भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या उपस्थितीत लोह्यात महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी

लोहा / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी च्या वतीने जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या लोहास्थित संपर्क कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीचा सोहळा साजरा करण्यात आला .भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा जि प सदस्या प्रणिताताई देवरे – चिखलीकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळीप स सभापती आनंदराव शिंदे भाजप अनु जाती प्रदेश सचिव माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल , माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम यांची विशेष उपस्थिती होती.


भाजप च्या संघटनात्मक बांधणी बळकट व्हावी यासाठी राज्यभर पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या विभाग कार्य करीत आहेत जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षाचे पदाधिकारी वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत.


महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या जयंती निमित्त खा चिखलीकर यांच्या लोह्यातील जनसंपर्क कार्यालयात जयंती सोहळा साजरा करण्यात आला. पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा जि प सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते महर्षी ऋषी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले भाजप अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश सचिव छत्रपती धुतमल यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पंचायत समितीचे सभापती आनंदराव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, प स उपसभापती नरेंद्र गायकवाड नगरसेवक दता वाले, नगरसेवक भास्कर पवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक बालाजी शेळके,भाजयुमो चे तालुकाध्यक्ष बंडू वडजे हळदवकर , भाजपा ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष अर्जुन राठोड , नगरसेवक नारायण यललरवाड, नवी शेख , मंगेश पाटील क्षीरसागर, अनिल धुतमल, विजय केंद्रे प्रवीण धुतमल, प्रभाकर कदम, हरी कोरडे, रामराव पाटील लोंढे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

भाजप अनुसूचित जाती प्रदेश सचिव छत्रपती धुतमल यांची नियुक्ती झाल्या नंतर त्यांच्या सेलचा हा पहिलाच कार्यक्रम होता. या विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ भालेराव आहेत यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जि प सदस्या प्राणिताताई यांनी भाजपा च्या ध्येयधोरण व पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कसे सतर्क राहिले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले .यावेळी सर्व उपस्थितीताचे नगरसेवक भास्कर पवार यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *