नांदेड ; प्रतिनिधी
गेल्या पस्तीस वर्षांपासून अनेक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम राबवून सतत कार्यरत असणारे धर्मभूषण ॲड. दिलीपभाऊ ठाकूर यांना ख्रिसमसच्या दिवशी रेड एफएम रेडिओ तर्फे “नांदेडके सांता ” हा पुरस्कार ऑनलाइन देऊन सन्मानित करण्यात आले.
ख्रिश्चन संस्कृतीप्रमाणे सांताक्लॉज येऊन गोरगरीब तसेच लहान मुलांना भेट वस्तू देत असतो. त्याप्रमाणे ॲड. ठाकूर यांनी कोरोना लॉकडाऊन च्या काळात सतत बावन दिवस हजारो विद्यार्थ्यांना, पोलीस व आरोग्य तथा स्वच्छता कर्मचाऱ्यांना लोकसहभागातून लॉयन्सचे डबे दिले.
पाच हजार मास्क व सॅनिटायझर चे वितरण केले. यामुळे राज्यातील सतरा सामाजिक संस्थांनी कोविड योध्या म्हणून त्यांना गौरवीत केले होते. पासष्ठ दानशूर नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर मध्यरात्री कुडकुडत झोपलेल्या निराधारांना नववर्षाची भेट म्हणून २०२१ ब्लॅंकेट पांघरून “मायेची ऊब” दिली. या सर्व कार्याची दखल घेत रेड एफएम ने पहिल्यांदाच ” नांदेडके सांता ” हा पुरस्कार देण्याची सुरुवात केली आणि ॲड. ठाकूर हे पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले.
ॲड.. ठाकूर यांना यापूर्वी “धर्मभूषण” ही उपाधी, मराठवाडा भूषण पुरस्कार, आदर्श शिवसैनिक पुरस्कार,राजपूत भूषण पुरस्कार,माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार,राजे छत्रपती शिवाजी सेवाभाई पुरस्कार ,मातोश्री गंगूताई पुरस्कार,जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड, शान ए नांदेड, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा पुरस्कार, तिरंगा गौरव पुरस्कार, लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवार्ड देऊन देशभरातील विविध संस्थातर्फे गौरविण्यात आले आहे. ” नांदेडके सांता ” हा नवीन पुरस्कार ॲड.दिलीपभाऊ ठाकूर यांना मिळाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.