डोंगरगाव येथील प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळा संपन्न..

नांदेड-

शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन पात्र ठरलेल्या तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवानंद पुयड तर प्रमुख पाहुणे म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, ज्येष्ठ ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, साहित्यिक समीक्षक तथा स्तंभलेखक गंगाधर ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर माजी सरपंच श्रीनिवास महादवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेशराव व्यवहारे, गंगाधर व्यवहारे, शिवाजी केदारे, माधव सूर्यवंशी, सुदामराव व्यवहारे, शिवानंद व्यवहारे, ज्येष्ठ नागरिक शिवाजी व्यवहारे, विठ्ठलराव सावंत हे उपस्थित होते.


 सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ज्या विद्यार्थिनींसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले त्या गुणवंत विद्यार्थीनी कु. तन्वी सावंत नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेतही पात्र, तर कु.धनश्री  व्यवहारे, समीक्षा सावंत, पुष्पा  व्यवहारे या विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्या त्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ,पुस्तक  व शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या विद्यार्थिनीं बरोबर त्यांचे पालक आनंद सावंत, गणेश व्यवहारे, सुदाम व्यवहारे, शामराव सावंत यांचेही अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. पाठक, एस.एस. पाटील, व्हि.पी.वैजवाडे, व्हि.बी.पवार, ओ.पी.चिटकुलवार, एस.डी.चिलकर मॕडम, एम.बी.जाधव मॕडम या सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते  शाल व पुष्पगुच्छ देऊन  सन्मान व गुणगौरव करण्यात आला. 

यावेळी बोलताना माजी सरपंच श्रीनिवास माधवाड म्हणाले, या देशाला वाचू शकतील अशी दोनच माणसे आहेत एक सीमेवरचा सैनिक  आणि दुसरा शाळेतील शिक्षक. सीमेवर सैनिक व्यवस्थित लढला नाही तर आतंकवादी देशांमध्ये प्रवेश करतात तर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवले नाही तर ते सुद्धा नक्षलवादी व आतंकवादी बनू शकतात. त्यामुळे देशाला वाचवणारे शिक्षक आणि सैनिक यांना सलाम करतो. चांगलं निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणं हे आमच आद्य कर्तव्य आहे. तर अनुरत्न वाघमारे म्हणाले वाईट माणसे आणि विचार इतरत्र पसरता कामा नये कारण ते सगळीकडे वाईटच पसरवतात तर चांगली माणसे सर्वत्र पसरली पाहिजेत कारण ते कुठेही गेले तरी चांगलं निर्माण करतात. चांगलं निर्माण करणाऱ्या  शिक्षकांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


 कवी नागोराव डोंगरे  यांनी आईवरील कविता गायन करून प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थी शास्त्रज्ञ कसे बनतात आणि विद्यार्थ्यांवर कशा प्रकारचे संस्कार केले पाहिजे याविषयी आपले मत व्यक्त केले.ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर ढवळे म्हणाले ज्या विद्यार्थिनीने यश संपादन केले त्या इतरांसाठी प्रेरणादायी आहेत. मलाही या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाली असून मीसुद्धा माझ्या जन्मभूमी वर जाऊन अशा प्रकारे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करील,  असा आशावाद त्यांनी व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला व त्यांना भावी आयुष्यासाठी अनंत  शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना तन्वी, पुष्पा या मुलींनी त्यांच्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तर यावेळी बोलताना सहशिक्षक व्हि.पी. वैजवाडे म्हणाले अमेरिकेच्या विल्मा रुडोल्फने दोन्ही पाय पोलिओने गमावले असताना इच्छाशक्तीच्या जोरावर ऑलम्पिक मध्ये तीन सुवर्ण पदक मिळवून देशाचं नाव उज्ज्वल केलं. तसे तुम्हीसुद्धा गावाच देशाचं नाव उज्ज्वल करु शकता असा आशावाद व्यक्त केला.


 या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन डोंगरगाव ही जन्मभूमी असलेले आणि वायवाडी येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक शंकर  गच्‍चे यांनी केले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.पाठक यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला  या शाळेला उज्वल यशाची परंपरा असल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट  सूत्रसंचालन कैलास धुतराज यांनी केले तर एस. एस. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी कु. निकिता रुस्तुम सोळंके तसेच राहुल सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्त्या अनुराधा सावंत,जयशीला केदारे, निलाबाई केदारे , मदतनीस प्रभावती केदारे या भगिनी कार्यक्रमास उपस्थित होत्या. या स्तुत्य कार्यक्रमासाठी मुदखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी सुधीरकुमार गुट्टे, केंद्रप्रमुख एस.एस.भिसे यांनी विद्यार्थी त्यांचे पालक व सर्व शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *