भविष्य निर्वाह निधी पावत्यांचे शेड्यूल कुठे गायब झाले ? हलगर्जीपणामुळे शिक्षक बांधवाची आर्थिक पिळवणूक ; महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा आरोप

नांदेड – 

जिल्ह्यात शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या विवरणपत्राचे वितरण करीत असल्याबाबत मोठा गाजावाजा करीत ते सर्व शिक्षकांना पावत्या दिल्या गेल्या. ज्या स्लीप दिलेल्या आहेत त्या तब्बल दोन वर्षानी देऊनही परिपूर्ण नाहीत.   पावत्यांतील नोंदीत अक्षम्य चुका असून हलगर्जीपणामुळे शिक्षक बांधवाची आर्थिक पिळवणूक झाल्याचा आरोप शिक्षक सेनेने केला आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आलेले शेड्युल कुठे गायब झाले, असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत. याबाबत शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी संबंधितावर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

 महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेच्या वतीने अनेक वेळा भविष्य निर्वाह निधीच्या विवरणपत्राचे वितरण करण्याबाबत निवेदन दिले होते. संघटनेच्या आंदोलनात हा मुद्दा प्रामुख्याने होता. आता जीपीएफ स्लीपचे जि.प.नांंदेड वरुन वितरण करुन बरेच दिवस होऊनही बिलोली तालुक्यातील शिक्षक बांधवाना अद्याप प्राप्त झाले नाहीत तर ज्यांना मिळाल्या आहेत तर त्यांच्या अपुर्ण आहेत.  ज्यामध्ये दोन महिने तीन महिने एक महिना रक्कमेचा आकडा निरंक आहे . एका शिक्षकाला मिळालेल्या विवरणपत्रात सात महिने शून्य दर्शविण्यात आले आहे. काही शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगातील पहिला हप्ता जमा दाखविण्यात आला आहे तर अनेकांचे अप्राप्त दाखविण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर मागील स्लीपनुसार सुरुवातीची शिल्लकही चुकीची दाखविण्यात आली असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. याबाबत अनेक तक्रारी शिक्षक सेनेकडे प्राप्त झाल्या आहेत. 

चौकट….

योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे! – संतोष अंबुलगेकर

शिक्षकांना मिळालेल्या अनेक पावत्यांत चुका आहेत. दुरुस्तीसाठी शिक्षकांनी एक – एक स्लीप घेऊन नांंदेड जि.प.ला हेलपाटे मारावेत आणि चिरिमिरी दिल्याशिवाय ते काम पुर्ण होणार नाही हा प्रकार अन्यायकारक आहे. अपुर्ण स्लीप देऊन होणाऱ्या आर्थिक कामात अडचणी निर्माण करणारा झाला आहे.  शिक्षकांना त्रास देण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. ही बाब शिक्षक सेना कदापिही सहन करणार नाही.  प्रशासनाने संपूर्ण दुरुस्ती सह परिपूर्ण असलेली शिक्षक बांधवाना सन्मानपूर्वक द्यावे, शिक्षक बांधवाची होणारी हेळसांड थांबवावी. ज्यांच्यामुळे हे काम अपूर्ण राहिले त्यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *