ऐलमा पैलमा


. संध्याकाळची वेळ . सूर्य मावळतीला टेकलेला . निस्तेज चेहरा घेवून डूबण्याच्या मार्गावर होता . मी त्या डूबत्या सूर्याच्या चेहर्‍याकडे पहात होतो . सूर्याकडे पहाताणा माझ्याही मनात अनेक विचारांचे काहूर माजले होते . प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवट असाच होणार नाही का ? येवढ्यात मोबाईलची रिंग खणाणली . मी भानावर आलो . फोन कळमनुरीच्या आदरणीय विजय वाकडे काकांचा होता . काका म्हणाले , ” मी उद्या नांदेडला येणार आहे . ” मी म्हणालो ,” घरी या काका. ” काका “हो” म्हणुन थोडावेळ इतर गप्पा गोष्टी केल्या . व फोन बंद केलं .


. काकांची व माझी जुनी ओळख नाहीच . अलिकडे जेमतेम एक वर्षाची ओळख . पण काकांकडे कला आहे माणसं जमवण्याची .मला माझे मित्र बापू गायखर यांनी बंजारा “होळी “वर एक लेख लिहिण्यास भाग पाडले . यापूर्वी मी कधीही लेख लिहीलो नव्हतो पण बापूच्या आग्रहस्तव तो कारनामा मी केलो . तो लेख दै . सकाळ मध्ये छापून आला होता . (बापूच्याच प्रयलाने )आदरणीय वाकडे कांकानी तो लेख वाचला व मला शाब्बासकी देण्यासाठी फोन लावला . जवळपास पंधरा मिनिटे त्यांनी माझी स्तुती केली . सुस्ती कोणाला नको असते ? मी ही त्याला आपवाद कसा राहीण ?
. नंतर काकांनी मला सतत फोन करत राहिले . आगदी जिव्हाळ्याने बोलत राहीले जणूकाही घरचा सदस्य असल्या सारखं . बोलण्यात “पडदा ” नव्हताचं व नाही .

प्रत्येक बोलण्यातून एकच मुख्य वाक्य ” काही तरी लिहा ” खरं तर मी लेखक नाही व लिहिण्याचा कधी प्रयत्न ही केलो नाही पण काकाश्री नेहमीच मला प्रेरित करत राहीले लिहा .. काही तरी लिहा . मी काहीही लिहू शकलो नाही . सुरवात कशी करावी हेच कळत नव्हते .


. गेल्या वर्षी हादगावच्या जि.प. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला . त्यात मी काकानाही बोलावण्यास सांगितलो . काका जवळपास सत्तरी ओलांडलेले असावेत पण उत्साह मात्र पंचविसीतील आहे . तरुणांना लाजवेल असा . काका हदगावला आले . सर्वांना सुंदर मागदर्शन केले . मार्गदर्शन करताना ते मला पंढरपूरच्या विठ्ठला सारखे भासत होते . काळासावळा रंग . बोलके डोळे . प्रसन्न हसत मुख चेहरा . डोक्यावर चंदेरी केसं . काटक शरिरयष्टी . झुपकेदार मिशा . करारी बाण्याचा हा माणूस माणूसकी पेरतोय ,जपतोय . माणूसकी वाढवतोय व तो पिकवतोय. बोलण्यात खूपच प्रेमळपणा जानवत होता . मी त्यांना प्रथमच पाहिलो .प्रथमच भेटलो पण कित्येक वर्षाची ओळख असल्या सारखे ते माझ्याशी बोलले . पाठीवर थाप मारुन मला म्हणाले , ” काही तरी लिहा तुम्ही छान लिहीता .” मी म्हणालो , ” काकाश्री मला काय लिहावे कसे लिहावे हे कळत नाही .” “जे सूचते ते लिहा ” काका म्हणाले . मी “हो “म्हणालो . व विषय संपवला


. बोलल्या प्रमाणे काकाश्री काल घरी आले . मला खूप आनंद झाला आठ दहा पुस्तकं लिहिलेला एक “लेखक ” माझ्या घरी आला याच मला भलतचं अप्रुप वाटलं .खूप आनंदही झालं. चहापाणी झालं . खूप वेळ गप्पा गोष्टी रंगल्या. काकांनी लिखाना विषयी भरभरून बोलले .
त्यांनी अलिकडेच लिहीले ” ऐलमा पैलमा ” नावाची कांदबरी भेट म्हणून प्रेमाने माझ्या हाती सोपवली . पाठीवर थाप मारून सांगितले , ” काहीतरी लिहा.” मी दिलेलं पुस्तक चाळत म्हणालो , ” हो काकाश्री .” काका पुन्हा भेटूया म्हणून निरोप घेवून कळमणूरी साठी रवाना झाले .


मी कांदबरी वाचण्यासाठी घेतलो . याप्रकारची कांदबरी मी प्रथमच वाचत होतो . ही कांदबरी म्हणजे पत्रांची देवान घेवान . पत्र पाठवायचं अलीकडून कुठेतरी व उत्तर येथे तेथून पलीकडून कुठून तरी . पत्ररूपाची कांदबरी काकांनी छान लिहीली आहे . वाचकांना मोहीत करणारी आहे .
. एकमेकास पत्रपाठविणारे हे काही तरुण नाहीत . ऐन तारुण्यात कोणाएका कॉलेजमधे शिकलेले व उतार वयात अचानक कुठेतरी भेटलेले . यांच्या पत्राची देवान घेवान ” या कडावरून त्या कडावर ” करत रहीले . दोघेही वयस्कार . उतार वयात काय समस्या असतात , काय समस्या येतात हे लेखकांनी छान पत्ररूपाने वाचकांसमोर मांडलेल्या आहेत . कांदबरीत दोनच पात्र एक केतू व दुसरी रेणू . रेणूच्या रुपाने लेखकानी भारतीय स्त्री कितीही शिकलेली असेल तर सनातनी धर्म सोडत नाही . मर्यादा पाळते . वेदना झेलते पण कोणाला सांगत नाही . “नातवाची तोडभरून ” प ” घेतली तर सुनबाईनी गुदमरल्यासारखा चेहरा केला ” हे वाचून घरघर की कहाणी सारखीच असते . मी ही एके ठिकाणी ऐकलो ” मुलांना आजी आजोबा कडे ठेवू नका संस्कार चांगले होणार नाहीत ” घरोघरी मातीच्याच चुली आहेत . सुपासारख्या मोठ्या काळजाने काळजी घेणाऱ्या आजी आजोबाचे काळीज सुपारी एवढे होवून जातात नाही का?


. मुले मोठी होवून घर सोडून दूर जातात पण घरात राहणारी आई किवा बाबा यांना स्वतःच घरटं सुटत नाही . मुलाचं वरवरचं बेगडी प्रेम त्यांना कळून चुकते . पण त्याना लाचारी नको असते . रेणू मध्यम वर्गीय स्त्रीयाचं प्रतिनिधत्व करते . तर केतू ही एक शिक्षक सेवा निवृती नंतर शेतीत रमतो ? शेतकऱ्या च्या काय हाल आहेत हे ही तो भोगतो विशेष करून मराठवाडा विकासाच्या बाबतीत कसा भक्कास आहे तेही पत्र कांदबरीतून दिसून येते . तीन पायाचा बाप ( एक काठी अधार म्हणून ) जेव्हा मुलावर अवलंबून असतो तोच नापिकीला कंठावून आत्महात्या करतो तेव्हा त्या कुटुम्बार काय बीतत असेल? काकांनी हे त्याच्या शब्दांत कथन केलेले आहे.


. ” कांदबरीचा नायक सांगतो , ” एखाद्याच्या सहानुभूतीवर जगण्याचे आयुष्य कोणाच्या वाट्याला येवू नये . सहानुभूती माणसाला दूबळं बनविते . रडणं स्वतःसाठी नसावं ते दुसऱ्या साठी असावं .” यातचं जीवनाचं मर्म लपलेलं आहे . दुसऱ्या साठी आपण किती जगतो?


.. एकंदरीत ऐलमा पैलमा ही ११२ पानांची पत्ररूपी कांदबरी वाचणीय झालेली आहे .

M.R.RATHOD


राठोड एम . आर . (गुरुजी )
“गोमती सावली ” काळेश्वरनगर
विष्णुपूरी ,नांदेड . ९९२२६५२४o७ . 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *