नवीन कृषी कायद्यातील तरतुदी व त्यांचे परिणाम, या विषयावर मार्गदर्शन शिबिर

प्रति,सर्व सरपंच/पोलीस पाटील नमस्कार

आपणास निमंत्रित करीत आहोत की, देशभरात नवीन कृषी कायदे व शेतकरी आंदोलन चर्चेत आहे. या कायद्याचे परिणाम केवळ शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेवर होणार आहेत.

परंतु जनतेला या कायद्यातील तरतुदी माहीत नाहीत. त्यांची इथंभुत माहिती किमान निवडक लोकांना तरी मिळावी, यासाठी
एका मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.j


अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने
मंगलवार दि. ५ जानेवारी २०२१
दुपारी १२.४५ ते ५.०० वाजेपर्यंत
स्थळ: लोकमान्य टिळक सभागृह, कस्तुरबा भवन, ज्ञानेश्वर मंदिराजवळ, बजाज नगर, नागपूर
वक्ते: तेजिंदर सिंग रावल, डॉ. हरीश धूरट
यात या कायद्यातील संपूर्ण तरतुदी व त्याचे जनतेवर होणारे परिणाम यावर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. आपण आपल्या परिचयाच्या सरपंच व पोलीस पाटील यांनाही या शिबिरात सहभागी होण्याबद्दल सांगावे. तरी आपण शिबिरात पूर्ण वेळ सहभागी होऊन या दुर्मिळ संधीचा लाभ घ्यावा, ही विनंती!


-:आपले विनीत:-
प्रज्वला तट्टे, आशू सक्सेना, अनिल काळे, विजय बाभूळकर, डॉ. विलास सुरकर, देवेंद्र वानखेडे, रविंद्र साखरे, प्रा. रमेश पिसे, वैभव धांदरे, अरुण लाटकर, अब्दुल वहिद शेख आणि विरा साथीदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *