लिओ क्लब ऑफ नांदेड सेंट्रल च्या वतीने गरीब गरजू लोकांना जुने कपडे वाटप

नांदेड प्रतिनिधी

लिओ सेवा आठवडा प्रकल्प अंतर्गत लिओ क्लब ऑफ नांदेड सेंट्रल च्या वतीने गोकुळनगर, रेल्वे स्टेशन परिसर तसेच नगीनाघाट, बंदाघाट परिसरातील गरीब गरजू लोकांना जुने कपडे लॉयन्स सेंट्रल अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल व प्रथम उपाध्यक्ष लॉ.धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले असून शुक्रवारी बालाजी मंदिर व शनिवारी शनी मंदिर परिसरात जुने कपडे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष लिओ दिपेश राठी यांनी दिली.

लिओ क्लबच्या आवाहनानुसार नांदेड शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या जवळ असलेले जुने वापरण्यायोग्य कपडे जमा केले. या कपड्यांना व्यवस्थित करून शहरातील गरजूंना वाटप करण्यात येत आहे. यासाठी नांदेड सेंट्रलच्या लिओ क्लबचे सचिव लियो जान्हवी होटे, प्रकल्प प्रमुख लिओ ऋषिकेश यन्नावार, लिओ निलेश घानाचकर, लिओ सोनाली माने, लिओ शिवानी धामणकर, लिओ सबिता रामापोगू, लिओ प्रिया चौहान हे परिश्रम घेत आहेत. लिवो ॲडव्हायझर लॉ. डॉ. विजय भारतीया यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाद्वारे आतापर्यंत सुमारे शंभराहून जास्त गरजू लोकांना मदत करण्यात आली. नागरिकांनी आपल्या घरात असलेले न फाटलेले जुने कपडे लिओ क्लबच्या सदस्यांकडे जमा केल्यास त्याचा सदुपयोग केल्या जाणार असल्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन लिओ क्लब तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *