सी.सी. रस्त्याचे व बंद नालीच्या कामामुळे नागरिकांत समाधान
लोहा / प्रतिनिधी
लोहा शहरातील प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक म्हणतात हम साथ साथ प्रभागाच्या विकासासाठी नगराध्यक्षाची मोलाची साथ प्रभागात ४३ लक्ष रुपयांची कामे सुरू केली थाटात.
लोहा शहरातील सर्वात मोठा प्रभाग असलेल्या व नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी राहात असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्रेचाळीस लक्ष रुपयाचे विकासकामे सुरू आहेत.
प्रभाग क्रमांक ६ हा तीन नगरसेवकाचा असून या प्रभागाचे प्रतिनिधित्व नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या सौभाग्यवती नगरसेविका सौ. गोदावरीताई गजानन सूर्यवंशी, नगरसेवक संदीप दमकोंडवार , नगरसेवक नबीसाब शेख हे तिघेजण करीत असुन प्रभाग क्रमांक सहा देऊळ गल्ली ,मराठी गल्ली , लिंबोनी गल्ली,मोमीन गल्ली, नगरेश्वर मंदिराचा एरिया, लहूजी नगर आदी भाग प्रभागात येतो . या प्रभागाच्या विकासासाठी या प्रभागातील सर्व नगरसेवकांची एकजूट व त्यांना नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्यासह संपूर्ण सभागृहाची साथ असुन प्रभाग क्रमांक 6 च्या विकासासाठी या प्रभागाच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ. गोदावरीताई गजानन सूर्यवंशी , नगरसेवक संदीप दमकोंडवार , नगरसेवक नबीसाब शेख ,हे सरसावले असून या तीन्ही नगरसेवकाच्या प्रयत्नामुळे व नगराध्यक्ष यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक सहाच्या विकासासाठी ४३लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असून ४३ लक्ष रुपयांचे विकास कामे मोठ्या थाटात सुरू झाली असून
यात नगरेश्वर मंदिरासमोरील डॉ. गुंडावार यांच्या घरापासून ते निचलकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम पूर्ण झाले, फिरोज मणियार यांच्या घरापासून ते वाले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले तसेच एकबाल शेख यांच्या घरापासून ते लहुजी नगर पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम व बंद नाली बांधकाम सुरू असून हे काम प्रगतीपथावर आहे .
नगरसेवकाकडुन कामाची पाहणी
प्रभाग क्रमांक सहा मध्ये 43 लक्ष रुपयाची सिमेंट रस्ते व बंद नाली हे विकास कामे प्रगतीपथावर असून सदरील कामे अतिशय चांगले व दर्जेदार होत असून या कामाची प्रत्यक्ष पाहणी नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक अमोल व्यवहारे यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले व प्रभागातील नागरिकांच्या सूचना ऐकून घेतल्या.