बेथलेहेमचा चमकता तारा(येशू ख्रिस्त)

अस म्हणतात की देवाने गालील प्रांतातील बेंथलेहेम नावाच्या गावी जोआकीन आणि अॅना यांच्या पोटी एका निष्कलंक कुमारिकेला जन्म दिला.मारियाचा जन्म समस्त मानवजातीसाठी शुभसंकेताची वार्ता घेऊन आला.

पुढे वयात आल्यावर मारियाचा विवाह योसेफ यांच्याशी ठरला.जे व्यसायाने सुतार होते.पण…विवाह होण्याआधीच मारिया गर्भवती आहे हे योसेफला पवित्र आत्म्याव्दारे स्वप्नांमध्ये येउन सांगितले.आणि अतिशय आनंदित होउन योसेफ ने तिला पत्नि म्हणून स्विकारले.

मारिया आणि योसेफ या दांपत्याच्या पोटी येशू ख्रिस्त यांचा जन्म जुदेआच्या बेथलेहेम च्या या गावी एका गोठ्यामध्ये झाला.त्यांच्या जन्म उत्सव म्हणून”नाताळ”हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.अस म्हणतात की येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा देवदूतांनी गायन करत आपला आनंद व्यक्त केला,मेंढरे राखणा-या मेंढपाळांनी या दिव्य बाळाचे दर्शन घेतले.सर्वत्र आनंदी आनंद अगदि ओंसडून वाहात होता.


परंपरावादी ख्रिशनधर्मीयांसाठी हा सण प्रार्थना आणि आत्मशुध्दीचे कारण आहे.रोमन,कॅथेलिक्स संप्रदायाचे लोक एक डिसेंबर पासून ते पंचवीस डिंसेबर पर्यंतच्या सायंकाळ पर्यंत हा उत्सव मोठ्या हर्षउल्हासात साजरा करतात.आपल्या भारतीय संस्कृतीशी ऋणानुबंध असलेला 25 डीसेंबरशी निगडीत आहे.प्राचीन काळामध्ये रोम राज्यात 25डिसेंबर हा दिवस सुर्याची जयंती म्हणून साजरा केला जायचा.

नाताळच्या दिवशी सर्व ख्रिश्चन बाधवांचा आनंद ओंसडून वाहातो.सर्वजण एकमेकांना भेटवस्तू देत आनंद व्यक्त करतात.घरदार रोषणाईने सजवले जाते.”ख्रिसम ट्री”देखील सजवला जातो,नाताळ या सणांचा तो अतिशय महत्त्वाचा घटक आहे.

नाताळ हा शब्द “नातूस”म्हणजे”जन्म”या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे.या शब्दाला इंग्रजीभाषेत”ख्रिसमस”म्हणतात.
वयाच्या 33 व्या वर्षी यहूदी धर्मधिका-यांनी येशू ख्रिस्त यांच्यावर धर्मद्रोहाचा व राष्ट्रद्रोहाचा आरोप केला व तत्कालीन रोमन सत्तांधिशांच्या करवी त्यांना क्रुसावर खिळवून ठार मारण्यात आले.

अस म्हणतात की,मानवजातीचे पाप क्षमेसाठी येशू ख्रिस्तांनी क्रूसावर बलिदान दिले.आयुष्यभर प्रेमाची शिकवण देणारे येशू ख्रिस्त हे “ख्रिश्चन”धर्माचे संस्थापक आहेत,”बायबल”हा ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ आहे.देव आणि मानव यातील मध्यस्थ म्हणून येशू ख्रिस्तांकडे पाहिले जाते.
नाताळ सणांनिम्मित सर्व ख्रिश्चन बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा…!

rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *