कंधार ;
मौजे कारतळा ता. कंधार येथे 1972 मध्ये साठवण तलाव झाले होते त्यामुळे तलावाच्या खालील भागातील शेतीस जाणारा रस्ता बंद झाला होता.गावकऱ्यांनी भेट दिल्याने शिष्टमंडळाचे म्हणणे लक्षात घेवून दि.२१ अॉक्टोबर रोजी तहसिलदार विजय चव्हाण यांनी तात्काळ सदरील तलावातून रस्ता करुन गावकऱ्यांना वाहतूकसाठी सोय करुन दिल्याने तहसिलदार विजय चव्हाण यांचे आभार मानले जात आहे.
बहुतांश वेळा दुष्काळ असायचा त्यावेळी शेतकरी कसेबसे जात असे कालांतराने शेतिचे महत्व वाढले त्यामुळे पडीत जमीन शेतीसाठी उपयोगात आणली जाऊ लागली त्यामुळे पर्यायी रस्तेही बंद झाले.
इतर ऋतूत काहीतरी जुगाड करून शेतकरी ये जा करत असे परंतु पावसाळयात मात्र शेतकऱ्यांचे, महिला, लहान मुले यांचे अतोनात रस्त्या विना हाल होऊ लागले… विशेष म्हणजे गाई, म्हशी, बैल, व इतर जनावराना तर रस्ताच नसायचा त्यांना अक्षरशः पाण्यातून पोहून जावे लागायचे, ते सोबतच्या फोटोत दिसत आहे.
विशेषतः शेतीकरिता ने आण कार्यवायचे असल्यास पाणीतूनच आणावे लागायचे, तसेच शेतातील माल सुद्धा पायगडी किंवा ट्रॅक्टर पाण्यातूच घेऊन जावे लागत असे त्यात बसलेले माणसे अत्यंत धोकेदायक पद्धतीने बसून जात.
गुडघ्या एवढ्या चिखलातून माणसांना डोक्यावर चाऱ्याचा भारा घेऊन जाताना तर खुपंच बिकट परिस्थितून जावे लागायचे.
हिवाळ्याच्या दिवसात तर जनावरं पाण्यातून गेल्याने भिजत असत आणि मध्य रात्रीपर्यंत थंडीने कुडकुडत असत काही लहान वासर तर मयत ही झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
काही शेतकऱ्यांनी तर मागच्या 5 ते 6 महिन्यापासून त्यांची जनावरं त्रासाला कंटाळून गावात सुद्धा आणली नसल्याचे सांगितले.
रास्ता नसल्याने मागील काही दिवसांपूर्वी ह्या गावातील लोकांनी उपोषण केल्याने आपण त्या गावाला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली आणि दोन किलोमीटर पालकमंत्री पांदण रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
परंतु काही शेतकऱ्यांचा ह्या रास्तास विरोध होता त्यामुळे गावातील शेतकरी दि.21/10/2020 रोजी तहसिलदार कंधार विजय चव्हाण यांची जयंती भेट घेतली. भेटी दिलेल्या दुपारनंतर त्यांना भेट दिली आणि महसुली पद्धतीने रात्री 10 वाजेपर्यंत आपण स्वतःथांबून तो रस्ता JCB च्या सहाय्यानें तयार करून घेतला.
( सुरवातीला 1 km पर्यंत जे शेतकरी विरोध करत होते त्यांच्या शेताच्या पुढे जाई पर्यंत आपण जातीने करून घेतला) उर्वरित रस्त्याला काल पूर्ण करून घेतला.
ह्या रास्ता झाल्याने विरोध करण्याऱ्या शेतकऱ्यांसह जवळपास 200 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.हा रस्ता झाल्याने गावातील लोकांनी प्रशासनाचे मनातून खूप खूप आभार मानले.