे जिल्हातील व तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते एकत्र येतात आणि दुसऱ्या बाजूला चिखलीकर साहेब व त्यांची निष्टावंत कार्यकर्त्यांची फौज एकिकडे अशी एकाकी झुंज देणारा नेता म्हणजे चिखलीकर साहेबच होय.2019 लोकसभा निवणुकीत भारतीय जनता पार्टी ने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांना टक्कर देणारा नांदेड जिल्हातील कोण ? याचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबां समोर पहिले नाव आले ते म्हणजे कंधार लोहा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर. फडणवीस साहेबांनी साहेबांचे राजकीय कौशल्य आणि जनतेचे चिखलीकर साहेबां प्रती असलेले प्रेम-नातं ओळखले असावे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव हा लोकसभा निवडणुकीत दिसून आलाच.चिखलीकर साहेबांचा हक्काचा म्हणून ओळखला जाणारा कंधार लोहा मतदार संघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघात येत नसुन सुद्धा लोकसभा निवडणूकीत फडणवीस साहेबांनी चिखलीकर साहेबांना उमेदवारी दिली. एका बलाढ्य अशा शक्तीसमोर साहेबांनी केलेल्या सुक्ष्म नियोजनातुन कार्यकर्त्यां च जाळ तयार करुन विजय मिळवुन मन्याड चा वाघ खासदार झाला व भारतीय जनता पार्टी यशस्वी पण झाली व माजी मुख्यमंत्री तात्कालिन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोकराव चव्हाण साहेबांचा पराभव करून भारता च्या संसदेत प्रवेश करणार्या मन्याड च्या वाघाच्या विजयाची देशपातळीवर दखल घेऊन  पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा साहेब व तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी साहेबांची ओळख जायंट किलर म्हणून केली.                             साहेब खासदार झाले तरी कंधार लोहा मतदारसंघातील कार्यकर्ता मात्र पोरका झाला नाही.त्यांनी जे कौटुंबिक नात मतदारसंघा सोबत जोडले आहे ते अजूनही तसेच आहे. त्यांचा वारसा त्यांचे पुत्र जि.प.सदस्य प्रविण प्रतापराव पाटील चिखलीकर व कन्या जि.प.सदस्या आमच्या सर्वांच्या लाडक्या प्रणिताताई देवरे चिखलीकर हे समर्थ पणे चालवत आहेत.त्यामुळे कंधार लोहा मतदारसंघातील जनतेच्या मनात माञ चिखलीकर साहेबां बद्दल चे प्रेम अजूनही पहिल्या सारखेच आहे.जनतेच्या मनावर राज्य करणारे चिखलीकर साहेब हे एकमेव नेते आहेत.कंधार लोहा मतसंघातील राजकारण हे चिखलीकर साहेबांशीवाय होऊच शकत नाही हेही तितकेच सत्य नाकारुन चालणार नाही यात तिळमाञ शंका नाही !      साहेबांना पुढील राजकीय जिवनात अजून यश प्राप्त होवो व पुढे जाऊन देशातील जनतेची सेवा त्यांच्या हातुन होवो हिच आपेक्षा करून पुढील राजकीय जीवनासाठी शुभेच्छा                        
रजत राजहंस शहापुरे कंधार जि.नांदेड

2 thoughts on “नांदेड जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या ह्रदयातील नेतृत्व – खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

  1. नांदेड जिल्हाचे खंबीर नेतृत्व मा. खा. प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *