लोहा / प्रतिनिधी
एटीएमची अदलाबदल करून नागरिकास फसविणाऱ्या अंतर राज्य टोळीचा लोहा पोलिसांनी केला पर्दापाश एकास अटक तिघांवर लोहा पोलिसांत गुन्हा दाखल.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि.७-१०-२०२० रोजी वेळ १८ ते १९ वाजेच्या दरम्यान एबीआय एटीएम शिवाजी चौक लोहा येथे आरोपीने फिर्यादीस तुमचे पैसे निघत नाही का मी काढून देतो असे म्हणून त्यांचे एटीएम कार्ड बदलून त्याने स्वतःचे एटीएम कार्ड देऊन त्यांच्या बँक खात्यातून 33 हजार रुपये काढून फसवणूक केली आहे फिर्यादी ज्ञानोबा गोविंदराव घोडके वय 51 वर्षे व्यवसाय नोकरी शिक्षक राहणार पानभोसी तालुका कंधार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुनील रानबा हाटकर वय 34 वर्षे व्यवसाय बेकार राहणार महाराळगाव ता. कल्याण जिल्हा ठाणे याच्या विरोधात लोहा पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 210/2020 कलम 420, 406 भादवि सह कलम 66 (सी) 66(डी) आयटी ॲक्ट 2008 दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भागवत जायभाये करीत आहेत .
यानंतर लागलीच पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि भारती पोहेकाॅ सूर्यवंशी ,पो.काॅ. मुळे,व पो.काॅ.जाधव यांनी सदरील आरोपीचा शोध घेऊन त्यास नाशिक येथून जेरबंद केले आहे व त्याच आरोपीने तशाच प्रकारचा गुन्हा शिवाजी चौक लोहा येथील एटीएममध्ये केल्याने त्यावर दि. 22-10-2020 . रोजी दुसरा गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर 214 / 2020 कलम 420 ,406 भादवी सह दाखल झाला आहे.
सदरील आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाचा पीसीआर दिला आहे.तसेच त्याचे साथीदार दोन आरोपी फरार आहेत त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच सदरील आरोपीवर लोहा, भोकर , लासलगाव, लातूर, निलंगा,अशा बर्याच गावांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
फसव्या लोकांपासून सावधान पोलीस निरीक्षक भागवत जायभाये आवाहन
——————–
एटीएम च्या ठिकाणी गर्दी बघून कार घेऊन काही भामटे हे गर्दीचा फायदा घेत नागरिकांना एटीएम मधून पैसे काढून देतो म्हणून कार्डाची आदलाबदल करीत आहेत व नंतर पैसे काढून नागरिकांची फसवणूक करीत आहेत आशा भामट्या लोकांपासून नागरिकांनी सावधान रहावे असे आवाहन लोहा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांनी केले आहे.
सदरील टोळीचा पर्दापाश पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,डीवायएसपी किशोर कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांनी दिली आहे.