नांदेड ; प्रतिनिधी
परतीच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होवून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतात पेरलेल्या बियाण्याचा सुद्धा शेतकर्यांना खर्च निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांवर आली आहे.
त्यात राज्य शासनाने तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी सरसगट शेतकऱ्यांना हरभरा, गहू ,ज्वारी व खत बियाणे मोफत देण्याची मागणी शिवराज्य युवा संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्य मंत्री व कृषीमंत्री ना विश्वजीत पाटील कदम यांच्याकडे शिवराज्य संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी कृषी राज्यमंत्री ना विश्वजीत पाटील कदम यांना केली.
नांदेड जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याची व्यथा त्यांनी आपल्या निवेदनात द्वारे त्यांच्याकडे मांडली आहे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे सरसगट हेक्टरी नुकसान भरपाई पन्नास हजार रुपये देण्यात यावेत व शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होणार नाही याची महाराष्ट्रातील सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी दिवाळी अगोदर त्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करण्यात यावे असेही विक्रम पाटील बामणीकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. जगाचा पोशिंदा असलेला माझा शेतकरी राजा आज दिवाळीच्या तोंडावर त्यांच्या खिशात दमडीही नसताना समोर आ वासून उभा टाकलेले खरीप हंगामाची पेरणी कशी करायची व बियाणे कुठून आणायचे अशा विचारात माझा शेतकरी अडकला आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी लागणारे बी बियाणे व खते तात्काळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात यावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे शिवराज्य युवा संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व कृषिमंत्री ना विश्वजीत पाटील कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनावर जिल्हाप्रमुख विक्रम पाटील बामणीकर ,जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड ,तालुकाप्रमुख भाऊसाहेब पाटील कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत