ग्राम पंचायत निवडणूक काळात आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या.. पोलीस निरीक्षक व्ही.व्ही गोबाडे

फुलवळ (धोंडीबा बोरगावे)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र चालू झाली असून उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . निवडणूक काळात कुठेही अनुचित प्रकार घडूनये त्यानिमित्ताने कंधार पोलीस ठाण्याच्या वतीने गावोगावी शांतता कमिटीच्या बैठकी घेऊन ग्राम पंचायत निवडणूक काळात आचार संहितेचा भंग होणार नाही याची प्रत्येकांनी काळजी घ्यावी असे आवाहन कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही.व्ही.गोबाडे यांनी केले.

फुलवळ सर्कल मधील होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणूक तिच्या गावागावात ग्रामस्थांनी व इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन प्रत्येकांनी समंजसपणा घेत आचार संहितेचे तंतोतंत पालन करावे तसेच सध्या गेली अनेक महिन्यापासून सर्वत्र हाहाकार घातलेल्या कोरोना ( कोविड १९ ) चा विचार करता शोसल डिस्टन्स , मास्क , सॅनिटायझर आदी बाबींचा वापर स्वतः करावा आणि इतरांनाही करायला सांगावे असे मत पो.नि. व्ही.व्ही.गोबाडे यांनी आज फुलवळ येथे आयोजित शांतता कमिटी च्या बैठकीत उपस्थित ग्रामस्थ व उमेदवारांसमोर व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की आज आम्ही आपणास कोणीही शासन नियमांचे उल्लंघन करू नये हे सांगतानाच आपण ग्रामस्थांनी पोलीस व प्रशासनाला मोलाचे सहकार्य करावे हे सांगण्यासाठी आलोय . तसेच ज्या ज्या ठिकाणी आमचे आपणास सहकार्य लागेल तेंव्हा बिनधास्त कोणीही एक फोन करावा आम्ही धावून येऊ पण जर का कोणी कायदा हाती घेण्याचा प्रयत्न केला आणि शासन नियमांचे उल्लंघन केले तर त्यांना मात्र कायद्याच्या चौकटीत बसवून योग्य ती कार्यवाही पण करू असे ठणकावून सांगितले.

यावेळी कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. व्ही.गोबाडे, बिट जमादार मधुकर गोंटे , सुनील पञे, तुकाराम जुने , राठोड , शेख मगदूम , नारायण गोंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर गावातील पो. पा. इरबा देवकांबळे , तंटामुक्त समिती अध्यक्ष धोंडीबा मंगनाळे , जेष्ठ नागरिक नारायणराव मंगनाळे , दिगंबर मंगनाळे , बसवेश्वर मंगनाळे , सदाशिव पटणे , नवनाथ बनसोडे , धम्मानंद जाधव , तुकाराम फुलवळे , खाज्यामियाँ पठाण , नागेश सादलापुरे यांच्या सह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *