संवाद लेखन;बोकड पशू अन् पक्षी कोंबडा यांच्यातील शल्य संवादातून…….!


    दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा



बिचारा बोकड व चिमुकल्या जीवाचा कोंबडा यांचे जीवन नैसर्गिक आयुष्या पेक्षा वयोमान आधिच संपते…..यांच्यातील यातना संवाद रुपाने शब्दबध्द करावा या हेतूने….संवाद शल्य आरंभ करतोय…!
स्थळ:-मद्यालयाच्या आवारात मद्याचे घोट घेणे प्रतिष्ठेचे समजत रंगलेला संवाद
 बोकडोबा:-
              काय चालले आहे कोंबडे बुवा.ऽऽऽऽऽ…!
कोंबडोबा:
             नमस्कार…..!नमस्कार…..!..काय भाऊ,  काय चालले आहे तुझे…..!
बोकडोबा:-
              कांही नाही रे..ऽऽऽऽ…काल माझ्या मालकांनी मला खंदारच्या बाजारात खाटकाला विकल्याने मला खुप यातना होत आहेत…! मी काय करु सांग..ऽऽऽ
कोंबडोबा:-
अरे मित्रा माझे दु:ख ते तुझे दु:ख समाजात एक उक्ती आहे”उघड्या पुढे,नागडा बांधला;रात्रभर हिवाने मेला..!”ही उक्ती आपल्या दोघांनाही अगदी खरी ठरली बघ…!काल मलाही खंदारच्या कोंबड्याच्या बाजारा माझीही विक्री झाली……पण एका बेवड्याने खरेदी केले…तेंव्हा पासून मी बेचैन आहे….
बोकडोबा:-
अरे मित्रा माझी यातना तुला सांगुन थोडे हलके वाटेल या उद्देशाने मी तुझ्याकडे गार्हाने घेवून आलो…..पण..तुला विकलेले मला माहिती नाही.अन् मला विकलेले तुला माहिती नाही.आपण दोघेही समदु:खी…सुरी तर दोघांच्याही मानेवर फिरणारच हे मात्र नक्कीच आहे बघ…!
कोंबडोबा:-
अरं काय ही मानवाची जात आहे बेईमानी….अरे मित्रा मी तर त्यांना झुंजुरक्याच रामप्रहरी सूर्योदय होतांना तांबड फुटल्याक्षणी ऊठवतो….पण हा निर्दयी मानव माझ्याचं मांसाचा भुकेला आहे.माझ्या जीवावर ऊठतो..अन् माझ्याच मानेवर सुरी ठेवतो…अरे मानवा कृतघ्न का रे होतोस..?थोडे तरी कृतज्ञ बनत जा…..!पण स्वार्थी मानव सांच्याला मित्रांना निमंत्रण देतोच…देतो..!मला मात्र बळीचा कोंबडा बनवतो..
बकरोबा:-
अरं मित्रा……..तुला तर बळीचा कोंबडा बनवतो रे….पण माझ्या बाबतीतही तसेच आहे….पण डायरेक्ट माला न म्हणता माझ्या आईलाच संबोधुन म्हणतात..”बकरे की अम्मा।कब तक दुवाॅ मागेंगी।”म्हणजे माझी आई कितीही माझ्या आयुष्यासाठी प्रार्थना प्रार्थना किती दिवस करेल……!शेवटी माझ्या मानेवरली सूरी अटळच आहे.
(दोघेही सम दु:खी पशू अन् पक्षी आपापल्या टेंन्शन मध्ये दोघांच्याही हातात मद्याचा एक-एक पॅक आणि पोषाख तर रुबाबदार प्रतिष्ठित धनदांडगे जनासम सुट-बुट मध्ये एकमेकांचे शल्य संवादातून…….बोलतांना)
कोंबडोबा:-
काय सांगु तुला मित्रा माझ्या मानेवरील सुरी, तुला कळत नाही…!तुझ्या मानेवरील सुरी मला समजत नाही.माझ्या मानेवर गाव देवाच्या नावे सुरी फिरवताच त्याला “ढवारा”म्हणतात….तर तुझ्या मानेवर देवाच्या नावे सुरी फिरवून त्यास”कंदोरी”ऽऽऽ म्हणातात.फक्त असतो शब्दांचा खेळ…पण प्राण तर दोघांचेही जातात.
