अहमदपूर ( प्रतिनिधी )
डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा दि १५ आँक्टो हा जन्म दिवस. हा दिवस सबंध देशभर वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉ अब्दुल कलाम हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते तर ते मानवी जीवनाचे भाष्यकार होते. जेष्ठ साहित्यीक होते.त्यांनी आपल्या जीवनात प्रेम,सकारात्मकता, जीवनमुल्यांची जपणूक, स्वप्नं पाहणं,ते स्वप्न परिश्रमातून पुर्ण करणं याला त्यांनी जीवनात फार महत्त्वाचे स्थान दिले.
सध्या जागतिक कोरोना महामारीमुळं सबंध देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत.
मंदिर आणि चित्रपटग्रहे सुद्धा बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही नियम आणि अटींची नियमावली तयार करून लवकरच म्हणजे दिपावलीच्या नंतर शाळा आणि महाविद्यालये केंव्हाही सुरू होउ शकतात. कारण केंद्र सरकारने दि १५ आँक्टो पासून शाळा आणि महाविद्यालये पुर्ववत भरविण्याची परवानगी संबंधित राज्यांना दिली आहे. पण महाराष्ट्र शासनाने दि ३० आँक्टो २० पर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील असे सांगितले आहे.
पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आणि त्यांची होणारी गैरसोय टाळावी म्हणून शासनाने ” शाळा बंद पण शिक्षण चालू ” हे धोरण निश्चित केले होते.तसे आवाहन राज्यभरातील शिक्षकांना केले होते. त्यासाठी आँनलाईनचा पर्याय उपलब्ध होतांच.शासनाच्या या धोरणास बहुतांश शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला,आजही ते देत आहेत. शिवाय, विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक जबाबदारी कमी करण्यासाठी शिक्षण मंडळांने नियोजीत वार्षिक अभ्यासक्रमातील २५ % अभ्यासक्रम कमीही केला.
आँनलाईन अभ्यास घेण्या संदर्भात विचार करता, सौ.सपना शिवपुजे मँडम यांचे नाव अग्रेसर आहे. त्या येथील विद्यावर्धिनी विद्यालय, मीरकले नगर अहमदपूर येथे शिक्षिका आहेत.श्री.आणि सौ.पाटील मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याआपल्या विद्यार्थ्यांना त्या अगदी शाळेच्या सुरुवातीपासुनच संपर्क साधून आहेत. मोबाईलचा वापर शैक्षणिक कार्यात त्या कुशलतेने करून घेत आहेत. झुम अँपचा वापर करून आँनलाईन वर्ग घेत आहेत. तर व्हाट्सएपवर ग्रहपाठ पाठवून देत आहेत. त्यावरच ग्रहपाठ तपासून चुका झाल्या तर त्या सुधारणा करून घेतात. सौ सपना शिवपुजे मँडमच्या या आँनलाईन वर्गाचा लाभ सध्या तरी सचिन पौळ, प्रिया काचोळे, ऋतुजा ना.म्हेत्रे, रितेश जाधव, स्मिता दि.गुट्टे, क्रष्णा उगिले आणि धनश्री भ.आमलापुरे हे विद्यार्थी घेत आहेत.
कोरोना काळातही विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून, त्यांना शैक्षणिक सुविधा पुरवून, रोज आँनलाईन वर्ग घेऊन, ग्रहपाठ देऊन, त्यातील चुका सुधारून शासनाचे ” शाळा बंद तरी पण शिक्षण चालू ” हे धोरण चालू ठेवल्याबद्दल सौ.सपना शिवपुजे मँडम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होते आहे.