कंधार ; प्रतिनिधी
कलाकार,साहित्यिक,उद्योजक, गुणी जनांना राज्यसभा,विधान परिषद, स्विकृत सदस्य अशा अनेक माध्यमातून देशातील विधीसभेत प्रवेश दिला जातो त्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी दिव्यांगानाही सदस्यता देण्याची मागणी कंधार येथिल दिव्यांग कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांनी दि.२ नोव्हेंबर रोजी महामहीम राष्ट्रपती यांना तहसिल कार्यालया मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
भारतीय लोकशाही जगात विशालकाय आहे ,लोकशाहीत जातीनीहाय आरक्षण मंडल आयोगाने मिळवून दिले. समाजातील दिव्यांगाना केंद्र शासनाने दिव्यांग म्हणुन नामकरण केले. केवळ नामांतर करुन दिव्यांग बांधवाचा विकास होत नाही तर त्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी आरक्षण गरजेचे आहे.त्यासाठी दिव्यांग व्यक्ती देशातील सर्व विधीसभेत सदस्य म्हणुन बिनविरोध निवडल्या गेल्यास दिव्यांगाच्या अडीअडचणी मांडल्या जातील व सोडवल्या जातील . दिव्यांग व्यक्तींच्या अडीअडचणी सोडविण्यास देशातील सर्व विधीसभेत सदस्या दिल्यास खरा सामाजिक विकास साधता येईल.
शरीराने अपंग असलेल्या व्यक्ती पेक्षा बुध्दीने अपंग असलेल्या व्यक्ती समाजाला घातक असतात. कलाकार,साहित्यिक,उद्योजक,अनेक गुणी जनांना राज्यसभा,विधान परिषद, स्विकृत सदस्य अशा अनेक माध्यमातून विधीसभेत प्रवेश करतात.पण समाजातील दिव्यांग व्यक्ती फक्त या सदस्या पासून वंचित घटक आहे.त्यांना आरक्षणाची खरी गरज आहे.फक्त महिन्याला 1000 रु.दिव्यांग भत्ता देवून शासन आणि ग्राम पंचायत, नगरपालिका या ठिकाणी वर्षाला 5% निधी सर्व अपंगात विभागुन वाटप करतात. एवढ्याने अपंगाचा विकास होतो असा दावा करणे चुकीचे वाटते.जर सदस्यता मिळाली तर न्याय हक्कासाठी विधीसभेत प्रश्न मांडता येतील.शरिरीचा एक एक अवयव कमी झाल्याने त्यांच्याकडे दिव्यांग असतो हे शासनाने मान्य केले.
जर देशातील सर्व विधीसभेत सदस्यता मिळाल्यास त्यांना न्याय मिळेल असे वाटते.नोकरीत 3%आरक्षण कागदावर असतांना किती ठिकाणी त्यांची तंतोतंत अंमलबजावणी होते.हे संशोधनाचा विषय आहे.देशातील सर्व दिव्यांग बांधवांना सर्व विधीसभेत सदस्य म्हणुन निवड म्हणजे समाजिक क्रांतीचे एक पाऊल म्हणता येणारे आहे.
जागतिक दिव्यांग दिनी म्हणजे 3 डिसेंबर 2020 औचित्याने संत श्री गुरु नानकदेवजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भारताचे महामहिम राष्ट्रपती,पंतप्रधान, केंद्रीय मंत्री,महाराष्ट्राचे राज्यपाल,मुख्यमंत्री,सामाजिक न्याय मंत्री,प्रहार जनशक्ती सर्वेसर्वा आमदार व राज्यमंत्री मा.बच्चुभाऊ कडु यांचे सहित मा. जिल्हाधिकारी नांदेड आणि कंधार मामलेदार यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.
या निवेदनावर तालुक्यातील दिव्यांग बांधवासह अँड प्रा.डाॅ.प्रकाश डोम्पले,बालाजी चुकलवाड, मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड,अझहर बेग ,वैभव कल्याणकस्तुरे व अशूतोष मेहेत्रे आदीसह पत्रकार बांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.
**** video news******