शेतकऱ्यांपुढे बँक प्रशासन नमले;मागण्या मान्य करूनच धर्मवीर शेतकरी संघटनेचे आंदोलन व आमरण उपोषण मागे

मागण्या मान्य करूनच धर्मवीर शेतकरी संघटनेचे आंदोलन व आमरण उपोषण मागे


लोहा/ प्रतिनिधी

पूर्वाश्रमीची देना बँक व सध्याची बँक ऑफ बडोदा यांनी शेतकऱ्यांची केलेली फसवणूक विमाहप्ता कर्जामध्ये वर्ग केल्यामुळे व शेतकऱ्यांचे परस्पर पिक कर्ज पुनर्गठित केल्याने शेतकऱ्यांनी दिनांक 21 ऑक्टोबर 2020 पासून ठिय्या आंदोलन सुरु केले सुरुवातीला बँक प्रशासन मागण्या मान्य करून घेण्यास तयार नव्हते कारण त्यांच्यामते ही जी काही फसवणूक झालेली आहे या सध्याचा एकही कर्मचारी जबाबदार नाही कारण सर्व स्टाफ बदली होऊन आलेला आहे त्यामुळे आम्ही याची माहिती किंवा यावर कार्यवाही करू शकत नाही.

अन्याय झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी धर्मवीर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनासोबत उपोषणाचा मार्ग अवलंबला विविध भाषणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली पाहता पाहता शेतकऱ्यांच्या अनेक समस्या समोर येत राहिल्या बँक प्रशाशनावर दबाव निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्या उपयोगी ठरू लागल्या साडेतीनशे शेतकरी निव्वळ बँकेने परस्पर फसवणूक करून पिक कर्ज खाते पुनर्गठित केल्याने सदर शेतकरी महाराष्ट्र सरकारच्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहीले बँकेचे मॅनेजर व इतर कर्मचारी ठराविक दलाल यांनी गावोगाव जाऊन लोकांना तुम्हाला कर्ज माफी मिळत आहे असे भासवून त्यांना इंग्रजी फॉर्मवर सह्या देण्यास भाग पाडले परंतु सदर फॉर्म हा पुनर्गठित कर्जाचा असल्याचे शेतकऱ्यांना लक्षात आले नाही. सहाजिकच सावरगाव ,हूलेवाडी मस्की,मंगरूळ,आडगाव,किरोडा, पोलीसवाडी कारेगाव, खेडकरवाडी , कोस्टवाडी, करेवाडी , मंचूनाईक तांडा सोनमांजरी हिपरगा इत्यादी गावातील शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आणी सदर फसवणूक शेतकऱ्यांच्या लकक्षात आली धर्मवीर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी कार्यालय, सहाय्यक निबंधक यांना या आंदोलनासोबतच आमरण उपोषण करण्याचे निवेदन सादर केले यासाठी धर्मवीर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव व शेतकरी प्रतिनिधी म्हणून गोविंद कोपनर सर यांनी उपोषणाला बसण्याचे ठरविले काही वेळातच प्रशासनाची कार्यचक्रे फिरण्यास सुरुवात झाली व काही मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन बँक प्रशासनाकडून मिळाले परंतु काही मागण्या मान्य न झाल्यामुळे उपोषणकर्त्यांनी शेतकऱ्यांनी व धर्मवीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अशा निवेदनास दाद न देता सविनय पद्धतीने आमरण उपोषण व ठिय्या आंदोलन चालूच ठेवले सलग तीन दिवस उपोषण चालू असल्यामुळे उपोषण कर्त्याच्या वजन व रक्तदाब यामध्ये फरक पडल्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाने दखल घ्यायला सुरुवात केली,आणि ज्या काही मागण्या शेतकरी संघटनेने मांडल्या होत्या त्या महत्वाच्या चार मागण्यांपैकी तीन मागण्या मान्य करण्यात आल्या. याबरोबरच आठ दिवसापासून चालत असलेले आंदोलन शेतकऱ्याने मोठ्या आनंदाने मागे घेतले. धर्मवीर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी शेतकरी दिगंबर मुकनर व लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांच्या हस्ते तर गोविंद कोपनर सर यांनी शेतकरी व बँक व्यवस्थापक आर राठोड सर यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण मागे घेतले. शेतकऱ्यांनी खूप मोठ्या पद्धतीने जल्लोष साजरा केला यावेळी सहाय्यक निबंधक कवनवार सर, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये तर बँकेचे व्यवस्थापक आर राठोड सर व तसेच संबंधित कृषी विभाग बँक ऑफ बडोदा लोहा पोलीस स्टेशन भा ज.पा तालुका अध्यक्ष शरद पवार कार्य अध्यक्ष आंनद पा गारोळे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण मोरे ऊप जिल्हाध्यक्ष शैलेश पाटील ढेंबरे अंगद पा मोरे जिल्हा कार्याध्यक्ष शुदर्शन शेंबाळे वि.आ.जिल्हाअध्यक्ष संग्राम डीकळे विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष वैभव जाधव शहराध्यक्ष योगेश चव्हाण गजानन मोरे बालाजी पाटील दिघे अमित पाटील बोरगावकर सचिन पाटील वाळवटे महेश कदम योगेश घोरबांड तसेच आदि गावातील शेतकरी कर्मचारी व लोह्यातील नागरिक उपस्थित होते.आंदोलन यशस्वी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक होताना दिसून आले.
या आंदोलनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांनी आभार मानले व यापुढेही संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल असे आश्वासन दिले..

***
यापुढे हा लढा चालू राहण्यासाठी धर्मवीर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील जाधव यांनी हायकोर्टात याचिका दाखल करू असे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *