कंधार येथे जागतीक टपाल दिन साजरा ;
कंधार ; दिगांबर वाघमारे
जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून दिनांक 9 ऑक्टोबर रोजी कंधार येथील पोस्ट ऑफिस येथील पोस्टमास्टर व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
दिनांक 9 ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून कंधार येथील भाजपा शिक्षक परीषदेचे तालुकाप्रमुख राजहंश शहापुरे व पत्रकार मित्रांच्या वतीने सदरील सत्कार करण्यात आला.
पोस्टमास्टर कल्याण माळी,सहाय्यक पोस्ट मास्टर मदन केंद्रे,विजय केंद्रे, पोस्टमॅन प्रदीप जायभाये , शिवाजी जोंधळे, शिवाजी यादगिरवार आदी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राजहंस शहापुरे, डॉक्टर दिनकर जायभाये ,दिगांबर वाघमारे ,नितीन मोरे,आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.यावेळी सत्काराला उत्तर देताना पोस्ट मास्टर कल्याण माळी यांनी भारतीय टपाल सेवेतून केंद्र शासनाच्या विविध योजनेची माहीती दिली.तसेच विद्यार्थ्यांसाठी ठेवीदारांसाठी चालू असलेल्या विविध योजना व शिष्यवृत्ती बाबत माहिती देऊनया पोस्ट कार्यालयाच्या कंधार तालुक्यातील १६ पोस्ट शाखेतून सेवा पुरवल्या जातात. सेव्हींग ,आर.डी., पी.पी. एफ., सुकन्या योजना, आधार व इतर बँकेचे व्यवहार आदीतून कोरोना काळात पोस्टातून ग्राहकाला सेवा देण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी पोस्टमास्तर कल्याण माळी यांनी दिली.तसेच भविष्यामध्ये कंधार येथील पोस्ट अॉफीस मध्ये दोन कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे समोर आले आहे.
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा कंधार तालुक्याचे भूमिपुत्र प्रताप पाटील चिखलीकर यांनी केंद्र शासनाच्या टपाल केंद्राला उभारी देण्यासाठी सदरील टपाल परिसरात उपलब्ध असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये शॉपीग सेंटर कॉम्प्लेक्स व व्यापारी गाळे बांधून या ठिकाणी भव्य व सुसज्ज पोस्टाची इमारत उभारुन कंधार येथिल व्यापारीवर्गाला गाळे बांधून देण्यासाठी लक्ष घालण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी चर्चा केली .
खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी सदरील पोस्टाच्या मोकळ्या जागेचा विचार करून सदरील परिसरात भव्य इमारत उभारण्यासाठी स्वतः मी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर सांहेबा सोबत चर्चा करुन सदरील टपाल परीसरातील मोकळ्या जागेवर इमारत उभारुन कंधार येथिल व्यापारीवर्गांना गाळे तयार करण्यासाठी मी विनंती करणार आहे.
राजहंश शहापुरे ,
भाजपा शिक्षक परीषद ,तालुकाप्रमुख ,कंधार
video news **** yugsakshi live