नांदेड ;प्रतिनिधी
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे सुरू असलेल्या ” मायेची ऊब ” या उपक्रमांतर्गत धनगरवाडी येथील लहुजी साळवे निराधार निराश्रित बालकाश्रम मध्ये गीता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सी. बी. दागडिया आणि संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले.
गेल्या पंधरा दिवसापासून दररोज नांदेड शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर झोपलेल्या निराश्रितांच्या अंगावर मध्यरात्री ब्लॅंकेट टाकण्यात येते. आतापर्यंत पंधराशे चौदा ब्लँकेटचे वितरण करण्यात आले असून दोन हजार एकवीस ब्लॅंकेट वाटपाचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती प्रास्ताविकात ॲड. ठाकूर यांनी अनाथाश्रमातील कार्यक्रमात दिली. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ॲड.दागडियायांनी असे सांगितले की ,अशा उपक्रमाची समाजात खरोखरच आवश्यकता असून नागरिकांनी सढळ हातांनी मदत करावी.
संस्था सचिव लालबा घाटे यांनी संस्थेबद्दलची माहिती देऊन ज्या मुलांचे आई वडील मृत्यूमुखी पडले असतील अथवा आई वडिला पैकी एक जण देवाघरी गेले असतील अशा अनाथ मुलांची माहिती कळविल्यास त्यांना संस्थेमध्ये सामावून घेण्यात येईल असे सांगितले. यावेळी बालकाश्रमातील मुलांचे समूहगान, कविता, झिंगाट डान्स, विविध खेळ घेण्यात आले.
निसर्गरम्य परिसरात असलेल्या बालकाश्रमाची व्यवस्था पाहून ॲड. ठाकूर व दागडीया यांनी समाधान व्यक्त केले. बालकाश्रमातील
प्रजापती सूर्यवंशी, शिवा धुमाळ, आशा सावंत, बाबाराव काळे, कविता कल्याणकर, निखिल घाटे श्यामसुंदर वायवळे हे कर्मचारी उपस्थित होते.यापूर्वी अशोक तेरकर यांच्या हस्ते संध्याछाया वृद्धाश्रमात ब्लॅंकेट देण्यात आले होते.
नवीन ब्लॅंकेट देणाऱ्यामध्ये राजू गवारे,रेणुका जयप्रकाश सोनी,विजय राजाराम धारासूरकर, सुरेश कुलकर्णी मामा, सौ.अरूणा अरूण कुलकर्णी,कृष्णा जोशी बेंगलोर, कामेश चंदुलाल अग्रवाल अनसिंग, ज्ञानेश्वर शूर, नागेश गिरगावकर, वंदनाबाई अशोक पांडे भोकर, सत्यनारायण रतनलाल अग्रवाल,जीवन ज्योति हॉस्पिटल ,संस्कृती,महेश अशोकराव झांबरे,एन.डी. पवार गोळेगावकर, विठ्ठलसिंह चंदनसिंह गहेरवार, आदेश ओमप्रकाश गट्टानी,अशोक बाळाभाऊ केदारी,पंकज मिठ्ठेवाड यांचा समावेश आहे. ब्लॅंकेट वाटपासाठी संतोष भारती, राजेश नागोरिया, करण जाधव, राजेशसिंह ठाकूर, मारुती कदम हे परिश्रम घेत आहेत. उर्वरित पाचशे ब्लॅंकेट साठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, झोनल चेअरमन लॉ. डॉ. विजय भारतीया,सचिव लॉ.ॲड. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू यांनी केले आहे.