मुले म्हणजे देवाघरची फुले,ही म्हण सर्वांना परिचित आहे.ही लहान मुले म्हणजे उद्याचे सुजाण नागरिक,देशाचा भक्कम आधारस्तंभ आहेत.त्यांना योग्यरीतीने घडवणे ही प्रत्येक माता पित्याची जबाबदारी आहे.
जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाला समृध्द बाल्य लाभावे,त्याला स्व:तासाठी कींवा समाजाच्या भल्याकरिता सर्व अधिकार व स्वातंत्र्य मिळावे म्हणून २०नोंव्हेंबर १९५९रोजी संयुक्त राष्ट्रानी बालहक्कांचा जाहीरनामा प्रसिध्द केला.तेव्हापासून २०नोव्हेंबर हा”जागतिक बालहक्क दिन”म्हणून साजरा केला जातो,आजही समाजाला मुलांच्या हक्कांची पुरेशी जाणीव नाही,संयुक्त राष्ट्राच्या बालहक्क संहितेत एकूण ५४कलमे आणि ४मुख्य अधिकार आहेत. बालकाला विशेष संरक्षण मिळावे,बालकाच्या शारिरीक,मानसिक,नैतिक,सामाजिक दृष्टिने विकास व्हावा तसेच बालकाला जन्मापासूनच नाव,राष्ट्रियत्व मिळण्याचा हक्क,सामाजिक सुरक्षततेबरोबर सर्व हक्क मिळावेत,मोफत व सक्तीचे प्राथमीक शिक्षण मिळावे हा या मागचा उद्देश आहे,
क्रूरता,पिळवणूक व दुर्लक्ष या प्रकारापासून बालकाला संरक्षण मीळावे,जातीय,धार्मिक वा अन्य प्रकारच्या भेदभावापासून त्याचे संरक्षण करणे.तसेच सैन्य हमल्यात काही दुखापत झाल्यास मुलांना आंतरराष्ट्रीय मानवता कायदा लागू आहे.तसेच बालकांसाठी सरकारी यंत्रणा कार्यान्वित आहे.पण,त्यांना साह्य करणे हे प्रत्येक सूज्ञ नागरिकांचे कर्तव्य आहे.
भारतीय घटनेत कलम २१(अ)मध्ये शिक्षणांच्या मूलभूत हक्कांसाठी ६ते१४वयोगटातील वयाच्या मुलांना बालक म्हटले आहे. कायदे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण युनिटीही स्थापन आहे.मुलांच्या बाबतीत शासन विशेष प्रकारची काळजी घेते.अनाथ,बेघर,अनैतिक संबंधातून टाकून दिलेली,शारिरीक दृष्ट्या अपंग,आजाराने ग्रासलेल्या बालकांना शासन जगण्याचा हक्क प्रदान करते.
बाल हक्का करिता खास योगदान दिल्याबद्दल कैलाश सत्यार्थी व मलाला युसूफजाई यांना सन २०१४चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला.आज बालहक्क दिनाच्या निम्मिताने बालअत्याचार,बालविवाह,बालगुन्हेगारी,बालमजुरीसारख्या प्रकरणातून बालकांचे उध्वस्थ होणारे जीवन टाळण्यासाठी बाल हक्कांची जाणीव बालकात व्हावी या दृष्टिने प्रयत्न करावेत.कारण,बालका संदर्भात विविध प्रश्न व समस्या आहेत त्यासाठी बालकांपर्यंत कायदे व नियम शासनाने तयार केलेले आहेत,या कायद्याची आमलबजावणी तेवढ्याच संवेदनशिलतेने होणे गरजेचे आहे.बालहक्क दिनाच्या सर्व बालकांना हार्दिक शुभेच्छा…!
सुजाण पालकांचे एकच लक्षण
मुलांचे आरोग्य,आणि पूर्ण शिक्षण.
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१