बोकडोबा:-
अगदी खरं बोललास मित्रा….कोणताही देव पशू-पक्ष्यानांच काय कोणाचाही जीव घ्या…!असे कधीच सांगत नाही…देवाच्या नावावर…अन् प्रतिष्ठेच्या..जीवावर…मित्रत्वाच्या आना-भाका आमच्या प्राणावर….राजकारणी व अधिकारी जगतोय तो आमच्या जीवावरच…..फक्त सुरी फिरते ती पशू-पक्ष्यांच्या मानेवर…!
कोंबडोबा:-
आमच्या प्राणाहूतीची स्थळे..बियर बार,हाॅटेल,खाटीकखाने,खळे,ढवारे,कंदोर्या,पार्ट्या,एखाद्यांला लाभ झाल्या नंतर,एव्हढेच काय…?वंशाचा कुलदीपक जन्मल्या नंतर,जावूळ काढण्यासाठी,नवस फेडण्यासाठी,निवडणुकीत मतदारांना घुलविण्यासाठी,आमिष दाखवण्यास केला जातो…..!
बोकडोबा:-
अरे कोंबड्या आपल्या देशात तर बरच म्हणावे लागेल..!जगात चीन नावाचा असा बुटक्या वृत्तीचा देश आहे, त्या ठिकाणी तर आपले बळी तर जातातच शिवाय फक्त सरपटणारी रेल्वे सोडुन बाकी पृश्वीतला वरी सगळे सरपटणारे जीव……आणि उडणारे विमान सोडुन सर्व उडणार्यां पक्ष्यांना, शिजवून तर सोड जिथे भेटतील जीव तेथेच त्यांच्या कच्च्या मांसावर ताव मारणारे महाभाग आहेत…म्हणुन, कोरोना विषाणुची निर्मिती झाली….हे एक मानव जातीवर एकप्रकारचे महासंकटच म्हणावे लागेल.
कोंबडोबा:-
व्हय बोकडा मानव जात ही अती मांसाहारामुळे मानवाचा दानव बनली आहे.आपल्या मांसा सहित कुत्रे,मांजरे,डुकरे,गाढवे,उंदरे,गाय,बैल हे पशू तर पारवे,लव्हरे,चित्रे या सहित अनेक चिमुकले जीव खाण्यास पुरत नाहीत…….तर अनेक मुक्या पशू-पक्ष्यांच्या जीवांचे मांस भक्षण करण्याचा सपाटा लावला आहे,ही खेदाची बाब आहे असेच म्हणावे लागेल!
बोकडोबा:-
मित्रा आपल्या यातनेची दखल घेईल का कुणी…..?जाब विचारेल का मानवाला कुणी…?ही परिस्थिती वरचेवर वाढणारीच चिन्हे दिसत आहेत.मानवावर कोरोणाचे गंडान्तर आल्याने जगभर हाह:कार माजलेला दिसतोय….!जो-तो जीव मुठीत धरुन जगतोय…मानव हा किती जीवाला भितोय हे आपण मार्च 2020 पासुन पाहतोय…..या पुढे किती दिवस चालणार आहे याचे गणित कुणासही कळेणासे झाले.आज मानवाला कळत आहे कि,जीव किती मौल्यवान आहे हे आज कळाले आहे…बघु या….या पुढे काय फरक पडतोय……का नाही…?
कोंबडोबा:-
बकरोबा तू मला सांग कंदोरी ही वाघाची कधी पाहिली का….?नाही ना…?….आपल्या सारख्या निष्पापांच्या मानेवर सुरी देवून बळीचा बकरा बनवता….ही उक्ती तंतोतंत खरी ठरते…..तुमच्या-आमच्या सारख्यांचा बळी देवून कंदोरी करतात..! हे मात्र नक्कीच…
जाऊ दे मित्रा….! आपल्या संवादातून शल्य मानवापुढे मांडण्याची संधी दत्तात्रय एमेकर गुरुजी,

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार…….. यांनी आम्हाला बोलकं केले म्हणुन आम्हा संवादातून शल्य मांडता आले…….!

त्यांना आमच्या दोघांच्या वतीने धन्यवाद…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *