पँथर ऑफ सम्यक योद्धा राष्ट्रीय लढाऊ संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन – पँथर श्रावण गायकवाड यांची माहीती

मुंबई ;

देशातील वंचित समाजाच्या न्यायिक हक्कासाठी तन मन धनाने कार्य करून अन्याय अत्याचाराच्या विरोधात मी स्वयंस्फूर्तीने अग्रेसर होऊन पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असेल, असे मत नवनिर्वाचित राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार ऍड. नितीन माने यांनी व्यक्त केले.


संविधान, व संविधानिक हक्क मूलभूत अधिकार व स्वाभिमान जपण्यासाठी सम्यक पँथर ची उभारणी केली असून संविधानाला मानणाऱ्या सर्व जातीधर्माच्या व्यक्तीसाठी संघटनेचे स्वागत असून संबंध भारतात संघटनेचे जाळे पसरविण्यात येणार असून इच्छुकांनी 9004363903 या व्हाट्सअप्प क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन पुज्य भदंत शिलबोधी यांनी केले.


देशातील जातीय आराजकतेवर घाव घालण्यासाठी सम्यक पँथर्स ची स्थापना झाली असून संघटन वाढविण्यासाठी मी व माझी टीम सातत्याने कार्यरत असून दांभिक प्रवृत्तीना ठेचून काढू असे वक्तवे उपाध्यक्ष वीरेंद्र लगाडे यांनी केले.

डॉ राजन माकणीकर सरांनी चिवरधारी पँथर्स ची संकल्पना मांडली असली तरी पुज्य भदंत शिलबोधी यांनी ती पूर्णत्वास आणून संघटनेत प्राण ओतला आहे यामुळेच संबंध राज्यात संघटनेचे जाळे पसरत असल्यामुळे मी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत असल्याचे पंथेर श्रावण गायकवाड यांनी अभिप्राय व्यक्त केला.
मुंबईतील शेकडो कार्यकर्त्यांना नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजेश पिल्लई, प्रकाश बोराडे, नरेश शिर्के, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीत होते, तर आकाश रावते, किरण चौरे, नित्यानंद नाडार, मोहम्मद उमर, रोहित कलमबे,
कार्यक्रम यशवितेसाठी अथक परिश्रम घेतले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी पुज्य भदंत शिलबोधी यांचे नेतृत्व मान्य करून देशयातील जातीवाद संपवून संविधानिक भारताच्या निर्मितीची प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *