आणखी किती वर्षे मनुस्मृती जाळणार?

नाशकातील येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभुमी स्मारकात आज ९३ वा मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी सुभाष गांगुर्डे यांचे हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुक्तीभूमी व्यवस्थापक व संशोधन अधिकारी पल्लवी पगारे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे यांनी पूजन केले. पगारे यांचे स्री मुक्ती दिनानिमित्त भाषण झाले. नांदेडमध्येही आॅल इंडिया पँथर सेनेने मनुस्मृती दहन केले.

२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षीप्रमाणे आज २५ डिसेंबर रोजीही राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले गेले. खरोखरच काय साधतो आपण हे सारे करून? बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा मनुस्मृती जाळली तेव्हा आता आपणाला वारंवार जाळण्याची आणि तो दिवस साजरा करण्याची आवश्यकता आहे काय?

गेल्या वर्षी याच दिवशी मुंबईत पुरोगामी-डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी एक मोठा मोर्चा काढला होता. त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यातल्या बऱ्याच जणींनी तिथे भाषणे केली. काहींनी परिवर्तनाची जोशपूर्ण गाणी म्हटली, तर काहींनी पथनाटय़े सादर केली. स्त्रियांवर शेकडो वर्षांपासून अन्याय-अत्याचार होत आलेत, ते थांबले पाहिजेत. महिलांशी सन्मानाचा, समतेचा, न्यायाचा व्यवहार झाला पाहिजे, असा या भाषणांचा आशय होता. या सर्व भाषणांमध्ये स्त्रियांना गुलाम करणाऱ्या मनुस्मृती या धर्मग्रंथाचा विषय निघणे साहजिकच होते. अर्थातच शेवटी, मनुस्मृतीचे प्रतीक तयार करण्यात आले आणि त्याचे संतापदग्ध अभिनयासह दहन करण्यात आले.

विद्रोही, क्रांतिकारी वगरे लोकांच्या संमेलनांमध्येही हटकून मनुस्मृती दहनाचा समावेश असतो. बऱ्याचदा हा ‘धगधगता’ प्रसंग साजरा करूनच कार्यक्रम सुरू केला जातो. मंचावर चातुर्वण्र्य व्यवस्थेचे प्रतीक म्हणून एकावर एक चार मडकी ठेवून ती उतरंड दातओठ खात रागारागाने लाकडाच्या दांडक्याने फोडणे, हा पुरोगामी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा आणखी एक ‘अभिनव’ प्रकार अलीकडे रूढ होऊ पाहतो आहे. कितीही प्रयत्न केले तरी समाजात परिवर्तनच होत नाही, अशी तक्रार पुरोगामी-परिवर्तनवादी करत असतात. सगळ्याच गोष्टी इतक्या उथळ पातळीवर चालल्या असतील तर कसे होईल परिवर्तन?

मनुस्मृती दहनाचे काय कारण होते?

दि. ३ फेब्रुवारी १९२८ च्या बहिष्कृत भारतच्या अंकात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे, त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे कि, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्या विषयी समाजात अनादर वाढवणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत…त्यात धर्माची धारणा नसून, त्यात धर्माची विटंबना आहे आणि समतेचा मागमूस नसून, समतेची मात्र धुळवड घातली आहे, स्वयं निर्णयाचे तत्व प्रस्थापित करण्यास निघालेल्या सुधारणावाद्यांस असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही, एवढेच दर्शविणेकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.”

याला विरोध म्हणून भारतीय संविधानही दिल्लीत जाळण्यात आले होते.

समता परिषदेच्या व्यासपीठावर यापुढे एक वेळ समई पेटणार नाही; पण मनुस्मृतीचे दहन केले जाईल, अशी घोषणा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ती बुधवारी श्रीगोंद्यातील कार्यक्रमात अंमलातही आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर पुणेरी पगडीऐवजी फुले पगडीने यापुढे स्वागत, सत्कार केले जातील, ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या घोषणेनंतर भुजबळ यांच्या नव्या घोषणेने मनुस्मृती दहनाची चर्चा सुरू झाली आहे.
जूनमध्ये पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा झाला. तुरुंगातून बाहेर आलेल्या भुजबळ यांनी प्रथमच या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांचे स्वागत फुले पगडी देऊन करण्यात आले. हा धागा पकडून पवार यांनी ती घोषणा केली होती. त्यावर पुढे वाद झाला. त्यावर पवारांना खुलासाही द्यावा लागला. पुणेरी पगडीचा अवमान करण्याचा हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात त्यानंतर पक्षाचे अनेक कार्यक्रम झाले; पण तेथे फुले पगडी दिसली नाही.
आता भुजबळ यांनी मनुस्मृतीसंबंधी घोषणा केली आहे. मनुस्मृतीच्या विषयावरून त्यांना नुकतेच धमकीचे पत्र आले आहे. त्यामुळे त्यांनी हा विषय उचलून धरण्याचे ठरवलेले दिसते. बुधवारी भुजबळ नगर जिल्ह्यात आले होते. त्या वेळी श्रीरामपूर आणि श्रीगोंदे येथे बोलताना त्यांनी याचा उल्लेख केला. श्रीगोंदे येथे समता परिषदेच्या कार्यक्रमात स्टेजवरच मनुस्मृतीचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. यापुढे समता परिषदेच्या कार्यक्रमात एक वेळ समई पेटविणार नाही; पण मनुस्मृती जाळल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही, अशी घोषणाच त्यांनी केली आणि प्रत्यक्ष कृतीही केली.

त्यानंतर त्यांना धमकीचं पत्र आल्याच्या वृत्ताला छगन भुजबळ यांनी दुजोरा देत आपण कुणाला घाबरत नसल्याची प्रतिक्रिया दिली, अशा पत्रांना मी काही फारशी किंमत देत नाही. कुणी अशी धमकीची पत्रं दिल्यानं मी माझं काम थांबवणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तो मनुस्मृती ग्रंथ जाळला आणि देशाला संविधान देऊन सगळ्यांना समतेचा अधिकार दिला. मग पाच हजार वर्षं आमच्यावर अन्याय करणारा मनुस्मृती त्या विचारांना परत आणत असेल तर तो आम्ही परत परत जाळणार. त्यांच्या विरुद्ध बोलणार, मी कुणालाही घाबरत नाही,” असं छगन भुजबळ यांनी ठणकावलं होतं.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ठार मारणाच्या धमकीचं तीन पानी पत्र आलं आहे. “शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी यांच्या विषयी कोणतीही टिपण्णी करू नका अन्यथा तुमचा दाभोळकर, पानसरे होईल,” असा पत्रातील मजकुराचा आशय आहे. यासंदर्भात नाशिकमध्ये पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. रविवारी सकाळी भुजबळ यांच्या नाशिकमधल्या भुजबळ फार्मच्या पत्त्यावर हे पत्र आलं. या तीन पानी टाईप केलेल्या पत्रात शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला होता. भिडे गुरुजींबद्दल वाक्‍यही तोंडातून काढू नये अन्यथा तुमचा दाभोळकर-पानसरे झालाच म्हणून समजा,’ अशा आशयाची धमकी त्यात देण्यात आली होती. या पत्रात मनुस्मृतीविरोधात न बोलण्याचा इशारा सुद्धा भुजबळ यांना देण्यात आला होता.

मनुस्मृतीच्या संदर्भात समर्थक आणि विरोधक हे नेहमीच आमने-सामने येतात. नोव्हेंबर महिन्यात बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती हा वादाच्या भोवऱ्यात सापडली होता. यावेळी अमिताभ यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकाला मनुस्मृती दहनाविषयी एक प्रश्न विचारला. त्यावरुन त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरुन नेटकऱ्यांनी केबीसीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल. याशिवाय अमिताभ यांनाही नेटक-यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं.
यामुळे हिंदुच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे लखनौ येथे कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचे आयोजक आणि अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे लहान मुलांच्या मनावर आपल्या हिंदु संस्कृतीविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. त्याला अग्निहोत्री यांनी कोडिंग असे म्हटलं आहे. भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांनी सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्यावर तक्रार दाखल करावी अशी मागणी केली होती.

काही लोकं म्हणतात की, २५ डिसेंबर १९२७ रोजी प्रतीकात्मक पद्धतीने केलेल्या मनुस्मृती दहनाची आठवण आजही प्रकर्षाने जागी होते. महाडच्या चवदार तळ्याचा खुला वापर आणि काळाराम मंदिर प्रवेशाचा संदर्भ यामागे होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केलेल्या त्या कृतीतून एकाच वेळी जातिभेद आणि स्त्रीदास्य या दोहोंच्या अंतासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त झाला होता. मनुस्मृती दहनाची कृती हिंदू धर्मातील भेदभाव आणि शोषणाला समर्थन देणार्‍या विचारसरणीच्या विरोधात होती. त्यातूनच समता, न्याय आणि परस्पर आदर यावर आधारित समाज तयार होईल याची बाबासाहेबांना खात्री होती. त्या वेळी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘ज्ञान ही पुरुषांची किंवा कोण्या एका जातीची मक्तेदारी नाही. सर्व जातीतील स्त्री-पुरुषांना ते उपलब्ध असायला हवे…’ स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरही समतेच्या आंदोलनाला यातून पाठबळ मिळाले आहे.

सत्तरच्या दशकापासून सक्रिय असलेली स्त्री चळवळ अनेक बाजूने वाढली. स्त्रियांवर कुटुंबात आणि कुटुंबांबाहेर होणार्‍या हिंसेच्या प्रश्नावर काम केले. दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, कष्टकरी आणि आदिवासी स्त्रीचे आजच्या समाजव्यवस्थेत तिहेरी शोषण होते, ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. त्यामुळे नव्वदच्या दशकात या स्त्रियांच्या प्रश्नांभोवती वेगवेगळ्या संघटना तयार झाल्या. त्याचाच एक भाग म्हणून १९९६ मध्ये ‘विकास वंचित दलित राष्ट्रीय महिला परिषद’च्या डॉ. प्रमिला लीला संपत यांनी चंद्रपूर येथे हजारो महिलांच्या साक्षीने मनुस्मृती दहन दिवस ‘भारतीय महिला दिन’ म्हणून जाहीर केला. त्यामागचा विचार असा होता : प्राचीन काळी मनुस्मृतीने स्त्री आणि शूद्र यांना दुय्यम मानले. स्वातंत्र्यानंतर घटनेत वर्ग, वर्ण, लिंग आणि जातिभेदाला नकार देत समतेचे तत्त्व आपण स्वीकारले.

मूठभर त्रैवर्णिक पुरूषांना उच्च आणि तमाम बहुजनांना नीच मानणारा हा कायदा, सरसकट समस्त स्त्री वर्गाला गुलाम मानणारा हा मनू, उच्चवर्णियांचे हितरक्षण करताना माणुसकीला काळीमा फासणारा हा ग्रंथ तिनदाच काय पुन्हापुन्हा जाळायला हवा. जोपर्यंत मनुची पिलावळ जिवंत आहे, तोवर नियमितपणे जाळायला हवा. नाकारायला हवा. समर्थकांच्या तोंडावर थुंकण्यासाठी गटारात फेकायला हवा.

बाबासाहेबांना कुठे संस्कृत येत होते? त्यांना काय माहित मनुस्मृतीत काय होते? असले साळसूद प्रश्न विचारणार्‍या हरामखोरांना जोड्यानेच मारायला हवे. भडव्यांनो, तुमच्या बापजाद्यांनी त्यांना संस्कृत शिकू दिले नाही. त्यांना शाळेत त्याऎवजी पर्शियन शिकावे लागले. तरिही त्यांनी पुढे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सोहनलाल शास्त्री अशा मान्यवरांच्या खाजगी शिकवण्या लावून संस्कृतवर हुकमत मिळवली.

ज्या माणुसकीच्या शत्रूने म्हणजे मनूने [ ती व्यक्ती असो, संस्था असो, मठ असो, ब्राह्मण किंवा क्षत्रिय असो ] गटारगंगा पसरवली, ज्या नीच प्रवृत्तीने ८५ % स्त्री शूद्रांना जनावरांपेक्षा हीन वागणूक दिली, उच्च प्रतीची गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही, संडासला बसतानाही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांनी वेगवेगळ्या दिशांना तोंडे करून बसावे, ब्राह्मणाचे नाव मंगलवाचक तर शूद्राचे नाव किळसवाणे ठेवावे, स्त्री- शूद्रांनी शिक्षण घेणे हा गुन्हा आहे, स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती. नरहर कुरुंदकरांनी मनुस्मृतीवर तीन व्याख्यानं दिली होती. त्या व्याखानांच्या संग्रहात कुरुंदकरांनी मनुस्मृतीचं अंतरंग उलगडून दाखवलं आहे. “माझी भूमिका मनुस्मृती दहन करण्याचे स्वागत करणारीच आहे,” असं कुरुंदकर स्पष्ट करतात.

मनुस्मृतीचं स्वरूप सांगताना कुरुंदकर लिहितात, “इसवी सनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकापासून या ग्रंथाच्या निर्मितीला सुरुवात झाली. पहिल्या अध्यायात ग्रंथारंभ, सृष्टीची निर्मिती, चार युगे, चार वर्ण, त्यांची कामे, ब्राह्मणांचे मोठेपण हे विषय आले आहेत. दुसऱ्या अध्यायात ब्रह्मचर्य, गुरूसेवा इत्यादी संस्कारांची माहिती देण्यात आली आहे. तिसऱ्या अध्यायात विवाह प्रकार, विवाह विधी आणि श्राद्धाची माहिती आहे. चौथ्या अध्यायात गृहस्थधर्म, भक्ष्याभक्ष्य, २१ प्रकारचे नरक इत्यादी माहिती आहे.”

“पाचव्या अध्यायात स्त्रीधर्म, शुद्धाशुद्ध इत्यादी माहिती पुन्हा देण्यात आली आहे. सहाव्या अध्यायात संन्यास आश्रम, सातव्या अध्यायात राजधर्म, आठव्या अध्यायात व्यवहार, साक्ष, गुन्हे, न्यायदान ही माहिती आहे. नवव्या अध्यायात वारसाहक्क, दहाव्या अध्यायात वर्णसंकर, अकराव्या अध्यायात पाप म्हणजे काय, हे सांगण्यात आलं आहे, बाराव्या अध्ययात तीन गुण, वेद प्रशंसा हे विषय आहेत. हे या ग्रंथांचं साधारण स्वरूप आहे,” कुरुंदकर सांगतात.

मनुस्मृतीचे समर्थक म्हणतात की जग ब्रह्मदेवानं निर्माण केलं आणि या जगाचा कायदा देखील प्रजापती-मनू-भृगू या परंपरेतून आला आहे त्यामुळे तो मान्य करावा, असं म्हणणाऱ्यांचा एक गट आहे,” असं कुरुंदकर सांगतात.

“दुसरं असं समर्थन आहे की स्मृती या वेदावर आधारित असतात आणि मनुस्मृती वेदसंगत असल्यामुळे मनुस्मृती वंदनीय आहे. पीठांचे शंकराचार्य, मठाधीश हे लोक याच आधारे मनुस्मृतीचं समर्थन करतात, असा दुसरा गट आहे. तिसरा गट आधुनिक समर्थकांचा आहे. आधुनिक शिक्षण घेतलेले हे लोक म्हणत की किरकोळ बाबी वगळल्या तर मनूची भूमिका ही समाजकल्याणकारी होती असा हा गट मानतो,” असं कुरुंदकरांनी त्यांच्या पुस्तकात स्पष्ट केलं आहे.

संभाजी भिडे यांनी मनू हा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांपेक्षा श्रेष्ठ होता असं म्हटलं. त्यावेळी केलेल्या भाषणात भिडे म्हणाले मनूने विश्वकल्याणासाठी हा ग्रंथ लिहिला होता. मनू हा महान कायदेपंडीत होता. म्हणून त्याचा पुतळा राजस्थान हायकोर्टाबाहेर लावण्यात आल्याचं वारंवार सांगितलं जातं.
“हा पुतळा जयपूरच्या बार असोसिएशननं उभारला आहे. त्यावेळी बार असोसिएशनमध्ये बहुतांश वकील हे उच्चवर्णीय होते त्यांनी या पुतळ्यासाठी हट्ट धरला. पहिल्यांदा कायदा लिहिणारा मनू आहे असं सांगून हा पुतळा उभा केला.

सनातन संस्था देखील मनुस्मृतीचं समर्थन करते. मनुस्मृती जाळावी की अभ्यासावी या ग्रंथाची निर्मिती सनातन संस्थेनं केली आहे. मनुस्मृतीतील मार्गदर्शनानुसार राज्यव्यवस्था अस्तित्वात होती असा दावा सनातननं केला आहे. नित्शे या जर्मन तत्त्ववेत्यावर मनुस्मृतीचा विलक्षण प्रभाव होता असं देखील सनातननं म्हटलं आहे. मनुस्मृतीमध्ये जातीयवादाचा उल्लेख नसल्याचं देखील सनातन म्हणतं.

महाराष्ट्रातच नव्हे तर तामिळनाडूमध्येही मनुस्मृतीवरील प्रकरण चांगलेच तापले होते. विदुथलई चिरुथैगल काच्ची पक्षाचे प्रमुख टी. तिरुमावलवन यांनी मनुस्मृतीवर केलेल्या वक्तव्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. तिरुमावलवन यांच्या वक्तव्यावर राज्यात विरोध होऊ लागला आहे. भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या खुशबू सुंदर यांना पोलिसांनी चेंगलपट्टू जिल्ह्यात ताब्यात घेतले आहे. त्या तिरुमावलवन यांच्या मनुस्मृतीवरील टिप्पणीचा विरोध करण्यासाठी जात होत्या. खुशबू सुंदर यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

विदुथलई चिरुथैगल काच्ची पक्षाचे प्रमुख टी. तिरूमावलवन यांनी मनुस्मृतीवर टीका करताना मनुस्मृती हा ग्रंथ महिलांचा अपमान करत असून त्यांना खालचे स्थान देते असे म्हटले होते . मनुचा धर्म महिलांशी केवळ उपभोगाची वस्तू अर्थात शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या रुपात व्यवहार करतो. या कारणामुळे मनुस्मृतीवर बंदी आणली पाहिजे, असे वक्तव्य टी. तिरूमावलवन यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याला अनेकानी विरोध केला होता. आज भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने कुड्डलोर येथे निदर्शनांचे आयोजन केले होते.

हे आयोजन खुशबू सुंदर यांच्या नेतृत्वात होणार होते. कुड्डलोरला जात असतानाच पोलिसांनी खुशबू सुंदर यांना ताब्यात घेतले. तुरुमावलवन यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.तिरुमावलवन यांच्या या वक्तव्यामुळे जातीय तणाव वाढू शकतो.दरम्यान,आपल्या वक्तव्यावर टी. तिरूमावलवन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण केवळ मनुस्मृतीचा हवाला दिला होता. मनुस्मृतीवर बंदी घातली गेली पाहिजे. भारतीय जनता पक्ष जातीय तणावाला उत्तेजन देण्यासाठी खोट्या बातम्या प पसरवत आहे, असे तिरूमावलवन यांनी म्हटले होते. त्याचबरोबर टी. तिरूमावलवन यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई विरोधात डीएमके, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला होता. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी महिला काँग्रेसने संविधान बचाव मोहीमेची सुरवात २०१८ मध्ये करण्यात आली होती. नागपुरात या मोहिमेत मनुस्मृती आणि इव्हिमचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.

सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे पोस्ट केले जाते. एका महाशयाने लिहिले होते की,
राजस्थान उच्च न्यायालयाच्या इमारतीसमोरील मनुच्या पुतळ्याचे फोटो शेयर करून लिहिलेले आहे की, राजस्थान उच्च न्यायालय जयपूरच्या प्रांगणातील “महर्षी मनू महाराज” यांच्या मूर्तीचे अनावरण डॉ. राजेंद्रप्रसाद (राष्ट्रपती भारत सरकार) आणि डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (कायदा मंत्री भारत सरकार) यांचे हस्ते झाले होते. या प्रसंगी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या भाषणातील एक वाक्य “Manu was the first ‘LAW GIVER’ of the world ” हे त्या पुतळा स्तंभावर कोरलेले आहे. यावरून बरेच वादंग निर्माण झाले होते.

अशा काही भूमिका येथे मांडण्यात आल्या आहेत. सूनील बौद्ध म्हणतात, धर्माच्या नावाने गुलामी लादणाऱ्या, माणसाला मानसिक गुलाम बनवणाऱ्या, लोकानं मध्ये भेदाभेद करून जातीव्यवस्था निर्माण करणाऱ्या, सर्व स्त्री जातीला शूद्र मानणाऱ्या, समाजात माणूस म्हणून असमानतेची वागणूक देणाऱ्या मनुस्मृती दहनाला आज ९३ वर्ष पूर्ण झाली.
ज्या मनूने छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेकास विरोध केला, ज्या मनूने संभाजी राजांना हालहाल करून मारले,
ज्या मनूने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबांना शूद्र म्हणून हिनवले. ज्या मनूने बाबासाहेबांना अस्पृश्य म्हणून वर्गाबाहेर बसवले.
मानवतेला घातक असणाऱ्या त्याच मनूला बाबासाहेबांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी दहन केले. मनू मानसिक गुलामी लादणाऱ्यात व गुलामगिरी करणाऱ्यात अजूनही जिवंत आहे. समाजहितासाठी तिला जाळलेच पाहिजे….!

मनुस्मृती दहन दिनाच्या सर्व भारतीयांस मंगलमय शुभेच्छा व गुलामगिरीतुन मुक्त केल्या बद्दल.

Thanks_Babsaheb

LoveYouBabsaheb

२. २५ डिसेंम्बर १९२७ रोजी महाड मुक्कामी मनुस्मृती दहन केली
व स्त्री वर्गाला मनुस्मृतीच्या बंधनातून मुक्त केले 💙🔥
✍🏻 insta//Bhimshahi 358


ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे हक्क नाकारले
ज्या मनुस्मृतीने शिवरायांना ‘शूद्र’ मानून त्यांचा राज्याभिषेक नाकारला होता, त्याच मनुस्मृतीला रायगडाच्या पायथ्याशी जाळून शिवरायांच्या अपमानाचा बदला घेणारा बहाद्दर मावळा म्हणजे ‘महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ होय…

३. 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिन अर्थात #स्त्रीमुक्तीदिन. मनुने स्त्रीयांवर लादलेल्या जाचक कायद्याचे आजच्या दिनी राष्ट्रनिर्माते बाबासाहेब डाॅ. आंबेडकर यांनी दहन कले. मनुस्मृतीने स्त्रीयांना गुलाम बनविले होते,त्यांना शिक्षणापासुन वंचित ठेवले होते.
भारतीय संविधानाच्या क्रांती मुळे भारतातील स्त्री शिक्षित बनुन आज प्रत्येक क्षेत्रामध्ये निर्भयपणे वावरत आहे.
मनुस्मृतीने स्त्रीयांना गुलाम बनविले, व भारतीय संविधानाने स्त्रीयांना या देशाचे राष्ट्रपति व पंतप्रधान बनविले.

२५ डिसेंबर,स्त्री मुक्ति दिनाच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा!!💐💐💐

धन्यवाद
अभिषेक पवार
लोकशाही राष्ट्रवादी संस्था
मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय

४.#नांदेड मनुस्मृती दहन करण्यात आलं!
महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पायथ्याशी ऑल इंडिया पँथर सेनेनी केले मनुस्मृतीचे दहन..!

AllindiaPantherSena

५. 25 डिसेंबर 1927 ला आमच्या हिमालयासमान उंचीच्या आणि समुद्राइतक्या विशाल हृदयाच्या बापाने स्त्रीला,मनुष्यमात्राला हीन लेखणारा अमानवी पाशवी आणि केवळ ब्राह्मण्यवादाचा पुरस्कार करणारा दलिंदर ग्रंथ जाळूनच टाकला नसता तर आज स्वाभिमानाने जगण्याऐवजी पशुतुल्य जीवन जगले असते सगळे.

आजही तो दिवस आठवला की मनुवादी विकलांग होतात,आणि त्यांचे विषारी मनसूबे बाबासाहेबांचे नाव ऐकताच एका क्षणात उध्वस्त होतात.

मनुस्मृती दहन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

जयभिम

#जय_संविधान

विजय_वाहुळ

वॉइसऑफआंबेडकराइट

दिरिपब्लिकनमुव्हमेंन्ट

६. 25 डिसेंबर खऱ्या अर्थाने आज महिला दिन साजरा गेला केला पाहिजे ज्या मनुस्मृतीने स्त्री ला अपत्रिव समजून पशु पेक्षाही हीन वागणूक दिली त्याच मनुस्मृती ची होळी करून डॉ बाबासाहेब यांनी या स्त्रियांना हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्ती दिली
म्हणून ज्या स्त्रियांनि एकदा ही मनुस्मृती वाचली नाही त्यांनी वाचून घ्या ,कदाचित त्यानंतर तुम्हला संविधानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री सन्मान व स्त्री मुक्तीसाठी बहाल केलेल्या हिंदू कोड बिलाचा महत्व समजेल🙏

७. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्याच तारखेला १९२७ रोजी मनुस्मृती जाळली होती.बहुजन वर्गाला कर्मकांडात गुंतवून स्त्रियांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या वृत्तीला ठेचले होते.

तीच मनूस्मृती जीने छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेकास विरोध केला जीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबांना शूद्र म्हणून हिनवले आणि बाबासाहेबांना अस्पृश्य म्हणून वर्गाबाहेर बसवले….

मनूचे पुतळे आणि मंदिरं उभारणाऱ्या डुक्करांनो तुम्हांला आम्ही कायम भिडतच राहू आणि शिव फुले शाहू आंबेडकर विचारांची क्रांती जिवंत ठेवू.

मनुस्मृती दहन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
क्रांतिकारी जयभीम ..

८. ही पोस्ट तर फेसबुक वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे.

माझ्यासोबत एका ताटात बसून जेवणाऱ्या
“९६ कुळी”मित्राचा काल त्याच्या गावाहून कॉल आला.खूप वैतागलेला होता.म्हटलं का काय झालं?तर म्हणे गावी आलो गावच्या शाळेत १४ दिवस कोरोंटाईन करून ठेवलंय.आमचं अक्ख कुटुंब सोबत आहे.पण हे सगळे गावातले इतकी शिवाशिव पाळत आहेत की तळ पायाची आग मस्तकात जात आहे. मुंबईहुन थोडं फार खाऊ घेऊन गेलो गावच्यांसाठी तर त्यांनी चक्क नाकारलं.म्हणे तुमचं काही घ्यायचं नाही असं ठरलं आहे गावात.घरून जेवण जरी आणून दिलं तरी ६ फूट लांबून गेटवर कुत्र्याला जेवण ठेवतो तस ठेवून निघून जातात.जेवलेले डब्बे ही आम्ही धुवून स्वच्छ करून दिले तरी डायरेक्ट हातात न घेता जमिनीवर ठेवायला सांगतात.”माझा ६ वर्षांचा मुलगा म्हटला पप्पा आपल्याला कोरोना झालाय का”?अशी वागणूक आजवर ही आम्ही तुमच्या बौद्ध समाजाशी गावात करत होतो…… आज कळालं किती घाणेरडं फील होतं ते.एकदा हा कोरोंटाईन संपुदे एक एकांची गांड मारतो मिटिंगमध्ये.(त्याचं वाक्य आहे तस लिहिलंय)….!!! मी हसून फक्त म्हटलं मग आमच्या बाप – जाद्यांनी शेकडो वर्षे हा अपमान आणि हीन वागणूक कशी सहन केली असेल ? ही शिवाशिवीची – अस्पृश्यतेचि चीड आमच्या मनात शेकडो वर्षे धुमसत होती त्याचा वणवा महामानव डॉ.बाबासाहेबानी पेटवला आणि या अस्पृश्यतेच समर्थन आणि मांडणी करणारा मनुस्मृती हा ग्रंथ जाळला.काय चूक केली बाबासाहेबांनी?मित्र निरुत्तर होता.फक्त एवढंच बोलला,सॉरी यार मी मनापासून माझ्या पुर्वजांनी केलेल्या नीच वागणुकीबद्दल मनापासून सॉरी बोलतोय खरचं मी दोन दिवसात स्वतःला लाचार ,हीन आणि दोषी असल्यासारखं समजू लागलोय. मी उत्तर दिलं,मित्रा तुला हे फील झालं यातच तुझ्यातला माणूस जिवंत आहे याचं मला समाधान वाटतंय.!!!मित्र धीरगंभीर आवाजात म्हंटला,भाई जय भीम..!!!बाबासाहेबानी खूप मोठा लढा लढलाय या मानवतेसाठी,त्या महामानवास तोड नाही.!!! जय भीमच…!!! मी ही अंतकरणातून त्याला जय भीम म्हटलं.!!!फोन ठेवला आणि माझ्या पुर्वजांना शेकडो वर्षे केलेलं कोरोंटाईन आठवू लागलो.Thanks Dr. Babasaheb Ambedkar💕
by,,Vikas Lakhan(लेखक.)
👉प्रसाद सोनावणे यांच्या वाल वरून.

आता काही मनुस्मृती समर्थनात काही जणांचे विचार पाहूया.

एकाने वैतागून ही पोस्ट केली…मनुस्मृती समर्थन केल्याने 25 धमक्या आणि शिव्या आल्या वाईट एकच वाटत इतकी वर्षे हिंदू एवढा शांत पणे धर्मग्रंथाची अवहेलना कशी सहन करतोय😠😠😠 थु तुमच्या जगण्यावर

त्यावर सर्वप्रथम अभिनंदन पोस्ट करणाऱ्याचे ज्याने छातीठोक पणे मनुस्मृति दहन करणाऱ्या नव बौद्ध लोकांचं उल्लेख करण्याचं आणि मनुस्मृति दहन करण्याचं विरोध करण्याचं हिम्मत दाखवली ! ही हिम्मत अपेक्षित होती ! बाकी मनुस्मृति दहन करणे म्हणजे हिंदूंच्या धार्मिक आस्थेवर आघात करणे !
कारण मनुस्मृतीवर जे आरोप केले जातात आंबेडकरी समूहांकडून ते अक्षरशः खोटे आहेत ! मनुस्मृति हा अतिशय चांगला ग्रंथ आहे आणि तो आमच्या धर्मातील एक ग्रंथ आहे ! आणि या पुढे मनुस्मृति दहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा कट्टरतेने विरोध होणारच मग ते आंबेडकरवादी असो की मग कम्युनिस्ट असो !

आंबेडकरी समुदायाने सर्वप्रथम विनयपिटक हे बौद्ध ग्रंथ वाचावं मग बघावं स्त्री आणि शूद्र यांच्याबद्धल बुद्धाचे विचार काय आहेत हे ! बाकी कुराण आणि हदीस यात गैर मुस्लिम आणि स्त्रिया यंबद्धल काय लिहिलंय हेही वाचावं मग कोणत्या ग्रंथाचे दहन करावं हे त्यांनी ठरवावं ! हिंदूंनी मनुस्मृति वाचली नाही मनुस्मृति समझून घेतली नाही त्यामुळे स्वतःला पुरोगामी आणि सावरकरवादी दाखवणारे हिंदू मनुस्मृती चा विरोध करताना सापडतात ! असो मनुस्मृति समजून घ्यायचं असेल तर नजदीच्या आर्य समाज मंदिरात जावं आणि आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली मनुस्मृति समझून घ्यावी ! मनुस्मृती मधील तत्वे वापरून संविधान बनवले गेलंय हे माहीत नाही यांना
म्हणून बाबासाहेब म्हणाले होते शिका मग संघटित व्हा !!

मनुस्मृती गृंथाची अवहेलना अजवर खुप केली बस झाल तेव्हा माणस आडानी होती.म्हणून काय ? यांना आयुष्यभर असला फालतु माज करू द्यायचा नाही आताच्या हिंदु युवकाच काम आहे,ही आपली नालायक आपल्याच धर्माचा मोठेपणा बाळगत नाहीत ,हेच मोठ दुःख आहे. किती सहन करायचं यांचं कुठे तरी विरोध करायला हवाच ना! बास झालं फक्त हिंदू धर्माने भाई चाऱ्याच्या गोष्टी करणं…समोर हिंदू धर्म ग्रंथ जाळत आहेत आणि हिंदू 😠😠😠😠 लाज वाटली पाहिजे असं जीवन जगायला!

मनुस्मृतीला विरोध करणार्‍यांपैकी एकाने पण मनुस्मृती वाचलेली नसते. पण, मनुस्मृती समर्थन करणार्‍यांची तोंड पाठ असते…😂 मनुस्मृती जाळली की दादाची आग होते.
अरे उलट चांगल आहे ना जाळताय तर तेवढ्याच प्रिंट बाहेर येतात. खप होतो. उत्पन्न मिळते. एक तर ना विरोधक वाचता ना समर्थक अशाने ती काळाच्या ओघात विस्मृतीत जाईल…😝 आणि शिवाय जितक्या वेळा मनुस्मृती जाळता तेवढीच ती पुनर्जीवित होत असते…🤣

आज मनुस्मृती दहन दिवस. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला जाळून विषमतेच्या प्रतीकाची होळी केली. भारतीय समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी आणि त्यासाठी ब्राम्हणवादी व्यवस्थेने धर्मग्रंथाच्या माध्यमातून जी सामाजिक विषमता निर्माण केली त्याविषयी भारतीय समाजामध्ये जागृती व्हावी हा व्यापक दृष्टिकोन बाबासाहेबांचा होता असे मला वाटते. ब्राम्हणवादी व्यवस्थेने गांजलेले लोक म्हणजेच शूद्र, अतिशूद्र आणि समस्त स्त्रिया यांचे मनात ब्राम्हणी धर्मग्रंथांबद्दल तिटकारा निर्माण होऊन विषमतावादी धर्माचा त्यांनी त्याग करावा हा सुद्धा व्यापक दृष्टिकोन त्यामागे असावा असे वाटते.

मनुस्मृती दहन दिवसाकडे केवळ ‘स्त्री मुक्ती दिन’ म्हणून बघणे म्हणजे या ऐतिहासिक घटनेचे व्यापकत्व आणि मौलिकत्व खरे तर संकुचित करणे होय. ही गोष्ट खरी आहे की, भारतीय स्त्रीवर अनेक बंधने लादुनच खऱ्या अर्थाने विषमताधिष्टीत जातीयतेची निर्मिती झाली. स्त्रीला विवाह करत असताना आपला पुरुष जोडीदार निवडण्याच्या स्वातंत्र्यावर धर्मग्रंथाच्या माध्यमातून बंधने लादली गेली. मनुस्मृती आधी धर्मग्रंथानी अशी बंधने लादली नव्हती असे नाही तर मनुस्मृती त्या सर्व विषमता पेरणार्या स्मृतींचे आणि धर्मग्रंथांचे व्यवस्थित पद्धतीने केलेले संकलन होते. रक्तशुद्धी टिकवणे आणि वर्णसंकर रोखणे आणि विशिष्ट वर्ण आणि जातीची शुद्धता टिकवून त्यांचे वर्चस्व समाजात टिकवून ठेवणे हाच सर्व स्मृतिकारांचा आणि धर्मग्रंथ रचयितांचा कपटी हेतू यातून दिसतो.

मनुस्मृतीचा प्रभाव केवळ हिंदूंच्या समाजव्यवस्थेवरच नाही तर इस्लाम, शीख, ख्रिश्चन, पारशी धर्माच्या भारतातील अनुयायांवर सुद्धा झालेला आहे. वेटिंग फॉर व्हिसा मध्ये यावर खूप चांगला प्रकाश टाकलेला आहे. आजही जे अस्पृश्य लोक ख्रिश्चन, मुस्लिम, शीख बनलेत त्यांच्यासोबत इतर मुस्लिम, शीख, ख्रिश्चन बेटी व्यवहार करत नाहीत. दुसऱ्या अर्थाने ते सुद्धा जाणते अजाणतेपणी मनुस्मृतीचे पालन करत आहेत असेच म्हणावे लागेल. २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधानाचा अंमल झाल्यापासून खऱ्या अर्थाने भारतातील सर्वच शोषित समान पातळीवर कायदेशीररित्या आणले गेले. आज मनुस्मृतीनुसार राज्यकारभार चालत जरी नसला तरी सामाजिक व्यवहारातील मनुप्रवृत्ती नष्ट झाली असे म्हणता येणार नाही. याचे कारण मनुस्मृतीच्या माध्यमातून विशिष्ट जाती आणि वर्णाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला त्याचा शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांनी केलेला स्वीकार.

आज कुणीही शूद्र, अतिशूद्र नसले तरीही मनुस्मृतीने तयार झालेली क्षुद्रत्वाची आणि श्रेष्ठत्वाची भावना अजूनही समाजमानसातून नष्ट झालेली नाही. केवळ पुरुषच ही वर्चस्ववादी मनोवृत्ती बाळगतात असे नव्हे तर स्त्रियांमध्ये पण ही प्रवृत्ती भिनलेली आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टींपेक्षाही मानवा-मानवातील समानता आणि मैत्रीची भावना वृद्धिंगत होणे अधिक गरजेचे आहे. मनुस्मृतीच्या माध्यमातून निर्माण झालेली जी भावना समाजामध्ये रुजलेली आहे त्याचे कारण बहुसंख्य हिंदू लोकांचे कट्टर धार्मिक असणे होय. आज गर्व से कहो…ही भावना समाजामध्ये अधिक दृढ होत असल्याने बहुसंख्य भारतीय समाजमन मनुस्मृतीचे गुलाम वाहक बनल्याचे चित्र आहे. मनुस्मृती दहन करत असतानाच समस्त भारतीयांना समता आणि प्रतिष्ठा बहाल करणाऱ्या भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा सुद्धा समस्त भारतीयांनी घेतली पाहिजे. त्याबरोबरच सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
२५.१२.२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *