लाल खंदारी कृष्ण-सुदामांनी,…..
कंधारपुरी शैक्षणिक क्रांति केली!….
स्वाभिमानाची मर्दुमकी व्दयांनी,…..
जनसामान्यांना खरच शिकवली!…..
कर्तृत्वाने पुरोगामी विचारधाराच,.. …
समाजाच्या मना-मनात रुजवली!….
सत्याग्रहांच्या माध्यमातून धडकी,……
अधिकार्यांच्या मनात भिनवली!….
रक्तांच्या नात्या पेक्षाही मैत्री,….
दोघांनीही जीवापाड निभावली!….
गावपातळीवर माना-पानाची,….
संस्कृतीच संपुष्टात आणली!….
संपादक व चित्रकार जोडगोळीने,…..
अनाथांना दिली मायेची सावली!….
नव्वदीपार वाढदिवसा निमित्त,…
अभिष्टचिंतनाची मांदियाळी!…..
मानाची कोटी-कोटी जयक्रांति!….
दीर्घायुरारोग्य लाभो म्हणते जिबली!….
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
**** video news***