आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते लोहा ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

लोहा( प्रतिनिधी)

लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते नूतन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले, यावेळी आमदार शिंदे यांनी नारळ फोडून हिरवी झेंडी दाखवून रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जाधव, डॉ.चव्हाण ,डॉ. दिनेश मोटे, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये ,बगाडे, माजी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, , श्याम आण्णा पवार, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चौडे, युवा नेते रोहित पाटील शिंदे उपस्थित होते. कोरोणाच्या संकटात आमदार शामसुंदर शिंदे यांनी आपल्या निधीतून लोहा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिके साठी 16 लक्ष रु. व कंधार रुग्णालयासाठी 16 लक्ष रुपयांचा निधी आमदार निधीतून रुग्णवाहिके साठी आमदार शिंदे यांनी एकूण 32 लक्ष रुपयांचा निधी नवीन रुग्णवाहिका खरेदीसाठी दिला होता,

या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण शनिवारी लोहा, कंधार चे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते लोहा ग्रामीण रुग्णालयात हिरवी झेंडी देऊन करण्यात आले . यावेळी आ. शिंदे म्हणाले की लोहा, कंधार मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी 6 सूत्री कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून मतदारसंघात आरोग्य, शिक्षण, रोजगार ,दळणवळण, सिंचन व कृषी या कामांना सर्वप्रथम प्राधान्य देणार असल्याचेही यावेळी आ. शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लोहा पोलीस स्थानकाच्या रखडलेल्या इमारत बांधकामाच्या निधीसाठी आपण वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करून पोलिस स्थानकाच्या इमारतीचे अद्ययावत व सर्व सुविधा साठी लवकरच निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही यावेळी आ. शिंदे यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले.

यावेळी नूतन रुग्णवाहिकेच्या चालकांचा व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान केला .आ. शिंदे यांनी लोहा ग्रामीण रुग्णालयाला नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने लोहा तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, गंगाधर सूर्यवंशी, एक ज्ञानोबा पवार, माधव घोरबांड सचिन मुकदम, संतोष पवार, सुधाकर सातपुते, सचिन शिरसागर, शुभम कदम, सतीश कराळे, , अमोल गोरे, प्रसाद जाधव, अशोक सोनकांबळे आदींसह कार्यकर्ते सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *