कंधार टेरिकाट घराघरात पोहोचवणारे व्यक्तीमत्व गोपाळराव एमेकर स्मृतिशेष….!

pencil #art by s.pradip

कंधार ;

कंधार म्हटले की आठवते मन्याड खोरे….राजकारण म्हटले की आठवते…लाल कंधारी धोंडगे-कुरुडे जोडगोळी….कंधार तालुका म्हटले की क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरी या चळवळीच्या नगरीत शेतकरी कामगार पक्षाचे कार्य सर्वज्ञात आहे.तेथील घराघरात कार्यकर्ते पाहावयास मिळतात. त्यातील एक कार्यकर्ता म्हणजे भाई गोपाळराव एमेकर…

ते व्यवसायात निपुण होते.ज्यावेळी आत्ताच्या विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आधी पुर्वीचे बसस्थानक होते.आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा होता.

त्या ठिकाणी भलेमोठा विशालकाय बोधीवृक्ष (वटवृक्ष) होता.त्या वडाच्या झाडाखाली गोपाळराव एमेकर, कोंम्पलवार, जयवंतराव कुरुडे,पुंडलिकराव कुरुडे,सावळारामजी कुरुडे,विश्वनाथराव गरुडकर,पुंडलिकराव एमेकर, गोविंदराव एमेकर, किसनराव झुंजरवार
आदींची कंधारी टेरिकाट कापड विकण्याची छोटी-छोटी गट्ट्याची दुकाने होती.

काळाच्या ओघात हे दुकान व्यवसायीक कमी-कमी होत गेले.पण भाई गोपाळराव एमेकर वयाच्या 80 व्या वयापर्यंत आपला व्यवसाय सुरुच ठेवला.कंधार टेरिकाट कंधारच काय अख्या नांदेड जिल्हाभर प्रसिद्ध झाला.या मागची मेहनत म्हणजे गोपाळराव एमेकर…!

विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकात बदल होत गेला.पण गोपाळराव एमेकर यांनी आपल्या व्यवसायातून ग्राहकांना शेवट पर्यंत दैवत मानुन शेवटच्या क्षणापर्यंत उभी हयात व्यवसायातून सेवा केली.त्यांना 80 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

गोपाळराव एमेकर pencil #art by s.pradip

त्यांना लोहा नगरीतील उत्कृष्ट पेन्सिल स्केच कलावंत आदरणीय प्रदीप दत्तात्रयजी सूर्यवंशी आदर्श शिक्षक श्री शिवाजी विद्यालय बारुळ ता.कंधार यांच्या पेन्सिल रेघोट्यातून आदरांजली वाहतांना सुंदर स्केच करुन टेरिकाट मसिहा गोपाळराव एमेकर यांचे स्मरण केले.

आदरणीय प्रदीप सूर्यवंशी सर यांचे ठळक वैशिष्ट् म्हणजे कोणत्याही महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी दिनी अभिवादन करतांना आपल्या आगळ्या-वेगळ्या पध्दतीने पेन्सिल स्केच करुन कलेतून अभिवादन करण्याची शैली समाजात अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे.

दिवंगत भाई गोपाळराव एमेकर या टेरिकाट कापड व्यवसायीकांना आपल्या पेन्सिल स्केचच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *