मुंबई दि (प्रतिनिधी) ऐतिहासिक भीमा कोरेगाव चित्रपटाचे प्रदर्शन बंद व्हावे या हेतूने मनुवाद्यांनि चित्रपट अभिनेता अर्जुन रामपाल याच्या घरावर छापे टाकले असून यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया डेमोक्रॅटिक आरपीआय व पँथर ऑफ सम्यक योद्धा केंद्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकनीकर यांनी दिली.
राज्यातील पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव स्थित भीमा नदीच्या काठावर झालेल्या येतिहाडीक लढाई, 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रच विरिद्ध पेशवे यांच्यात झाली, पेशव्यांच्या बाजूने 28000 सैन्य होते तर इंग्रज सैनिकांत बोंबे नेटिव्ही लाईट इन्फेन्ट्री तुकडीचे 500 महार सैनिक होते यांच्यात जोरदार लढाई होऊन पेशवाईचा अंत झाला असल्याचा इतिहास असून याच इतिहासाचे चित्रीकरण चित्रपटाच्या रुपात झाले आहे, यामुळे मनुवाद्यांची पार फाटली असून चित्रपट प्रदर्शित होण्यास बाधा आणावी व चित्रपट बंद पडावा यासाठी अर्जुन रामपाल याचे घरावर NCB मार्फत छापे टाकण्यात आले आहेत.
अर्जुन रामपाल यांच्या बांद्रा येथील घरावर अचानक NCB ने छापे मारून चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा हा मनुवादी लोकांचा मनसुबा असून मनुवाद्यांची मनसुबे डेमोक्रॅटिक आरपीआय व पँथर ऑफ सम्यक योद्धा उधळून लावेल असा इशारा पँथर डॉ राजन माकणीकर यांनी दिला.
सदर चित्रपटाच्या प्रदर्शनाला चित्रपट गृहावर डेमोक्रॅटिक आरपीआय व पँथर ऑफ सम्यक योद्धा या संघटनेचे कार्यकर्ते संरक्षणार्थ असतील त्यामुळे मान्यवाद्यांच्या कुठल्याही मन्सुब्यांना चित्रपट गृहाच्या मालकांनी घाबरू नये अश्या आशादायक सुचना ही पँथर माकणीकर यांनी दिल्या.
अर्जुन रामपालने मुळीच घाबरून जाऊ नये, आम्ही असपल्या सोबत असून इतिहास आपल्या साक्षीला असल्याची ग्वाही सुद्धा माकणीकर यांनी अर्जुन रामपाल यांना दिली.
बौद्ध भिक्खू पूज्य भदंत शिलबोधी यांच्या मार्गदर्शनावखाली युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात मनुवाद्यांच्या मन्सुब्या विरोधात, पँथर श्रवण गायकवाड, वीरेंद्र लगाडे, सचिन भूटकर, राजेश पिल्ले, गौतमदा सोमवंशी, नितीन माने, भाऊ शिवा राठोड यानच्यासह शेकडो कार्यकर्ते अर्जुन रामपाल व सिनेमगृहांना संरक्षण देण्यास सज्ज असतील, त्यामुळे अर्जुन रामपाल हुरळून जाऊ नये असा सल्लाही डॉ माकनीकर यांनी दिला.