नांदेड ; प्रतिनिधी
दिलीप ठाकूर यांचा लॉयन्सचा डबा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यामुळे खऱ्या अर्थाने रुग्णसेवा होत असल्याचे प्रतिपादन लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने श्री गुरुजी रुग्णालयात दि.१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन वर्ष अग्रिम नोंदणी केलेल्या अन्नदात्यांच्या नामफलकाच्या अनावरण प्रसंगी उद्घाटन करताना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
रविवारी झालेल्या शानदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयन्स प्रथम उपप्रांतपाल लॉ. दिलीप मोदी हे होते. व्यासपीठावर भाजपा नांदेड जिल्हाध्यक्ष प्रवीण साले,श्री गुरुजी ऋग्णालय अध्यक्ष डॉ. सुधीर कोकरे,भाजप सरचिटणीस विजय गंभीरे व श्रावण भिलवंडे,रिजनल चेअरपर्सन लॉ. अनिल तोष्णीवाल,झोनल चेअरपर्सन लॉ. डॉ. विजय भारतीया,लॉ. योगेश जैस्वाल,नेत्र रुग्णालयअध्यक्ष लॉ.नित्यानंद मैया , लॉयन्स क्लब नांदेड अध्यक्ष लॉ. दीपक रंगनानी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला प्रास्ताविक करताना प्रोजेक्टर चेअरमन ॲड. दिलीप ठाकूर यांनी आतापर्यंत लॉयन्सचा डबा व भाऊचा डबा या उपक्रमांतर्गत दोन लाख एकोणवीस हजार जेवणाचे डबे दिल्याचे सांगितले. यावेळी दिलीप मोदी, प्रवीण साले,डॉ. कोकरे यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या लॉयन्सच्या डब्याचे कौतुक केले.
यावेळी खासदार चिखलीकर यांनी लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल चे सदस्यत्व स्वीकारले. श्रीगुरुजी रुग्णालय येथे ज्यांनी-ज्यांनी अन्नदान करण्यासाठी अग्रिम नोंदणी केली आहे,त्या सर्व अन्नदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रावसाहेब धरने पाटील ,सूर्यकांत कदम, संतोष क्षिरसागर, सुनील रामदासी, गिरीश जोशी, गंगाधर कावडे, आदित्य शिरफुले, धनंजय नरबलवार, अरुण पोफळे, शांतनु सांगलीकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मेहरबान जाधव सर यांनी तर आभार प्रदर्शन सेंट्रल अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव लॉ. ॲड. उमेश मेगदे, रामनारायण बाहेती, नागेश शेट्टी, धनराजसिंह ठाकूर, दीपेश राठी, राजेशसिंह ठाकूर, मन्मथ स्वामी, हनुमंत येरगे, अरूण रेणके, भास्कर डोईबळे, सिद्धार्थ भिसे ,अजय हनुमंते यांनी परिश्रम घेतले.
( कार्यक्रमाच्या छाया: ज्ञानेश्वर सुनेगावकर, नरेंद्र गडप्पा, धनंजय कुलकर्णी, व्यंकटेश वाकोडीकर, नकुल जैन, संघरत्न पवार आदीनी टिपल्या.)